maharashtra dcm eknath shinde gives reaction on india pakistan war live update
मुंबई : औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचा अमानुष छळ केला. तो महाराष्ट्राला उद्ध्वस्त करायला आला होता. त्याचे उदात्तीकरण कोणीही सहन करणार नाही, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, देशासाठी, धर्मासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी बलिदान दिले. औरंगजेबाचा कलंक महाराष्ट्रातून पुसला पाहिजे. औरंगजेबाचे उदात्तीकरण करणे म्हणजे देशद्रोह असून, त्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही, असेही उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. जे लोक औरंगजेबाच्या समर्थनासाठी पुढे येतील, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर राज्य सरकार काम करत आहे. गोरगरिबांना न्याय देण्याचे काम केले जात आहे, असेही त्यांनी सांगितले.
नागपूरमध्ये समाजकंटकांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी तीव्र शब्दांत निषेध केला. समाजात तेढ निर्माण करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. नागपूरमधील परिस्थिती नियंत्रणात आहे. राज्यात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
महाराष्ट्राच्या मातीचा एक कणही जिंकता आला नाही
बलाढ्य सत्तेला नमवून शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. महाराजांच्या निधनानंतर औरंगजेब स्वराज्यावर चालून आला. पण महाराष्ट्राच्या मातीचा एक कणही त्याला जिंकता आला नाही. महाराजांपासून स्फूर्ती घेतलेले संभाजी महाराज, राजाराम महाराज, ताराराणींनी त्याला मूठमाती दिली. थोडक्यात सांगायचं झालं तर औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झाला होता. म्हणजेच ज्याचा गुजरातमध्ये जन्म झाला तो म्हणजे औरंगजेब, असा टोला उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी लगावला होता.