मुंबई: राज्याच्या राजकीय वर्तुळातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. विधानसभेच्या निकालानंतर महायुतीला घवघवीत यश तर मिळालं, पण राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार, याबाबत राज्यभरात चर्चांना उधाण आले आहे. भाजप आणि शिंदे गटाकडून मुख्यमंत्रिपदासाठी जोरदार चढाओढ सुरू आहे. पण देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्रीपद मिळणार हेही जवळपास निश्चित झाले आहे. एकनाथ शिंदे हेदेखील मुख्यमंत्रीपदासाठी नाराज आहेत. त्यातच आता देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद मिळाल्यास मी बाहेरून पाठिंबा देण्यास तयार आहे, असा निरोप एकनाथ शिंदे यांनी भाजप नेतृत्त्वापर्यंत पोहचवला असल्याची बातमी समोर आली आहे. पण याबाबत अद्याप दोन्ही पक्षांतील नेत्यांनी दुजोरा दिलेला नाही. एका वृत्तवाहिनीने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुकांनंतर महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण होणार, याबाबत अनेक तर्कवितर्क काढले जात होते. पण विधानसभा निवडणुकीतील देवेंद्र फडणवीसांची मेहनत आणि त्यांचे कष्ट पाहता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्रीपद दिले जावे,यासाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वावर दबाव टाकला जात आहे. दुसरीकडे महाराष्ट्रातही बिहार पॅटर्न राबवावा आणि एकनाथ शिंदे यांना मुखअयमंत्रीपद द्यावे अशी मागणी होत आहे. भाजप बिहार पॅटर्न राबवण्याच्या मनस्थितीत नाही. इतकेच नव्हे तर भाजपने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला नव्हता,असेही भाजपकडून सांगितले जात आहे. महायुतीत सामील असलेल्या एकनाथ शिंदेंना आपल्याला पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपद मिळावे, अशी अपेक्षा आहे. तर भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्रीपद मिळावे, यासाठी जोर लावला जात आहे. त्यामुळे भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यात सध्या नाराजीचा सूर उमटू लागला आहे.
Adani Bribery Case: कंपनीने लाचखोरी केली नाही, ती चूक अधिकाऱ्यांची; अदानींनी फेटाळले अमेरिकेचे आरोप
एकीकडे देवेंद्र फडणवीस यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी फायनल होत आहे. त्यामुळे भाजपच्या केंद्रातील पक्षश्रेष्ठींकडून एकनाथ शिंदे यांना दोन पर्याय देण्यात आले आहेत. नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद घ्या किंवा केंद्र सरकारमध्ये सामील व्हा आणि तुमच्या मुलाला म्हणजेच श्रीकांत शिंदे यांना राज्य सरकारमध्ये पाठवा, असे दोन प्रस्ताव भाजपने एकनाथ शिंदे यांच्यासमोर ठेवले आहेत. पण एकनाथ शिंदे यांनी भाजपचे हे प्रस्ताव धुडकावलयाची माहितीही समोर आली आहे. एकनाथ शिंदे यआणि फडणवीस यांच्यात चर्चा झाली पण कोणताही निर्णय़ झाला नाही. त्यामुळे या विषयात आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच हस्तक्षेप करतील, असे वृत्त आहे. इतकेच नव्हे तर भाजपच्या दोनही ऑफर्स धुडकावल्यानंतर ही एकनाथ शिंदे कोणाशीही भेटीगाठी घेण्याचेही टाळत असल्याची माहिती आहे.
एकनाथ शिंदे यांनी भाजपचा प्रस्ताव फेटाळत भाजपचा प्रस्ताव अमान्य केला. पण त्याचवेळी त्यांनी भाजपला त्यांच्याकडून दुसरा प्रस्ताव पाठवत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यास आपण सरकारला बाहेरून पाठिंबा देण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. पण भाजपनेही एकनाथ शिंदेंचा प्रस्ताव मान्य नसल्याचे सांगण्यात येत आहे. एकनाथ शिंदेनी सरकारमध्येच राहावं अशी भाजपची इच्छा आहे. यासंदर्भात एकनाथ शिंदे आणि भाजप हायकमांडशी चर्चा सुरू आहे.
Rahul Gandhi: “अदानी जेलमध्ये असले पाहिजेत, सरकार त्यांना वाचवतंय”,राहुल गांधी यांची मागणी
विधानसभा निवडणुकांचा निकाल 23 नोव्हेंबरला लागला. त्यानंतर राज्यात नव्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद मिळणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. तेव्हापासून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील दुरावा अगदी स्पष्टपणे दिसून येत आहे. निकालानंतर झालेल्या प्रेस कॉन्फरन्सनंतर आणि त्यानंतर राजभवानात राजीनामा देतेवेळीही दोघांमधील दुरावा स्पष्टपणे दिसून आला. त्यातच एकनाथ शिंदे यांनी मौन बाळगल्यामुळे हा प्रश्न अधिकच वाढला आहे. त्यांच्या मौनामागे नेमके काय कारण आहे, हेही अदयाप कळू शकलेले नाही.