Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेसंदर्भात अनेक प्रश्न महिलांच्या मनात निर्माण झाले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून योजनेचे हप्ते उशिरा मिळत आहेत, आणि अजूनही सप्टेंबर महिन्याचा हप्ता आलेला नाही. यामुळे लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर स्वतः प्रतिक्रिया दिली आहे.
लाडकी बहीण योजनेमुळे (Ladki Bahin Yojana) राज्य सरकारच्या तिजोरीवर ताण येत आहे. या योजनेसाठी दर महिन्याला कोट्यवधींचा निधी लागतो, ज्यामुळे काही आमदारांचेही निधी थकले असल्याची माहिती समोर आली आहे. अशा परिस्थितीत लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत माहिती दिली आहे.
लाडकी बहीण योजनेसंदर्भात काल दसरा मेळाव्यात बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, ‘ही योजना बंद होणार असल्याची भिती महिलांच्या मनात निर्माण झाली आहे. पण ही योजना कधीच बंद होणार नाही. कायम सुरूच राहणार आहे.
सरकारने लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या योजनेत महिलांसाठी केवायसी (KYC) करणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. अनेक महिलांनी आपली केवायसी यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे, परंतु काही महिलांना तांत्रिक अडचणींमुळे केवायसी करण्यात अडचणी येत आहेत.
Ramdas Kadam on Balasaheb Thackeray Death: ‘बाळासाहेबांचं आधीच निधन अन् बॉडी ठेवून
एकनाथ शिंदे यांनी या वेळी आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकीर्दीत घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांची यादी सादर केली. त्यांनी सांगितले की, पाच कोटी लोकांच्या घरांपर्यंत जाऊन शासनाच्या “आपल्या दारी” योजनेचा लाभ दिला गेला. अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकीर्दीत केलेल्या कामगिरीमुळे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला एकतर्फी विजय मिळाला आणि आमच्या २३२ जागा निवडून आल्या. “शेतकऱ्यांना सर्व निकष बाजूला ठेवून मदत दिली जाईल.” असही त्यांनी यावेळ नमुद केलं.