Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘कुंकू एकाचंच लावा; दोन्ही डगरीवर हात ठेवू नका’; अजित पवार यांचा कार्यकर्त्यांना सल्ला

काहीजण माझ्या सभेला येतात, तसेच विरोधी उमेदवाराच्या सभेला देखील जातात. हे माझ्या लक्षात आलं आहे. त्यामुळे कुंकू एकाचं लावायचा असतं, दोन्ही डगरीवर हात ठेवू नका, असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी कार्यकर्त्यांना दिला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 17, 2024 | 08:41 AM
‘कुंकू एकाचंच लावा; दोन्ही डगरीवर हात ठेवू नका’; अजित पवार यांचा कार्यकर्त्यांना सल्ला
Follow Us
Close
Follow Us:

बारामती : काहीजण माझ्या सभेला येतात, तसेच विरोधी उमेदवाराच्या सभेला देखील जातात. हे माझ्या लक्षात आलं आहे. त्यामुळे कुंकू एकाचंच लावायचा असतं, दोन्ही डगरीवर हात ठेवू नका, असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी कार्यकर्त्यांना दिला.

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीरसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही कार्यकर्त्यांना चिमटा काढला. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब गावडे, जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे, माजी सभापती दिलीप खैरे, कालवा सल्लागार समिती सदस्य पोपट खैरे, सोमेश्वरचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, तालुका दुध संघाचे अध्यक्ष पोपटराव गावडे, सरपंच तुषार हिरवे, भरत खैरे, ज्ञानेश्वर कौले, बी. के हिरवे, सुशांत जगताप, आप्पासो शेळके, माजी सभापती संजय भोसले, शारदा खराडे, अविनाश गोफणे, अनिल हिरवे, संजय दरेकर, बापुराव चांदगुडे आदींसह महायुतीचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी शिवसंग्राम पक्षाच्यावतीने महायुतीच्या उमेदवारास जाहिर पाठींबा देण्यात आला.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, यावर्षीची निवडणूक भावनिक नसून विकासाच्या मुद्द्यावर आहे. त्यामुळे विकासाच्या मुद्द्यावर महायुतीच्या उमेदवाराला मतदान करा. कोणतीही विकासकामे करायची झाल्यास केंद्राकडून ५० टक्के निधी राज्यासाठी आणावा लागतो. त्यामुळे केंद्रात आणि राज्यात महायुतीची सत्ता असल्यास विकासकामे करण्यास अडचण येत नाही. त्यामुळे नुसते भावनिक होऊन कामे होत नाहीत. तर त्याला विकासकामेच करावी लागतात. मागील दहा वर्षांत सध्याच्या खासदाराने कोणतीही विकासकामे आणली नाहीत. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन अजित पवार यांनी केले.

आज येथे आलेले काही कार्यकर्ते विरोधकांच्या सभेला उपस्थित होते हे चालणार नाही. विरोधक सध्या गावोगावी जाऊन सभा घेत आहेत. कुठं जेवण, कुठं नाष्टा तर कुठं चहा घेण्यासाठी थांबत आहेत. पूर्वी तालुक्यातून एकच सभा घेत होते, आता पळावे लागत असल्याचा टोला अजित पवार यांनी शरद पवारांचे नाव न घेता लगावला.

अजूनही आपल्याला विमानतळ, टर्मिनल, बारामती – फलटण रेल्वे तसेच बारामतीपर्यंत पुण्याची लोकल आणायची आहे. अशी अनेक विकासकामे येत्या पाच दहा वर्षांत करायची आहेत. ‘हर घर नल योजना’ही मोदींजींनी आणली. त्यांच्याशिवाय विकासकामे होणार नाहीत. त्यामुळे येत्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला निवडून द्या, असे आवाहन पवार यांनी केले.

तेलंगणात ओव्हरफ्लो होणारे नद्यांचे पाणी १ लाख अश्वशक्तीच्या पंपाद्वारे उचलून परिसरातील तलाव भरण्यात येतात. त्याचप्रमाणे नद्याद्वारे ओव्हरफ्लो होणारे पाणी बारामती, पुरंदर, इंदापुर आणि दौंड या जिरायती भागातील ओढे व तलावतून सोडण्याच्या विचाराधीन आहे, असे पवार यांनी सांगितले.

दादा तुमची पिलावळ आवरा

गावागावात बोललं जात की दादा तुमचं काही नाही हो. पण तुमची पिलावळ आवरा! असा सूर अनेक ठिकाणी काढला जातो. पण एक लक्षात ठेवा, या निवडणुकीत तुम्ही मला म्हणजे माझ्या पत्नीला मतदान करणार आहात. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या म्हणजे जिल्हा परिषद, पंचायत समिती या निवडणुकीत त्यांना त्याची जागा दाखवू ना, असा टोला अजित पवार यांनी लगावला.

Web Title: Dy cm ajit pawar gives advice to his party workers know what he was said nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2024 | 08:35 AM

Topics:  

  • ajit pawar
  • Baramati Lok Sabha
  • Nationalist Congress Party
  • political news

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : २०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
1

Devendra Fadnavis : २०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?
2

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Mallikarjun Kharge : राजकारणात अजूनही माणूसकी शिल्लक; PM मोदींनी कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंना फोन लावत केली विचारपूस
3

Mallikarjun Kharge : राजकारणात अजूनही माणूसकी शिल्लक; PM मोदींनी कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंना फोन लावत केली विचारपूस

Ajit Pawar: ‘या’ विमानतळांच्या विकासासाठी त्वरित कार्यवाही करावी; अजित पवारांचे स्पष्ट निर्देश
4

Ajit Pawar: ‘या’ विमानतळांच्या विकासासाठी त्वरित कार्यवाही करावी; अजित पवारांचे स्पष्ट निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.