महाराष्ट्रातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांबाबत मोठी बातमी
Maharashtra ZP Election 2026: राज्यातील बारा जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी ५ फेब्रुवारी २०२६ या दिवशी होणार आहे. मतमोजणी ७ फेब्रुवारी रोजी होईल. सातारा सांगली कोलहापूर, सोलापूर, परभणी, बीड, संभाजीनगर जालना, सिंधुदुर्ग रत्नागिरी इ. जिल्ह्यात मतदान होणार आहे. (Maharashtra ZP Election)
राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांबाबत माहिती देण्यासाठी आज पत्रकार परिषद झाली. यावेळी राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्त म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ज्या जिल्हा परिषदांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी आरक्षण आहे, अशा जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये निवडणुका घेण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. त्या अनुषंगाने राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांमध्ये निवडणुका घेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
IND vs NZ : राजकोटमध्ये श्रेयस अय्यरला इतिहास रचण्याची संधी! ‘किंग’ कोहलीला टाकणार मागे?
५० टक्क्यांच्या आत आरक्षण असलेल्या निवडणुका होणार आहेत. १ जुलै २०२५ ची मतदार यादी ग्राह्य धरली जाईल.या निवडणुकीत दोन मते द्यायची आहेत. एक जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणाला द्यावी लागेल. नामनिर्देशन प्रक्रिया ऑफलाईन असेल, यासोबतच जातवैधता पडताळणी आवश्यक आहे. ती नामनिर्देशन पत्रासोबत द्यायची आहे.
५० टक्क्यांच्या आत आरक्षण असलेल्या निवडणुका पहिल्या टप्प्यात होतील तर ५० टक्क्यांपेक्षा वर गेलेल्या जिल्ह्यातील जिल्हा परिषदांची निवडणूक दुसऱ्या टप्प्यात घेतली जाईल. सर्वोच्च न्यायायाने निवडणूक आयोगाला १५ दिवसांची मुदतवाढ दिल्याने आता 15 फेब्रुवारीपर्यंत जिल्हा परिषदा आणि पंचायत समितींच्या निवडणुकांचा कार्यक्रम पूर्ण करणे निवडणूक आयोगाला बंधनकारक असणार आहे.
राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. निवडणुका घेण्यासाठी अधिक वेळ द्यावा, अशी विनंती राज्य निवडणूक आयोगाने न्यायालयाकडे केली होती. त्यानुसार आयोगाने 10 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ मागितली होती. आयोगाकडून निवडणुकांची घोषणा होताच 12 जिल्हा परिषदांमध्ये आचारसंहिता लागू होणार आहे. मतदान केंद्रावर सर्व प्राथमिक सुविधा उपलब्ध असतील. पिंक मतदान केंद्रावर सर्व महिला मतदार असतील.
उमेदवारी अर्जांची तारीखः 16 जानेवारी ते 21 जानेवारी
छाननीः 22 जानेवारी २०२६
उमेदवारी माघार अंतिम मुदत २७ जानेवारी २०२६ (दुपारी ३ वाजेपर्यत
अंतिम यादी आणि चिन्ह वाटप २७ जानेवारी (दुपारी ३.३० नंतर)
एकूण मतदार – 2.09 कोटी
एकूण महिला मतदार- १.०३ कोटी
एकूण पुरूष मतदार- १.०७ कोटी
इतर ४७३
मतदान केंद्र- २५ हजार ४८२






