कल्याण : पुणे ते मुंबई व कल्याण ते मुंबई सिंहगड एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांच्या वतीने अतिशय उत्साहाने सिंहगड एक्सप्रेसमध्ये नवरात्र व दसरा साजरा करण्यात आला. वर्षभर जी ट्रेन या चाकरमान्यांना वेळेवर आपल्या कार्यालयात पोहचवत असते आज त्या ट्रेन ला या सर्व प्रवाशांनी सजवून पूजा करत ट्रेन बद्दल आपली कृतज्ञता व्यक्त केली.
वर्षभर प्रवास करताना सहप्रवासी हे कुटुंबातील सदस्य होऊन जातात, एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी होत असतात. आज देखील या सर्व प्रवाशांनी एकत्र येत कुटुंबाप्रमाणे दसरा साजरा करत तसेच एकमेकांना दसऱ्याच्या शुभेच्छा देत आनंद व्यक्त केला.