मुंबई : शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या घरी संदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे. सकाळी सकाळी संजय राऊतांच्या घरी ईडीच पथक दाखल झालं आहे. पत्राचाळ प्रकरणी त्यांची चौकशी होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांना काही ईडीने चौकशीसाठी नोटीस बजावली होती. मात्र, संसदेच अधिवेशन असल्याचे कारण सांगत ते ईडीच्या कारवाईला सामोरे गेले नव्हते. दरम्यान, त्यांनी ईडीकडून चौकशीसाठी मुदतवाढ मागवून घेतली आहे. त्यानंतर आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारासअचानक ईडीचं पथक थेट राऊत यांच्या घरी पोहचलं. संजय राऊत यांच्यासह त्यांच्या पत्नीची देखील चौकशी होणार आहे. आठ अधिकाऱ्यांची टीम संजय राऊतांच्या घरी चौकशीसाठी पोहोचली आहे. आज दिवसभर ही चौकशी सुरु राहणार असल्याची माहिती आहे.
मुंबईमधील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (म्हाडा) भूखंड आहे. ईडीच्या आरोपानुसार, प्रवीण राऊत यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला ही चाळ विकसित करण्याचे काम देण्यात आले होते. मात्र त्यांनी या जागेचा काही भाग खासगी बिल्डरांना विकला, असा आरोप आहे.