Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दक्षिण आणि दक्षिण मध्य मुंबईमध्ये कोणाचा राहणार वरचश्मा? भाजपा आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांचे मुसंडी मारायचे प्लॅनिंग

Municipal Election Result 2026 : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांची धामधूम सध्या सुरु असून उबाठा शिवसेनेचा वरचष्मा असणाऱ्या भागात कोणाचा वरचश्मा राहणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jan 08, 2026 | 11:43 AM
दक्षिण आणि दक्षिण मध्य मुंबईमध्ये कोणाचा राहणार वरचश्मा? भाजपा आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांचे मुसंडी मारायचे प्लॅनिंग

दक्षिण आणि दक्षिण मध्य मुंबईमध्ये कोणाचा राहणार वरचश्मा? भाजपा आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांचे मुसंडी मारायचे प्लॅनिंग

Follow Us
Close
Follow Us:
  • दक्षिण आणि दक्षिण मध्य मुंबईमध्ये कोणाचा राहणार वरचश्मा
  • भाजपा आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांचे मुसंडी मारायचे प्लॅनिंग
  • ठाकरे ब्रँड एकत्र असल्याने ही लढाई टफ होणार
मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांची धामधून सध्या सुरु आहे. तर दुसरीकडे कुलाबा ते धारावी असे दोन टोकाचे भाग मुंबईच्या या भागात आहेत. मंत्रालय, विधानभवन, मुंबई स्टॉक एक्स्चेंज, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई सेंट्रल रेल्वेस्थानक तसेच अर्थराजधानी मुंबईचे आर्थिक हृदयदेखील याच भागात आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत मुंबईच्या या भागात कोण बाजी मारणार, याची निश्चितच उत्सुकता सगळ्यांना असणार आहे. प्रामुख्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा वरचष्मा असणाऱ्या या भागात भाजपा आणि एकनाथ शिंदे यांनी मुसंडी मारायचे प्लॅनिंग निश्चित केले आहे, मात्र यावेळी ठाकरे ब्रँड एकत्र असल्याने ही लढाई टफ होणार, हे निश्चित आहे.

दक्षिण मुंबई हा भाग संमिश्र असा आहे. कुलाबा, मलबारहिल, कफ परेड असा धनाढ्य लोकांचा भाग आहे, तर दुसरीकडे परळ, लालबाग, शिवडी, भायखळा असा मध्यमवर्गीय भाग आहे. दादर शिवाजी पार्क येथे उच्च मध्यमवर्गीयांची वस्ती आहे, तर धारावी ही आशियातील मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखली जाते. या भागात मोठ्या प्रमाणात सेस इमारतींचे पुनर्वसनाचे प्रश्न आहेत.

Local Body Elections: निवडणूक ड्युटीचा ‘ओव्हरलोड’; कनिष्ठ लिपिकांमध्ये भीतीचे वातावरण

ठाकरे ब्रँडचे महायुतीला आव्हान; वेगळी रणनीती?

राज्यात सध्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची पिछेहाट होत असली तरी मुंबईच्या या भागाने उदधव ठाकरेंना विधानसभेत हात दिला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडानंतर राज्यात अनेक ठिकाणी दमदार कामगिरी केलेली असली तरी या भागातील रस्त्यावरचा शिवसैनिक अदयाप तरी म्हणावा तितका त्यांच्यासोबत वळविण्यात त्यांना यश आलेले दिसत नाही, तो बऱ्याचशा प्रमाणात अद्यापही उद्धव ठाकरेंसोबत आहे. भाजपा हा मराठी तसेच अमराठी मतदारांवर विसंबून असणार आहे. राज ठाकरे यांचा मनसे फॅक्टर सोबत असल्याने उद्धव ठाकरे यांना मोठी मदत होणार आहे. महापालिकेला विजयाचे मार्जिन पावशे-हजार मतांच्या आसपास असू शकेल.

