Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ladki Bahin Yojna: लाडकी बहीण योजनेतील आठ लाख महिलांना दणका; १५०० ऐवजी फक्त ५०० रूपयेच मिळणार

ऑक्टोबर २०२४ मध्ये या योजनेसाठी सुमारे २.६३ कोटी अर्ज प्राप्त झाले होते. प्राथमिक पडताळणीनंतर ११ लाख अर्ज अपात्र ठरवले गेले असून, पात्र अर्जांची संख्या २.५२ कोटींवर आली आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Apr 15, 2025 | 10:05 AM
Ladki Bahin Yojna: लाडकी बहीण योजनेतील आठ लाख महिलांना दणका;  १५०० ऐवजी फक्त ५०० रूपयेच मिळणार
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई:   राज्यातील सुमारे ८ लाख लाभार्थी महिलांना आता ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत दरमहा केवळ ५०० रुपयांचा लाभ मिळणार आहे. याचे कारण असे की, या बहिणींना यापूर्वीच ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेतून दरमहा १,००० रुपये मिळत आहेत. ‘लाडकी बहीण’ योजनेच्या नियमांनुसार, लाभार्थ्यांनी अन्य शासकीय योजनांचा लाभ घेणे शक्य आहे; मात्र एकूण मिळणारा मासिक लाभ १,५०० रुपयांच्या वर जाऊ नये, असा अट आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर राज्य सरकारने ‘लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांची बारकाईने तपासणी सुरू केली आहे. या योजनेचा लाभ केवळ पात्र महिलांनाच मिळावा, यासाठी अर्जांची पुन्हा एकदा छाननी केली जात आहे. ऑक्टोबर २०२४ मध्ये या योजनेसाठी सुमारे २.६३ कोटी अर्ज प्राप्त झाले होते. प्राथमिक पडताळणीनंतर ११ लाख अर्ज अपात्र ठरवले गेले असून, पात्र अर्जांची संख्या २.५२ कोटींवर आली आहे.

IPL 2025 :राजस्थानकडून ‘हा’ १३ वर्षीय खेळाडू करणार राडा! आरआरने दिले संकेत, पहा व्हिडिओ 

फेब्रुवारी आणि मार्च २०२५ या महिन्यांत २.४६ लाख महिलांच्या खात्यात योजनेअंतर्गत निधी जमा करण्यात आला आहे.सध्या राज्यभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये आलेल्या अर्जांची पुन्हा तपासणी सुरू असून, पात्र ठरलेल्या महिलांच्या खात्यात पुढील हप्ता लवकरच जमा केला जाईल, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी स्पष्ट संकेत दिले होते की, ‘लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांची सखोल पडताळणी केली जाणार आहे. त्यांनी असेही सांगितले होते की, अर्जांची तपासणी झाल्यानंतर लाभार्थ्यांची संख्या सुमारे १० ते १५ लाखांनी कमी होण्याची शक्यता आहे. योजनेचे निकष अथवा निधीत कोणताही बदल करण्यात आलेला नसून, फक्त पात्र महिलांनाच हप्ता मिळावा यासाठीच ही प्रक्रिया राबवली जात आहे, असे स्पष्टीकरण फडणवीस यांनी दिले होते.

मोठी बातमी ! एनडीएसोबत असलेल्या ‘या’ पक्षाने सोडली साथ; नवीन घोषणा करत म्हटलं

निर्णयामागील कारणे काय?

‘नमो शेतकरी योजना’चा लाभ घेणाऱ्या सुमारे आठ लाख महिलांना ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत यापुढे दरमहा फक्त ५०० रुपये मिळणार आहेत. याआधी त्यांना एकूण १५०० रुपयांचा लाभ मिळत होता. मात्र, ‘लाडकी बहीण’ योजनेनुसार, एकाच लाभार्थ्याला विविध शासकीय योजनांमधून मिळणाऱ्या आर्थिक सहाय्याची एकूण मर्यादा मासिक १५०० रुपये इतकी आहे.

या महिलांना ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेतून वर्षभरात ६,००० रुपये मिळतात. याशिवाय, केंद्र सरकारच्या ‘पंतप्रधान किसान सन्मान निधी’ योजनेतूनही आणखी ६,००० रुपयांचा लाभ मिळतो. म्हणजेच या महिलांना एकूण १२,००० रुपये दरवर्षी आधीच शासकीय योजनांमधून मिळत आहेत. त्यामुळे ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत त्यांना उरलेले ६,००० रुपयेच मिळणार असून, त्याचा मासिक हप्ता ५०० रुपये इतका असेल.

राज्य सरकारने २०२३ मध्ये केंद्र शासनाच्या ‘पंतप्रधान किसान सन्मान निधी’च्या धर्तीवर ‘नमो महासन्मान निधी’ योजना सुरू केली होती. या योजनेतून पात्र शेतकऱ्यांना तीन टप्प्यांत वार्षिक ६,००० रुपयांची मदत दिली जाते. प्रत्येक चार महिन्यांत दोन हजार रुपये थेट बँक खात्यात जमा होतात.

Web Title: Eight lakh women under ladki bhaeen yojana will now get only rs 500 instead of rs 1500

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2025 | 09:35 AM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Eknath Shinde
  • Ladki Bahin Yojana

संबंधित बातम्या

‘अभिजात मराठी’ ओटीटी प्लॅटफॉर्मचा लोकार्पण सोहळा संपन्न
1

‘अभिजात मराठी’ ओटीटी प्लॅटफॉर्मचा लोकार्पण सोहळा संपन्न

पुणे-नाशिक महामार्गावरील पेट्रोल पंपावर दरोडा; चोरट्यांनी हवेत गोळीबार केला अन्…
2

पुणे-नाशिक महामार्गावरील पेट्रोल पंपावर दरोडा; चोरट्यांनी हवेत गोळीबार केला अन्…

पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी संकटात; शरद पवारांनी सरकारकडे केली ‘ही’ मोठी मागणी
3

पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी संकटात; शरद पवारांनी सरकारकडे केली ‘ही’ मोठी मागणी

Sugarcane Bill : प्रतिटनामागे 15 रुपयांची कपात; सरकारच्या निर्णयावरुन शेतकऱ्यांत संतप्त पडसाद
4

Sugarcane Bill : प्रतिटनामागे 15 रुपयांची कपात; सरकारच्या निर्णयावरुन शेतकऱ्यांत संतप्त पडसाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.