एकनाथ शिंदेंचे सर्व मंत्री अजित पवारांवर नाराज, आढावा बैठकीत 'दादां'चीच चर्चा
अजित पवार महायुतीत सहभागी झाल्यापासून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत नाराजीचा सूर आहे. मध्यंतरी उघड उघड एकमेंकाविरोधात टीकाही करण्यात आली. दरम्यान आजच्या शिवसेनेच्या बैठकीतही अजित परांवरच चर्चा झाली असून सर्व मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर बैठक बोलावली होती.
काँग्रेसचा बडा नेता शिंदेंच्या शिवसेनेत जाणार; पक्षप्रवेशाची तारीखही ठरली
या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या प्रत्येक मंत्र्यासोबत ‘वन टू वन’ चर्चा केली. प्रत्येक खात्याचा आढावा घेतला. मात्र, शिंदेंच्या मंत्र्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबतची नाराजी उघडपणे बोलून दाखवली. त्यामुळे शिंदेंचे सर्व मंत्री अजित पवार यांच्यावर नाराज असल्याचं समजतंय.
लवकर कामे पूर्ण करा, शिंदेंच्या मंत्र्यांना सूचना
शिंदेंनी आजच्या बैठकीत प्रत्येक खात्याचा आढावा घेतला. किती कामे केली, किती बाकी आहेत? निधी संदर्भात काही अडचणी आहेत का? भविष्यात कोणती महत्त्वाची कामे हाती घेणार? अशा सर्व बाबींची माहिती घेतली. दरम्यान, फाइल पेंडिंग ठेऊ नका, सामान्य लोकांपर्यंत पोहोचा, लोकोपयोगी कामांवर भर द्या, लवकरात लवकर कामे पूर्ण करा, अशा सूचना देखील त्यांनी मंत्र्यांना केल्या आहेत.
मात्र आमच्या विकास कामांमध्ये अजित पवार खोडा घालत असल्याची तक्रार मंत्र्यांनी केली आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मंत्र्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत मंत्र्यांनी अजित पवार यांच्या विरोधात आवाज उठवला आहे.
Sharad Pawar: पवारांवरील ‘त्या’ विधानाच्या केसमध्ये पडळकरांबाबत कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
अजित पवार अर्थमंत्री असून जर आमच्या खात्यांना निधी देत नसतील तर आम्ही काम कसं करणार? अशी चिंता देखील मंत्र्यांनी व्यक्त केली आहे. सरकारमध्ये सर्वांना समान अधिकार मिळायला हवेत, असंही त्यांनी म्हटलं आहे. मंत्र्यांच्या नाराजीनंतर, एकनाथ शिंदे यांनी अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून मार्ग काढेन, असा शब्द दिला आहे.