नागपूरमध्ये समाजकंटकांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी तीव्र शब्दांत निषेध केला. समाजात तेढ निर्माण करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
छावा चित्रपटानंतर क्रूरकर्मा औरंगजेबाची कबर व त्याचे अस्तित्वच महाराष्ट्रातून मिटवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण तापलं असल्याचं दिसून आलं आहे.
राज्यभरामध्ये औरंगजेबाची कबर उखडून टाकण्याची मागणी केली जात आहे . हे प्रकरण गाजलेले असताना याबाबत शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
27 वर्षे मराठ्यांविरुद्ध लढल्यानंतर औरंगजेबाचा मृत्यू अहमदनगर जिल्ह्यातील भिंगार येथे 1707 मध्ये, 89 व्या वर्षी झाला. त्याच्या इच्छेनुसार त्याच्या गुरूच्या कबरीजवळच त्याचे अंतिम स्थान करण्यात आले.
औरंगजेबाची ही कबरच उखडून टाकली पाहिजे, असं वक्तव्य छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज आणि खासदार उदयनराजे भोसले यांनी केलं आहे. ते साताऱ्यात माध्यमांशी बोलत होते.
अबू आझमी यांच्या वक्तव्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी नेत्यांनी जोरदार आंदोलन करत आक्रमक पवित्रा घेतला. त्यांच्या वक्तव्याचे आता उत्तर प्रदेश विधीमंडळामध्ये देखील पडसाद पहायला मिळाले.
औरगंजेबाचा फोटो स्टेटसला ठेवत त्यावर धार्मिक तेढ निर्माण होईल, असा आक्षेपार्ह मजकूर या व्यक्तीने ठेवला होता. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्या मोबाईलची तपासणी केली.