IPL 2025 :राजस्थानकडून 'हा' १३ वर्षीय खेळाडू करणार राडा! (फोटो-सोशल मिडिया)
IPL 2025 : आयपीएल 2025 चा 18 वा हंगामात चांगलाच रंग पकडू लागला आहे. आतापर्यंत 30 सामने खेळवण्यात आले आहेत. पॉइंट टेबलमध्ये देखील आता संघासंघात स्पर्धा दिसू लागली आहे. काही संघ चांगली कामगिरी करुण आघाडीवर आहेत तर काहींची कामगिरी मात्र निराशाजनक असल्याचे दिसून येत आहे. अशाच प्रकारे राजस्थान रॉयल्सची आयपीएल २०२५ मध्ये आतापर्यंत कामगिरी निराशाजनक राहिली आहे. राजस्थानने आतापर्यंत ६ सामने खेळले असून या काळात त्यांनी फक्त दोन सामन्यातच विजय मिळवला आहे. तर चार सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.
आता राजस्थान एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. हे उल्लेखनीय आहे की राजस्थानने यावर्षी १३ वर्षीय खेळाडू वैभव सूर्यवंशीवर विश्वास दाखवून त्याला खरेदी केले होते. आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावात, राजस्थानने १.१० कोटी रुपये देऊन वैभवला आपल्या ताफ्यात समाविष्ट करुण घेतले होते.
काही काळानंतर वैभव सूर्यवंशी हा १४ वर्षांचा पूर्ण होणार आहे. असे बोलले जाता आहे आहे की, याआधी तो आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून पदार्पण करण्याची डाट शक्यता आहे. तर दुसरीकडे, वैभव स्वतः त्याच्या पदार्पणाची तयारी करण्यासाठी कठोर परिश्रम करताना दिसून येत आहे. सरावादरम्यान, वैभव जोफ्रा आर्चरविरुद्ध नेटमध्ये काही सराव करत असताना चांगले शॉट्स मारताना दिसून आला आहे.
हेही वाचा : LSG vs CSK : हे केवळ धोनीच करू शकतो..! ‘थाला मॅजिक’ने एलएसजीचा फलंदाज वाईड बॉलवर माघारी.., पहा व्हिडिओ
वैभव कधी पदार्पण करणार? याबाबत अद्याप माहिती नाही. हे फक्त राजस्थान रॉयल्सच सांगू शकतो. पण संघाकडून असे काही संकेत नक्कीच देण्यात आले आहेत. हे पाहून, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे की, वैभव लवकरच आरआरमध्ये सामील होईलअ आणि लवकरच पदार्पण करेल. सोमवारी, तो नेटमध्ये जोफ्रा आर्चरविरुद्ध फलंदाजी करताना दिसून आला तसेच त्याने जोफ्रा आर्चरला शानदार फटके देखील मारले.
हेही वाचा : MI vs DC : ‘चेंडू बदलल्याने संघाला फायदा..’, दिल्लीच्या फलंदाजीला सुरुंग लावणाऱ्या कर्ण शर्माचे प्रतिपादन
सोमवारी, राजस्थान रॉयल्सने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरुन एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये वैभव सूर्यवंशी जोफ्रा आर्चरचा चेंडू खेळताना दिसून येत आहेत. व्हिडिओमध्ये दिसतंय की १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीने एकूण ८ चेंडूंपैकी ६ चेंडूवर मोठे फटके मारले आहेत. वैभव जोफ्रा आर्चरला अगदी सहज शॉट्स मारताना दिसत आहे. यादरम्यान, वैभव सूर्यवंशीने जोफ्रा आर्चरच्या ६ चेंडूत २७ धावा काढल्या आहेत. सध्या, आयपीएल २०२५ मध्ये राजस्थान रॉयल्सची स्थिती पाहता, ते त्यांच्या संघात बदल करण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीमध्ये व्यवस्थापन वैभव सूर्यवंशीला संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देऊ शकते असे बोलले जात आहे.