photo credit: social media
मुंबई : वरळी हिट अँड रन प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्या प्रमाणे पुण्यातील लाडोबाला वाचवण्यासाठी त्याच्या घरच्यांनी प्रयत्न केले होते त्याच प्रमाणे मिहीर शाहाला वाचवण्यासाठीही त्याच्या घरच्यांनी प्रयत्न केल्याची केल्याचे समोर आले आहे. वरळीतील अपघातानंतर पोलिसांनी आरोपीचे वडील आणि शिवसेना उपनेते राजेश शाहा यांना अटक केली आणि त्यांना कोर्टात हजर करण्यात आले. त्यावेळी पोलिसांनी या प्रकरणात यासंदर्भात माहिती दिली आहे.
वरळी हिट अँड रन प्रकरणात पोलिसांनी कोर्टात दिलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर आरोपी मिहीर शाह सध्या फरार आहे. पण त्याला वाचवण्यासाठी अपघातावेळी गाडीमध्ये असलेल्या ड्रायव्हरवर सर्व दोष टाकण्याचा प्लॅन राजेश शाह यांनी केला होता. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर राजेश शाह यांनी मुलाला आणि ड्रायव्हरसोबत लोकेशन बदलायला सांगितले होते. दोघांचे अनेक वेळा कॉलवरून बोलणेही झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. दरम्यान, न्यायालयाने या प्रकरणातील आरोपीचे वडील राजेश शाह यांना 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरळीत अॅट्रिया मॉलजवळील वरळी कोळीवाडा परिसरात राहणारे कावेरी नाखवा आणि त्यांचे पती रविवारी (७ जुलै) पहाटे साडेपाचच्या सुमारास मासे घेण्यासाठी ससून डॉकला जाण्यासाठी घराबाहेर पडले. मासे घेऊन दुचाकीवरुन परतत असताना मिहीर शाह यांच्या यांना गाडीने त्यांना धडक दिली. धडक दिल्यानंतर त्यांना दोन किलोमीटरपर्यंत फरफटत नेले. वरळी सिलिंक येथे मिहीरनं गाडी थांबवली. त्यांनी बंपरमध्ये अडकलेल्या कावेरी यांना बाहेर काढले, गाडीचा ड्रायव्हर गाडीच्या स्टेअरिंगवर बसला. त्यांनी गाडी बाजून घेऊन जाणे अपेक्षित असतानाही त्यांनी गाडी थेट कावेरी यांच्या अंगावर घातली आणि तिथून पळ काढला. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली आहे. तेव्हापासून ते फरार आहेत.
दरम्यान, पोलिसांनी मिहीरविरोधात लुक आऊट नोटीस जारी केली आहे. मिहीर देश सोडून पळून जाण्याचा पोलिसांना संशय असल्याने पोलिसांनी ही लूक आऊट नोटीस जारी केली आहे. पोलीस दोघांचाही शोघ घेत आहेत. अपघाताच्या काही तासांपूर्वी तो जुहू परिसरातील एका बारमध्ये दिसला होता. त्यामुळे अपघातावेळी मिहीर दारूच्या नशेत असल्याचाही संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.