Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Alibaug News: पर्यावरण पूरक पत्रावळ्यांचा व्यवसाय प्लास्टिकच्या पत्रावळ्यांमुळे धोक्यात, व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ

Alibaug News : जेवणासाठी बहुतेक प्लास्टिकच्या पत्रावळ्यांचा वापर होतो आहे. मात्र या प्लॅस्टिकच्या पत्रावळ्यांमुळे जेवणामधून आपल्या पोटात एकप्रकारे विषच जात आहे. प्लॅस्टिकच्या पत्रावळ्यांमुळे कर्करोगासारखे अनेक गंभीर आजार

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 09, 2025 | 06:02 PM
पर्यावरण पूरक पत्रावळ्यांचा व्यवसाय प्लास्टिकच्या पत्रावळ्यांमुळे धोक्यात, व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ

पर्यावरण पूरक पत्रावळ्यांचा व्यवसाय प्लास्टिकच्या पत्रावळ्यांमुळे धोक्यात, व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ

Follow Us
Close
Follow Us:

भरत रांजणकर, अलिबाग: अलिबाग प्रत्येक गोष्टीत झालेले प्लास्टिकचे आक्रमण हे सर्व प्राणीमात्रांच्या अक्षरशः जीवावर आले आहे. आज बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या प्रत्येक वस्तू ह्या प्लास्टिकच्या आवरणाच्या विळख्यात अडकलेल्या अवस्थेत किंबहुना त्या अडकवलेल्या आहेत, या प्लास्टिकच्या आक्रमणाचा फटका आरोग्यदायी असलेल्या पत्रावळ्या बनवण्याचा व्यवसाय करणाऱ्या अलिबाग तालुक्यातील बहिरोळे, मापगाव येथील अनेक गरीब व्यावसायिकांना बसत आहे. यामुळे या व्यवसायाला शेवटची घरघर लागली आहे.

मंगेशकर रुग्णालयाच्या अडचणीत वाढ! वैयक्तिक माहिती जाहीर केल्यामुळे कारवाई करण्याबाबत महिला आयोगाचे पत्र

लग्नाचा हंगाम सुरू झाला आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात जेवणासाठी बहुतेक प्लास्टिकच्या पत्रावळ्यांचा वापर होतो आहे. मात्र या प्लॅस्टिकच्या पत्रावळ्यांमुळे जेवणामधून आपल्या पोटात एकप्रकारे विषच जात आहे. प्लॅस्टिकच्या पत्रावळ्यांमुळे कर्करोगासारखे अनेक गंभीर आजार होत आहेत. आज प्रत्येक कार्यात प्लॅस्टिकच्या पत्रावळ्यांचा वापर वाढल्यामुळे आरोग्य धोक्यात आले आहे, शिवाय त्यांचे योग्य त्या प्रकारे विघटन होत नसल्याने मोठ्या प्रमाणात प्रदूषणात वाढ होत आहे. यासाठी जनजागृती करत देशी पानांच्या पत्रावळ्या व मातीची भांडी वापरून आपले जीवन समृद्ध करण्यासाठी सर्वांनीच पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे.

आपल्या देशात दोन हजार पेक्षा जास्त वनस्पतींच्या पानांवर जेवण ग्रहण करण्यात येत होते, त्यामध्ये मुख्यतः केळीच्या पानावर जेवण केल्यावर ते आरोग्यासाठी खूपच हितकारक व लाभदायक मानले गेले आहे, याबाबत प्राचीन ग्रंथालयात देखील उल्लेख आढळतो. याची दखल घेऊन आज अनेक महागड्या व पंचतारांकित हॉटेलमध्ये जेवणासाठी नैसर्गिक वनस्पतींच्या पानांचा वापर करण्यात येत आहे. जेवणासाठी नैसर्गिक पानांचा उपयोग केल्यास आरोग्य तर चांगले राहीलच शिवाय प्लास्टिकमुळे मोठ्या प्रमाणात होणारे प्रदूषण रोखण्यासाठी मोठी मदत होणार आहे.

