Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra News: 24 तासांत महाराष्ट्र हादरला! 3 जिल्ह्यांना भूकंपाचा तडाखा; नेमकं काय घडतंय?

Maharashtra News: महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वारंवार सौम्य भूकंपाचे धक्के जाणवत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हिंगोलीनंतर आता नाशिक आणि पालघर जिल्ह्यांनाही भूकंपाचे हादरे बसल्याने चिंता वाढली आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Jul 26, 2026 | 12:04 PM
3 जिल्ह्यांना भूकंपाचा तडाखा (Photoसौजन्य-सौशलमीडिया)

3 जिल्ह्यांना भूकंपाचा तडाखा (Photoसौजन्य-सौशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • अनेक भागांमध्ये वारंवार भूकंपाचे सौम्य धक्के
  • पुराचा झटका कमी होताच, मात्र नागरिक भूकंपाच्या धक्क्याला समोरे
  • नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत
Nashik News: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये वारंवार भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे हिंगोली जिल्ह्यात सुरू असलेल्या भूकंपाच्या मालिकेनंतर आता नाशिक आणि पालघर जिल्ह्यांनाही भूकंपाचे हादरे बसले. कधी पाऊस तर कधी कड्याकडाचे उन्ह अशा नैसर्गिक घटनांमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि चिंता वाढत आहे

पूराचा फटका कमी होताच या करावा लागतो या गोष्टीचा सामना

नाशिक जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली. त्यामुळे गोदावरी नदीला आला दरम्यान अनेक रस्ते आणि वसाहती पाण्याखाली आल्या होत्या. नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले. पुराचा झटका कमी होताच, मात्र नागरिकांना आता भूकंपाच्या धक्क्यांना समोरे जावे लागत आहे.(Maharashtra News:)

Nashik News: धक्कादायक! खड्डेमुक्त रस्त्यांचे आश्वासन हवेतच, मुदत …

जमिनीला कंप जाणवला

मिळालेल्या माहितीनुसार, सुरगाणा, कळवण, पेठ आणि दिंडोरी या तालुक्यांमध्ये रात्री आणि पहाटेच्या सुमारास दोनवेळा भूकंपाचे हादरे बसले. त्यामुळे काहीकाळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुरगाणा तालुक्यातील सराड, घागबारी, वाझुळपाडा, हरणटेकडी, रोटी, शिंदे दिगर, भिंतघर आणि जामनेमाळ या भागांमध्येही हा धक्का जाणवल्याची माहिती समोर आली आहे. त्याचप्रमाणे कळवण, पेठ आणि दिंडोरी परिसरातही भूकंपाची तीव्रता सुमारे 3.5 रिश्टर स्केलच्या आसपास नोंदवण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

प्रशासनाने तातडीने परिस्थितीचा आढावा

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. स्थानिक प्रशासनाने तातडीने परिस्थितीचा आढावा घेतला असून संबंधित अधिकारी घटनास्थळी सतर्क आहेत. महसूल विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेकडून सर्व माहिती भूकंप निरीक्षण केंद्राकडे पाठवण्यात आली आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अधिकृत माहितीकडेच लक्ष द्यावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

लहान-मोठे हादरे वारंवार

दरम्यान, पालघर जिल्ह्यातही शनिवारी सकाळी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. या परिसरात यापूर्वीही अशा स्वरूपाचे लहान-मोठे हादरे वारंवार जाणवत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये चिंता वाढत आहे. जरी धक्क्यांची तीव्रता कमी असली तरी सतत होणाऱ्या हालचालींकडे प्रशासन आणि भूगर्भशास्त्र विभागाचे लक्ष आहे.

तीव्रता 3.1 रिश्टर स्केल

हिंगोली जिल्ह्यात तर मागील काही दिवसांपासून सातत्याने भूकंपाची नोंद होत आहे. शनिवारी संध्याकाळी पुन्हा एकदा जमिनीला हलका कंप जाणवला. हा धक्का सायंकाळी सुमारे 6.50 वाजता जाणवला असून त्याची नोंद अधिकृत भूकंप मापन केंद्रात करण्यात आली आहे. या भूकंपाची तीव्रता 3.1 रिश्टर स्केल इतकी होती. त्याचे केंद्र हिंगोली जिल्ह्यातील नव्हलगव्हाण परिसराच्या जवळ, जमिनीखाली सुमारे पाच किलोमीटर खोलीवर असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Jalgaon News: स्वच्छतेचा वसा, हरिततेचा ध्यास! जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा उपक्रम

सततच्या भूकंपाच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये नैसर्गिकरित्या भीतीचे वातावरण असले तरी तज्ज्ञांच्या मते अशा सौम्य धक्क्यांमुळे घाबरण्याचे कारण नसते. मात्र सतर्क राहणे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. कोणतीही अप्रमाणित माहिती सोशल मीडियावर पसरवू नये, तसेच आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षित ठिकाणी जाण्याची तयारी ठेवावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Web Title: Earthquake tremors felt in three districts of maharashtra in the last 24 hours

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2026 | 11:59 AM

Topics:  

  • Earthquake
  • Maharashtra News Update
  • Nashik News

संबंधित बातम्या

Maharashtra Earthquake: महाराष्ट्र हादरलं! नाशिकमध्ये 3.6 तर पालघरमध्ये 3.1 रिश्टर तीव्रतेचा भूकंप, प्रशासन सतर्क, जीवितहानी नाही
1

Maharashtra Earthquake: महाराष्ट्र हादरलं! नाशिकमध्ये 3.6 तर पालघरमध्ये 3.1 रिश्टर तीव्रतेचा भूकंप, प्रशासन सतर्क, जीवितहानी नाही

Maharashtra News: ‘कृष्णा’च्या आरोग्य वारीने दिली वारकऱ्यांना मोफत वैद्यकीय सेवा
2

Maharashtra News: ‘कृष्णा’च्या आरोग्य वारीने दिली वारकऱ्यांना मोफत वैद्यकीय सेवा

Peru Earthquake : पेरुत भूकंपाचा जोरदार तडाखा! अँडीज पर्वतरांगेत हादरली जमीन; ५ जणांचा मृत्यू
3

Peru Earthquake : पेरुत भूकंपाचा जोरदार तडाखा! अँडीज पर्वतरांगेत हादरली जमीन; ५ जणांचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.