मुंबई : शिवसेनेच्या आमदारांनी बंड पुकारल्यामुळे सध्या महारष्ट्राचं अख्ख राजकारण हादरलंय. मंत्री एकनाथ शिंदे हे काही आमदारांना घेऊन निधून गेल्याने शिवसेनेतील धूसफूस चव्हाट्यावर आली. सध्या शिंदे यांचा गुवाहाटीमध्ये मुक्काम असून आपल्यासोबत शिवसेनेचे बहुसंख्य आमदार असल्याचा त्यांचा दावा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची साथ सोडून भाजपसोबत सरकार बनविण्यावर शिंदे ठाम आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलं आहे.
दरम्यान या बंडखोर आमदारांच्या विरोधात शिवसेनेने आता कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे. शिंदे गटातील १६ आमदारांवर निलंबनाची कारवाई कारवाई करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे, या प्रकरणी आता एकनाथ शिंदे गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आमदारांचे निलंबन आणि गटनेता यांच्यावरील कारवाई विरोधात आता सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. उद्या या संदर्भात सुनावणी होणार असल्याचे बोलले जात आहे, यामुळे आता शिंदे गट विरुद्ध शिवसेना असा सामना कोर्टात रंगणार आहे.
[read_also content=”शिवसेना आमदार संतोष बांगर यांच बंडखोर आमदारांबाबत वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले… https://www.navarashtra.com/maharashtra/shiv-sena-mla-santosh-bangars-controversial-statement-about-rebel-mlas-said-nrdm-297412.html”]