दरम्यान, अलिबाग तालुक्यातील बहिरोळे, मापगांव येथे घरोघरी फार पूर्वीपासून माऊली नावाच्या वेलीच्या पानापासून तेथील महिला व पुरुष ग्रामस्थ पत्रावळ्या बनवण्याचा व्यवसाय करीत आहेत. यासाठी तेथील महिला व पुरुष पहाटेच्यावेळी दव पडत असताना कनकेश्वर डोंगरावर जाऊन तेथे असलेल्या झाडांवर नैसर्गिकरित्या उगवलेल्या माऊली नावाच्या वेलीची पाने तोडून आणतात, यानंतर ती पाने व्यवस्थित जुळवून नारळाच्या झापांच्या काड्यांच्या साहाय्याने हव्या त्या आकारात विणतात. यानंतर मागणी असेल त्याप्रमाणे पत्रावळ्या मोजून त्यांचे गठ्ठे बनवतात. या पत्रावळ्या बनवण्यासाठी त्यांच्या कुटुंबातील सदस्य यांची मोठी साथ आवश्यक असते. काढून आणलेली वेलीची पाने ठराविक वेळेत उपयोगात आणली जाते, अन्यथा नुकसान होते. मागील काही वर्षांपासून प्लास्टिकच्या पत्रावळ्या बाजारात विक्रीसाठी आल्यामुळे पारंपरिक व आरोग्यासाठी लाभदायक असलेल्या पत्रावळ्यांची मागणी घटली आहे, यामुळे आज वर्षानुवर्षे नैसर्गिक पानांच्या पत्रावळ्यांचा व्यवसाय करून उपजीविका करणाऱ्यांची मात्र उपासमार होत असल्याचे येथील गरीब व्यवसायिकांनी सांगितले आहे.

याबाबत बहिरोळे येथील पत्रावळ्या बनवून त्या विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या महिला काजल थळे यांनी बोलताना सांगितले की, आम्ही हा व्यवसाय आमच्या आजी-आजोबांपासून करत आहोत, आज बाजारात स्वस्त दरात प्लास्टिकच्या पत्रावळ्या विक्रीसाठी आल्यामुळे व कनकेश्वर डोंगरावर मोठ्या प्रमाणात होत असलेल्या प्रदूषणामुळे तसेच तेथील वृक्ष तोडीमुळे आज माऊली या वेलीची पाने कमी प्रमाणात मिळत आहेत, त्यामुळे आमचा पारंपरिक व्यवसाय धोक्यात आला आहे, तरी शासनाने आमचा पारंपरिक व्यवसाय टिकण्याकरीता जनजागृती करत आम्हाला आमच्या व्यवसायाकरीता योग्य ते सहकार्य करावे, अशी त्यांनी शासनाकडे मागणी केली आहे.

यासोबतच बहिरोळे येथील पत्रावळ्यांचा व्यवसाय करणाऱ्या दर्शना थळे यांनी यादेखील आपल्या व्यथा व्यक्त करताना सांगितले की, कनकेश्वर डोंगरावरून पत्रावळ्यांची पाने आम्ही खूप मोठ्या कष्टाने व मेहनतीने आणून ती जुळवाजुळव करून आम्ही विकतो, मात्र प्लास्टिकच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या पत्रावळ्यांमुळे आमच्या नैसर्गिक पानांच्या पत्रावळ्यांची मागणी कमी झाली आहे व आम्हाला ग्राहक मिळेनाशे झाले आहेत. तरी शासनाने आपल्या शासनस्तरावर आमच्या पारंपारिक पत्रावळ्यांच्या व्यवसायाला गती द्यावी तसेच आरोग्यासाठी लाभदायक असणाऱ्या पत्रावळ्यांच्या विक्रीसाठी सोयीची बाजारपेठ उपलब्ध करून आम्हाला पुन्हा एकदा सुगीचे दिवस आणावे, अन्यथा आम्हाला या व्यवसायाच्या माध्यमातून मिळणारा रोजगार न मिळाल्यामुळे आमची उपासमार होत आहे, असे शेवटी सांगितले.

