Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पन्हाळा तालुक्यातील शिक्षण  क्षेत्रात खळबळ ; संभाजी बिग्रेडने प्रकरणाला फोडली वाचा

पन्हाळा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत एका शिक्षकाकडून चौथीच्या वर्गातील मुलींशी असभ्य, लैगिक वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

  • By Aparna
Updated On: Nov 20, 2022 | 05:11 PM
पन्हाळा तालुक्यातील शिक्षण  क्षेत्रात खळबळ ; संभाजी बिग्रेडने प्रकरणाला फोडली वाचा
Follow Us
Close
Follow Us:

राम करले, बाजारभोगाव : पन्हाळा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत एका शिक्षकाकडून चौथीच्या वर्गातील मुलींशी असभ्य, लैगिक वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दिवाळीच्या सुट्टीनंतर मुली शाळेत जात नसल्याच्या कारणातून पालकांनी सखोल चौकशी केली असता शिक्षकाच्या वर्तवणूकीची गंभीर बाब समोर आली. नामदेव मारूती पोवार असे संशयित शिक्षकाचे नाव आहे. संभाजी बिग्रेडने या प्रकरणाला वाचा फोडल्यानंतर झोपलेले शिक्षण प्रशासन अॅक्टिव्ह  झाले. दरम्यान या गंभीर  प्रकारामुळे पन्हाळा शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

पन्हाळा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या एका प्राथमिक शाळेत चौथीच्या वर्गाला शिकविणारा शिक्षक नामदेव पोवार या संशयिताने लहान मुलींशी असभ्य, लैंगिक वर्तन केले असल्याची बाब पुढे आली. दिवाळीच्या सुट्टीनंतर काही मुली शाळेला जाणार नसल्याच्या पवित्र्यांमुळे पालकांच्यामध्ये संशय व्यक्त होऊ लागल्याने. याविषयी मुलींच्याकडे चौकशी केली असता नामदेव पोवार हा नराधम शिक्षक आपल्याशी असभ्य लैगिक वर्तन करत असल्याचा मुलींनी पालकांसमोर पाढा वाचल्याने सर्वांना हादराच बसला.

या घटनेची गावात दबक्या आवाजात चर्चा होती;परंतू घटनेबाबत आवाज उठविण्यासाठी कोणी पुढे येत नसल्याने ग्रामपंचायतीने पन्हाळा पोलिस ठाणे, गटविकास अधिकारी आणि तालुका गटशिक्षणाधिकारी यांच्याशी पत्र व्यवहार करून नामेदव पोवार या शिक्षकाचे वर्गातील मुलींशी असभ्य लैगिक वर्तन वारंवार घडत आहे. गावात त्या शिक्षकांबाबत उद्रेक होऊ अघटीत घटना होण्यापूर्वी असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी ग्रामपंचायतीने पत्राद्वारे मंगळवारी केली होती.  मात्र संबंधित तिन्ही विभागाने प्रकरण गांभिर्याने न घेता दुर्लक्षित केले. गेल्या चार दिवसात त्या शिक्षकांवर काही कारवाई झाली नसल्याने गैरवर्तन करणारा शिक्षक मोकाट असल्याने परिसरात संताप व्यक्त होत होता. त्यानंतर पोवार याने पंधरा दिवसाच्या रजेचा अर्ज मुख्याध्यापकाकडे पाठवून फोन स्विच आँफ करून ठेवला आहे.

ग्रामपंचायतीने प्रशासकीय अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केल्यानंतर संभाजी बिग्रेडचे उत्तर जिल्हा अध्यक्ष संदिप यादव तसेच निलेश सुतार,संतोष खोत यांनी मीडियाच्या माध्यमातून या प्रकरणाला शनिवारी वाचा फोडली. त्यानंतर मात्र झोपलेले प्रशासन जागे झाले.  या घडलेल्या प्रकरणाचे गांभिर्य लक्षात येताच शनिवारी सायंकाळी पन्हाळा पोलीस अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांनी ग्रामपंचायतीला भेट देऊन चौकशीला सुरूवात केली.