त्यामुळे एकत्र आलेल्या ठाकरे ब्रेडला टफ देण्यासाठी भाजपा आणि एकनाथ शिंदे यांना वेगळी रणनीती या भागासाठी आखावी लागणार आहे. लोकसभा आणि विधानसभेत या भागातील मुस्लिम मतदारांनी उदधव ठाकरेच्या उमेदवारांना बऱ्यापैकी साथ दिली होती, पण महापालिकेत काँग्रेस वेगळी लढणार आहे. त्यामुळे मुस्लिम मतांचे विभाजन महायुतीच्या पथ्यावर पडू शकते. अटलसेतु, मेट्रो मोनो आदी विकासकामे भाजपाला सोयीची ठरू शकतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरपालिका नगरपंचायत निवडणुकांत प्रचार हा विकासाच्या मुददयावर केंद्रित ठेवला होता. ठाकरे बंधूच्या मराठी आदी भावनिक मुख्यांना मुख्यमंत्री फडणवीस मुंबई महापालिकेच्या प्रचारातही विकासाच्या मुख्यावरच काउंटर करतील, अशी अपेक्षा आहे.

बदलत्या काळासोबत राजकारणही बदलले

कधी काळी गिरणगाव म्हणूनही या भागाची ओळख होती. गिरणी कामगार मोठ्या प्रमाणात या भागात राहायचा. मुंबईतील अनेक राजकीय-सामाजिक चळवळीचे केंद्रदेखील हा भाग होता. कॉग्रेस, कम्युनिस्ट यांचा कधीकाळी बालेकिल्ला असणाऱ्या या भागात नंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नावाच्या वादळाने आपला वरचष्मा निर्माण केला. वडील काँग्रेसी कम्युनिस्ट कार्यकर्ते, तर त्याच घरातील तरूण मुलगा शिवसैनिक असे चित्र अनेक घरात दिसायचे, पण बदलत्या काळासोबत राजकारणही बदलत गेले. सामाजिक वीणही बदलत गेली. आज परळ-लालबाग, भायखळा शिवडी या भागात मोठमोठाले टॉवर उभे राहिले आहेत. मॉल्सची रेलचेल झाली आहे. सार्वजनिक उत्सवांना आलेल्या व्यावसायिक रूपाने अर्थकारणही बदलले आहे.

नेमके कोण बाजी मारणार?

माहिम, वरळी, शिवडी, भायखळा या चार विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरेंचे शिलेदार आहेत. त्यातील वरळीतून तर आदित्य ठाकरेच निवडून गेले आहेत. मलबार हिल, कुलाबा, सायन कोळीवाडा हे भाजपा, तर धारावी-मुंबादेवी हे काँग्रेसच्या ताब्यात आहेत, महापालिका निवडणुकांत त्यामुळे नेमकी कोण बाजी मारणार, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

Kamothe Checkpost Cash Seizure: निवडणुकीपूर्वी मोठी कारवाई! कामोठे चेकनाक्यावर गाडीतून १७ लाखांची रोख रक्कम जप्त

Web Title: Who will stay in south and south central mumbai municipal election result 2026 news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 08, 2026 | 11:43 AM

Topics:  

  • BMC Election 2026
  • Municipal Election Result 2026
  • shivsena

संबंधित बातम्या

‘…अन् मगच काँग्रेसने आमच्यावर बोलावे’; उपमुख्यमंत्री शिंदेंचा हल्लाबोल
1

‘…अन् मगच काँग्रेसने आमच्यावर बोलावे’; उपमुख्यमंत्री शिंदेंचा हल्लाबोल

नवी मुंबई महानगरपालिकेच्या ‘या’ प्रभागात होणार नाहीत निवडणुका; उच्च न्यायालयाने दिली अंतरिम स्थगिती
2

नवी मुंबई महानगरपालिकेच्या ‘या’ प्रभागात होणार नाहीत निवडणुका; उच्च न्यायालयाने दिली अंतरिम स्थगिती

Devendra Fadnavis on UBT: “तुमचा स्क्रिप्ट रायटर बदला…”, राज-उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर मुख्यमंत्र्यांची जळजळीत टीका
3

Devendra Fadnavis on UBT: “तुमचा स्क्रिप्ट रायटर बदला…”, राज-उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर मुख्यमंत्र्यांची जळजळीत टीका

भारतीय सैन्याला शिवसेनेकडून मदतीचा हात, शत्रूपासून आणि बदलत्या हवामानापासून संरक्षण व्हावे यासाठी दिले ५० कंटेनर
4

भारतीय सैन्याला शिवसेनेकडून मदतीचा हात, शत्रूपासून आणि बदलत्या हवामानापासून संरक्षण व्हावे यासाठी दिले ५० कंटेनर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.