नैसर्गिक वनस्पतींच्या पानावर जेवण करण्याचे फायदे

१. पळसाच्या पानात खाल्ल्याने सोन्याच्या ताटातील चांगुलपणा आणि आरोग्य मिळते.
२. केळीच्या पानांमध्ये खाल्ल्याने चांदीच्या ताटातील चांगुलपणा आणि आरोग्य मिळते.
३. पळसाच्या पानावर जेवल्यामुळे रक्ताच्या अशुध्दपणामुळे होणाऱ्या आजारांसाठी पळसाच्या पानापासून बनवलेले द्रोण उपयुक्त मानले जाते. तसेच पाचन तंत्राशी संबंधित आजारांसाठी व मुळव्याध रुग्णांसाठीही उपयुक्त मानली जाते.
४. सुपारीचे पान सांधेदुखीसाठी उपयुक्त मानली जाते, नव्या पानांपेक्षा जुनी पाने अधिक उपयोगी मानली जाते.
५. पक्षाघात झाल्याने अमलताच्या पाने उपयोगी समजल्या जातात.

१० वर्षांच्या मुलीच्या तोंडात कापड कोंबून निर्घृण बलात्कार, नंतर इमारतीच्या टेरेसवरून फेकली, मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळला

इतर फायदे

  1.  जेवण झाल्यावर पानाला धुण्याची गरज नाही, आपण थेट मातीत पुरून टाकू शकतो.
  2.  पाण्याचे तसेच पर्यावरणाचे प्रदूषण होणार नाही.
  3. प्लास्टिकमध्ये जसे केमिकल असते तसे पानात कोणतेही हानिकारक रसायन नाही.
  4. जास्तीत जास्त झाडांची वाढ होणार, त्यामुळे जास्तीत जास्त ऑक्सिजन मिळेल.
  5. प्रदूषण देखील कमी होईल.
  6. सर्वात महत्वाचं : खराब पाने एकाच ठिकाणी गाडल्या गेल्यावर खत निर्मिती होते आणि मातीची सुपीकता देखील वाढवता येते.
  7. पानापासून ताट वाटी बनवणाऱ्यांनाही रोजगार मिळेल.
  8. सर्वात मुख्य फायदा म्हणजे मोठ्या प्रमाणावर नद्या दूषित होण्यापासून वाचवता येतात.

Web Title: Eco friendly leaflets business threatened by plastic sheets traders starve

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2025 | 06:02 PM

Topics:  

  • Alibaug
  • maharashtra

संबंधित बातम्या

काष्टी–सावर्डे दरम्यान रस्त्यावर झाड कोसळले; ग्रामीण वाहतुकीचा खोळंबा, स्थानिक लोकवस्ती प्रभावित
1

काष्टी–सावर्डे दरम्यान रस्त्यावर झाड कोसळले; ग्रामीण वाहतुकीचा खोळंबा, स्थानिक लोकवस्ती प्रभावित

मरकटवाडी, पाचघर सह दोन गावांचा संपर्क तुटला; गारनदीच्या पुलावर पाणी तुंबले
2

मरकटवाडी, पाचघर सह दोन गावांचा संपर्क तुटला; गारनदीच्या पुलावर पाणी तुंबले

मोखाड्यात चिकनगुनिया सदृश्य रुग्णसंख्येत वाढ; नागरिक चिंतेत
3

मोखाड्यात चिकनगुनिया सदृश्य रुग्णसंख्येत वाढ; नागरिक चिंतेत

महाराष्ट्र $1.5 ट्रिलियन इकोनॉमीकडे कशी झेप घेणार? @ MH 1st Conclave 2025 मध्ये होणार विविध मुद्द्यांवर विचारमंथन
4

महाराष्ट्र $1.5 ट्रिलियन इकोनॉमीकडे कशी झेप घेणार? @ MH 1st Conclave 2025 मध्ये होणार विविध मुद्द्यांवर विचारमंथन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.