 मुख्याध्यापकावर निलंबनाची कारवाई करा
शाळेत मुख्याध्यापक हा प्रशासन प्रमुख असतो. शाळेतील सर्व प्रकारावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी त्यांची असते. मात्र  संबंधित शाळेतील मुख्याध्यापकांना हा प्रकार समजला होता. त्यांनी कर्तव्याला जागून तातडीने वरिष्ठांकडे तक्रार करण्यासाठी पुढे येणे गरजेचे होते. उलट आपल्याला हा प्रकार माहित नाही. असा कांगावा करणेचा प्रयत्न संबंधित मुख्याध्यापकांने केल्याची चर्चा असून प्रकरण दडपण्यासाठी ताकद लावलेचे समजते. शाळेतील गंभीर प्रकार मुख्याध्यापकांना माहित नसेल तर कर्तव्यात कसुर केल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक संजयसिंह चव्हाण यांनी तातडीने संबधित मुख्याध्यापकावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी पुढे येत आहे.

शिक्षक संघटना गप्प का ?
‘त्या’ शिक्षकांची असभ्य वर्तणुक समोर येवून देखील शिक्षक संघटना गप्प का? असा प्रश्न उपस्थित  केला जात आहे. प्रकरणाची  सखोल चौकशी करुन संशयितावर बडतर्फीची कारवाई करावी. यासाठी शिक्षक संघटनांनी लेखी निवदने प्रशासनाला देण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे.

[blockquote content=”विद्यार्थ्यांर्थीनींशी असभ्य वर्तन करणाऱ्या त्या शिक्षकावर तातडीने बडतर्फची कारवाई करावी. अन्यथा  प्रशासना विरोधात तीव्र आंदोलन छेडू. ” pic=”” name=”-संदिप यादव, उ.जिल्हा, अध्यक्ष, संभाजी ब्रिगेड”]

[blockquote content=”शिक्षकी पेशाला काळमी फासणारी घटना ‘त्या’ शिक्षकाचे कृत्य शिक्षकी पेशाला काळमी फासणारी घटना आहे. त्यांच्या वर्तवणुकीबाबत वरिष्ठ प्रशासनाला ग्रामपचायतीच्यावतीने लेखी तक्रार केली आहे. परंतु प्रशासनाने गांभीर्याने घेतलेले दिसत नाही. त्याच्यावर कडक कारवाई करावी. अन्यथा सोमवारी (दि.२१) रोजी शाळेला टाळे ठोकू. ” pic=”” name=”-शहाजी खुडे, उपसरपंच, पोर्ले तर्फ ठाणे”]

Web Title: Education sector in panhala taluka sambhaji bigrade crackdown on the matter nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2022 | 05:10 PM

Topics:  

  • kolhapur
  • maharashtra
  • Panhala

संबंधित बातम्या

Leopard News: ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण! आता ‘या’ भागात झाले बिबट्याचे दर्शन
1

Leopard News: ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण! आता ‘या’ भागात झाले बिबट्याचे दर्शन

Mumbai: अवैध मासेमारीला ‘ड्रोन’ चाप लावणार! १९४० नौकांवर कारवाई, पण मच्छीमार समितीचा आक्षेप कायम
2

Mumbai: अवैध मासेमारीला ‘ड्रोन’ चाप लावणार! १९४० नौकांवर कारवाई, पण मच्छीमार समितीचा आक्षेप कायम

म्हाडाची भन्नाट ऑफर! ९० लाख रुपयांचे घर २८ लाखांना! कोणत्या भागात परवडणारे फ्लॅट मिळतात? अर्ज कसा आणि कधी करावा?
3

म्हाडाची भन्नाट ऑफर! ९० लाख रुपयांचे घर २८ लाखांना! कोणत्या भागात परवडणारे फ्लॅट मिळतात? अर्ज कसा आणि कधी करावा?

मालवणी, अंबोजवाडी परिसरात एक हेक्टर शासकीय जमीन अतिक्रमणमुक्त
4

मालवणी, अंबोजवाडी परिसरात एक हेक्टर शासकीय जमीन अतिक्रमणमुक्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.