Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Election Commission Of India: निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय: आता मतदानाच्या आकडेवारी होणार नाही घोळ

मतदान संपल्यानंतर उमेदवारांचे प्रतिनिधी असलेल्या पोलिंग एजंटना फॉर्म 17C देणे पूर्वीप्रमाणेच बंधनकारक राहणार आहे. त्यामुळे अंतिम आकडेवारीबाबत कोणत्याही प्रकारचे संभ्रम निर्माण होणार नाहीत.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jun 04, 2025 | 09:17 AM
Election Commission Of India: निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय: आता मतदानाच्या आकडेवारी होणार नाही घोळ
Follow Us
Close
Follow Us:

Election Commission Of India:  गेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीवरून वाद निर्माण झाला होता. काँग्रेसने आकडेवारीमध्ये घोळ झाल्याचा आरोप करत त्यावर आक्षेप नोंदवला होता आणि यासंदर्भात न्यायालयात याचिकाही दाखल केली होती. सर्वसामान्यपणे, निवडणूक आयोग दर चार-पाच तासांनी मतदानाच्या टक्केवारीची आकडेवारी प्रसिद्ध करत असतो. त्यामुळे अंतिम एकूण टक्केवारी दुसऱ्या दिवशी जाहीर केली जाते. परिणामी, अनेकदा उमेदवार तसेच विरोधी पक्षांकडून आकडेवारीबाबत शंका उपस्थित केली जाते.

मात्र आता, मतदानाच्या नेमक्या आणि अचूक आकडेवारीसाठी अधिक प्रतीक्षा करावी लागणार नाही. यासंदर्भात निवडणूक आयोगाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून, भविष्यात मतदान संपल्यानंतर लवकरात लवकर अधिकृत आणि अचूक आकडेवारी जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे पारदर्शकतेसह नागरिकांचा विश्वास कायम ठेवण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Stock Market Today: कशी होणार आज शेअर बाजाराची सुरुवात? सेन्सेक्स, निफ्टी पुन्हा तेजीत येणार का?

गेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीवरून निर्माण झालेल्या वादानंतर निवडणूक आयोगाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे मतदान दरम्यान आकडेवारी दर चार ते पाच तासांनी नव्हे, तर दर दोन तासांनी जाहीर केली जाईल. ही आकडेवारी थेट आयोगाच्या Voter Turnout Ratio (VTR) या विशेष अ‍ॅपवर अपडेट केली जाणार आहे.

यापूर्वी मतदान केंद्रावरील अधिकारी संबंधित आकडेवारी गोळा करून ती वरीष्ठ स्तरावर पाठवायचे, आणि त्यानंतर ती आयोगाकडून प्रसिद्ध केली जात होती. मात्र, नव्या प्रणालीअंतर्गत मतदान केंद्रावरील अधिकारीच थेट VTR अ‍ॅपवर मतदानाची माहिती भरतील, त्यामुळे वेळेची बचत होणार आहे आणि आकडेवारीतील पारदर्शकता अधिक वाढणार आहे. या निर्णयामुळे मतदारांपासून राजकीय पक्षांपर्यंत सर्व संबंधित घटकांना प्रत्यक्षात किती मतदान झाले याची अचूक आणि वेळेवर माहिती मिळणार असून, आकडेवारीबाबतच्या शंका आणि गैरसमज टाळण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Stock Market Today: कशी होणार आज शेअर बाजाराची सुरुवात? सेन्सेक्स, निफ्टी पुन्हा तेजीत येणार का?

गेल्या निवडणुकांतील आकडेवारीविषयी निर्माण झालेल्या वादानंतर निवडणूक आयोगाने मतदान प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी महत्त्वपूर्ण पावलं उचलली आहेत. यापुढे मतदानाची टक्केवारी दर चार-पाच तासांऐवजी दर दोन तासांनी थेट Voter Turnout Ratio (VTR) या विशेष अ‍ॅपवर अपडेट केली जाणार आहे. आता मतदान केंद्रावरील अधिकारी मतदानाची आकडेवारी थेट अ‍ॅपवर भरतील. ज्या ठिकाणी मोबाईल नेटवर्क उपलब्ध नसेल, तिथे ही माहिती ऑफलाइन स्वरूपात साठवली जाईल आणि नेटवर्क उपलब्ध झाल्यानंतर ती स्वयंचलितपणे अपलोड केली जाईल.

तसेच, मतदान संपल्यानंतर उमेदवारांचे प्रतिनिधी असलेल्या पोलिंग एजंटना फॉर्म 17C देणे पूर्वीप्रमाणेच बंधनकारक राहणार आहे. त्यामुळे अंतिम आकडेवारीबाबत कोणत्याही प्रकारचे संभ्रम निर्माण होणार नाहीत. या प्रणालीची अंमलबजावणी बिहार निवडणुकीपासून सुरू होणार आहे. त्यामुळे मतदानाच्या वेळेतच दर दोन तासांनी राज्यातील एकूण टक्केवारीचे आकडे थेट उपलब्ध होणार आहेत. या निर्णयामुळे मतदार, राजकीय पक्ष आणि माध्यमांना अधिक विश्वासार्ह आणि तातडीने माहिती मिळणार असून, निवडणूक प्रक्रियेमधील पारदर्शकता मोठ्या प्रमाणात वाढेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

 

Web Title: Election commissions big decision now there will be no confusion in voting statistics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2025 | 09:17 AM

Topics:  

  • Local Body Elections
  • Local Body Elections 2025

संबंधित बातम्या

Eknath Shinde: मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; तेजस ठाकरेंचा शिवसेनेत प्रवेश
1

Eknath Shinde: मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; तेजस ठाकरेंचा शिवसेनेत प्रवेश

Maharashtra Congress: महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल; रमेश चेन्निथला यांच्यासह बड्या नेत्यांना दिली मोठी जबाबदारी
2

Maharashtra Congress: महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल; रमेश चेन्निथला यांच्यासह बड्या नेत्यांना दिली मोठी जबाबदारी

Raj Thackeray News: ‘बॅग घेऊन शिवतीर्थावर हजर रहा’; राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आदेश, मनसेचे गुप्त मिशन?
3

Raj Thackeray News: ‘बॅग घेऊन शिवतीर्थावर हजर रहा’; राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आदेश, मनसेचे गुप्त मिशन?

पाणी, ऑक्सिजनवरून गणेश नाईकांची ठाणेकरांवर टीका; ‘मंत्र्यांनी हिंमत असल्यास…’, शिवसेनेचे प्रत्युत्तर
4

पाणी, ऑक्सिजनवरून गणेश नाईकांची ठाणेकरांवर टीका; ‘मंत्र्यांनी हिंमत असल्यास…’, शिवसेनेचे प्रत्युत्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.