गोपीचंद पडळकर आणि शरद पवार (फोटो -सोशल मिडिया)
बारामती: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरुद्ध केलेल्या आक्षेपार्ह विधानाबद्दल आमदार पडळकर यांच्या विरोधात बारामती न्यायालयात दाखल झालेल्या खटल्यातून बारामती न्यायालयाने आ. पडळकर यांची निर्दोष मुक्तता केली. २०२० मध्ये कोरोनाच्या काळात गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केले होते.
त्यांच्या या वक्तव्याबद्दल बारामती पोलीस ठाण्यात आमदार पडळकर यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे तत्कालीन युवा शहराध्यक्ष अमर धुमाळ यांनी फिर्याद दाखल केल्यानंतर पडळकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आमदार पडळकर यांच्या वतीने ॲड अमोल सातकर व ॲड रणजीत गावडे यांनी न्यायालयापुढे बाजू मांडताना, पडळकर यांच्या विरोधात दाखल झालेले भा.द. वि.५०५(२) हे कलम एखाद्या व्यक्तीने सामाजिक, धार्मिक, जात, पंथ या अनुषंगाने वक्तव्य करून दोन समाजामध्ये जातीय तेढ निर्माण होऊन दंगल होईल असे वक्तव्य केल्यानंतर दाखल केले जाते.
31 मे ला अडवलं, जुलैमध्ये सरकारच गेलं, गोपीचंद पडळकरांचा रोहित पवारांवर निशाणा
आमदार पडळकर यांच्या वक्तव्यामुळे कोणत्याही प्रकारची सामाजिक तेढ निर्माण झाली नाही, त्याचबरोबर तत्कालीन तपासी अधिकारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक मुकुंद पालवे यांनी न्यायालयात दाखल केलेल्या दोषारोप पत्रासोबत कोणताही सबळ पुरावा दाखल केला नाही. वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून बारामती न्यायालयातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी दुर्गा पुजारी यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांची सदर घटल्यातून निर्दोष मुक्तता केली.
गोपीचंद पडळकरांचा रोहित पवारांवर निशाणा
दरम्यान भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. दोन वर्षांपूर्वी चौंडी येथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गोपीचंद पडळकर यांना चौंडीत येण्यापासून रोखण्यात आलं होतं, यावर त्यांना त्यांचं प्रायचित्त मिळाला असल्याची टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.
जतचा दुष्काळ कायमचा हटवणार; आमदार गोपीचंद पडळकर
प्रस्थापित राजकारण्यांनी दुष्काळी जत, आटपाडी, खानापूरसारख्या तालुक्यांवर मोठा अन्याय केला. या अन्यायाच्या विरोधात माझी लढाई आहे. जत तालुक्याने मला भरभरून प्रेम दिले आहे. त्यामुळे इथले सारे प्रश्न सोडवणे, हे माझं कर्तव्य आहे. निवडणुकीत जी काही आश्वासने दिली, त्यातला एकही प्रश्न राहणार नाही. याउलट हा मतदारसंघ पाहायला लोक येतील, असे सांगून पुढच्या दोन वर्षांत जत तालुक्यात दुष्काळ कायमचा हटवणार, असे आश्वासन भाजप नेते तथा आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिले.