फोटो सौजन्य - Social Media
महाराष्ट्रात राज्यभरात महानगरपालिकेच्या निवडणुकीने जोर धरला आहे. राज्यातील एकूण २९ महानगरपालिकेच्या खुर्चीवर सत्ता कुणाची असणार? कुणाचा महापौर महानगरपालिकेची धुरा सांभाळणार? याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे. विधानसभेचा अंदाज महानगरपालिकेतूनच बांधता येतो. त्यामुळे भविष्यात राज्याच्या खुर्चीत बदल होणार असेल तर याचा सुगावा महानगरपालिकेच्या निवडणुकीतूनच लागतात.
कुणाच्या मागे किती पाठबळ? हा प्रश्न तर नंतरचा विषय आहे पण सर्वात महत्वाचं म्हणजे आज राज्यभरात होणाऱ्या प्रचार कार्यक्रमांना थांबा मिळणार आहे. आज प्रचार संपतील आणि संध्याकाळी ५ वाजता आचार संहिता लागू होईल. पण ही आचार संहिता नेमकी असते तरी काय? चला जाणून घेऊयात ना!
आचार संहिता म्हणजे एखाद्या व्यक्तीने, संस्थेने किंवा संघटनेसाठी योग्य वागणूक, शिस्त, पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा राखण्यासाठी ठरवलेले नियम म्हणजे आचारसंहिता. निवडणुकांच्या काही दिवसांअगोदर आचार संहिता लागू केली जाते.
आचार संहितेचे काही उद्देश आहेत. यामध्ये शिस्त आणि नीतीमत्ता राखणे, गैरप्रकार, पक्षपात आणि भ्रष्टाचार रोखणे, सर्वांशी समान वागणूक सुनिश्चित करणे आणि व्यवस्था सुरळीत आणि न्याय्य ठेवणे यांचा समावेश आहे. निवडणुकीच्या अगोदर जाहीर करण्यात आलेल्या आचारसंहितेदरम्यान निवडणूक आचारसंहिता लागू असताना सरकार नवीन योजना जाहीर करू शकत नाही, प्रचारात सरकारी यंत्रणेचा गैरवापर करता येत नाही हे सर्व नियम आचारसंहितेचा भाग असतात.
प्रचारादरम्यान होणारे राडे तसेच इतर गोष्टी टाळण्यासाठी आचार संहिता लागू करणे फार महत्वाची असते. नियम पाळणे बंधनकारक असते. महाराष्ट्रात सुरु असणाऱ्या निवडणुकांमध्ये १३ जानेवारी रोजी आचार संहिता लागू करण्यात येणार तर निवडणुका १५ जानेवारी रोजी घेण्यात येणार आहेत. या निवडणुकांचा निकाल अगदी १६ जानेवारीला जाहीर करण्यात येणार आहे.






