
अजब गजब! मुदत संपली तरी प्रचार करता येणार; Election Commission च्या 'या' निर्णयाने नवीन वाद
राज्यात आज महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस
प्रचाराची मुदत संपल्यावर देखील करता येणार प्रचार
15 तारखेला मतदान आणि 16 तारखेला निकल जाहीर होणार
Election Comission of Maharashtra: राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी आहे. 15 तारखेला राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर लगेच दुसऱ्या दिवशी 16 तारखेला निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान आज प्रचाराची मुदत संपणार आहे. मात्र राज्य निवडणूक आयोगाने (Election Comission) घेतलेल्या निर्णयामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
आज प्रचार मुदत संध्याकाळी संपणार आहे. मात्र राज्य निवडणूक आयोगाने एक मोठा निर्णय घेतला आहे. प्रचाराची मुदत संपल्यावर देखील उमेदवारांना घरोघरी जाऊन प्रचार करता येणार आहे. या निर्णयामुळे सर्वत्र एकच आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 15 जानेवारीला मतदान सुरू होईपर्यंत उमेदवार घरोघरी जाऊन प्रचार करू शकणार आहेत.
संध्याकाळी ५ वाजता लागेल आचारसंहिता! ती नेमकी कधी लागू होते? काय असतात नियम? जाणून घ्या
आज संध्याकाळी प्रचार करण्याची मुदत संपणार आहे. मात्र राज्य निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयानुसार उमेदवारांना घरोघरी जाऊन प्रचार करता येणार आहे. मात्र उमेदवारांना पत्रके वाटता येणार नाहीयेत. त्यामुळे निवडणूक आयोगेन घेतलेल्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात आणि सामान्य नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची घोषणा
राज्यातील बारा जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी ५ फेब्रुवारी २०२६ या दिवशी होणार आहे. मतमोजणी ७ फेब्रुवारी रोजी होईल. सातारा सांगली कोलहापूर, सोलापूर, परभणी, बीड, संभाजीनगर जालना, सिंधुदुर्ग रत्नागिरी इ. जिल्ह्यात मतदान होणार आहे.
५० टक्क्यांच्या आत आरक्षण असलेल्या निवडणुका होणार आहेत. १ जुलै २०२५ ची मतदार यादी ग्राह्य धरली जाईल.या निवडणुकीत दोन मते द्यायची आहेत. एक जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणाला द्यावी लागेल. नामनिर्देशन प्रक्रिया ऑफलाईन असेल, यासोबतच जातवैधता पडताळणी आवश्यक आहे. ती नामनिर्देशन पत्रासोबत द्यायची आहे.
एकूण मतदार – 2.09 कोटी
एकूण महिला मतदार- १.०३ कोटी
एकूण पुरूष मतदार- १.०७ कोटी