Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Talathi office computerization: तलाठी कार्यालयाच्या फेऱ्यांना पूर्णविराम; सातबारावरील ११ कामे आता ऑनलाइन

Talathi Office - अनोंदणीकृत फेरफार नोंदींसाठी ई-हक्क प्रणालीद्वारेच अर्ज करणे आवश्यक राहणार आहे. एखादा खातेदार लेखी अर्ज घेऊन आल्यास त्यालाही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यास मार्गदर्शन केले जाईल.

  • By anuradha sagar
Updated On: Jun 10, 2026 | 06:00 PM
Satbara, E-Haqq, Talathi, Revenue Department

Satbara, E-Haqq, Talathi, Revenue Department

Follow Us
Follow Us:

Satbara 7 12 mutation online: सातबारा उताऱ्यावर वारस नोंद करणे, मयत व्यक्तीचे नाव कमी करणे, बोजा चढविणे अथवा कमी करणे यांसारख्या विविध महसुली कामांसाठी आता नागरिकांना तलाठी कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. भूमिअभिलेख विभागाने विकसित केलेल्या ‘ई-हक्क’ ऑनलाइन प्रणालीद्वारे नागरिक घरबसल्या अर्ज दाखल करू शकणार आहेत.

फेरफार नोंदविण्यासाठी यापूर्वी नागरिकांना तलाठी कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन अर्ज करावा लागत होता. तलाठी संबंधित फेरफार नोंदवून ती मंजुरीसाठी मंडल अधिकाऱ्यांकडे पाठवत असत. मात्र, काही ठिकाणी फेरफार नोंदविण्यास किंवा मंजुरी देण्यास होणारा विलंब नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत होता. नियमांनुसार कोणतीही हरकत अथवा वाद नसल्यास फेरफार व मंजुरीची प्रक्रिया एका महिन्याच्या आत पूर्ण होणे अपेक्षित आहे.

काँग्रेसमध्ये TMC च्या विलीनीकरणाला हिरवा कंदील, ममता बॅनर्जी तयार, तर अभिषेक बॅनर्जींच्या राहुल गांधींसमोर ‘या’

या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने ई-हक्क प्रणालीचा शंभर टक्के वापर बंधनकारक केला आहे. अर्जासोबतची कागदपत्रे अपूर्ण असली तरी तलाठ्यांना अर्ज थेट नामंजूर करता येणार नाही. अशा वेळी सातबाऱ्यावर नोंद घेऊन अर्जदाराला आवश्यक कागदपत्रांबाबत लेखी सूचना देत प्रकरण पुढील निर्णयासाठी मंडल अधिकाऱ्यांकडे पाठवावे लागणार आहे. तसेच ऑनलाइन अर्ज अनावश्यकपणे प्रलंबित राहणार नाहीत, याची जबाबदारी महसूल प्रशासनावर सोपविण्यात आली आहे.

ई-हक्क प्रणालीचा वापर बंधनकारक

अनोंदणीकृत फेरफार नोंदींसाठी ई-हक्क प्रणालीद्वारेच अर्ज करणे आवश्यक राहणार आहे. एखादा खातेदार लेखी अर्ज घेऊन आल्यास त्यालाही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यास मार्गदर्शन केले जाईल. ऑनलाइन अर्ज करण्यास अडचण असलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी तहसील कार्यालयांमध्ये स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

Farmers Protest: सोलापुरात शेतकऱ्यांचे तीव्र ‘जलसमाधी’ आंदोलन! गोकूळ शुगरकडील थकीत ऊस

या ११ सेवा उपलब्ध

वारस नोंद, मयत व्यक्तीचे नाव कमी करणे, बोजा चढविणे, गहाणखत नोंदविणे, बोजा कमी करणे, ई-करार नोंद, अज्ञान पालनकर्ता शेरा कमी करणे, एकत्र कुटुंब व्यवस्थापक नोंद कमी करणे, विश्वस्ताचे नाव बदलणे, हस्तलिखित व संगणकीकृत ७/१२ मधील तफावत किंवा चुका दुरुस्त करणे तसेच मयत कुळाच्या वारसांची नोंद या सेवा ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

ई-हक्क प्रणालीमुळे महसूल विभागाच्या सेवांमध्ये अधिक पारदर्शकता येणार असून नागरिकांचा वेळ, श्रम आणि कार्यालयीन फेऱ्यांचा त्रास मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

 

 

Web Title: E haqq online system maharashtra 2026 satbara 7 12 mutation online process

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2026 | 06:00 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.