Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कास पठारावर धावणार आता इलेक्ट्रिक वाहने; चार गाड्या लवकरच होणार दाखल

कास पठारावरून बामणोलीकडे जाणारा मुख्य रस्ता असल्याने या मार्गावर वाहने नियमित असतात. पठारावरील प्रदूषण टाळण्यासाठी हंगाम काळात सरसकट वाहनांना प्रवेश दिला जात नाही.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 20, 2025 | 03:18 PM
कास पठारावर धावणार आता इलेक्ट्रिक वाहने; चार टाटा एस गाड्या लवकरच होणार दाखल

कास पठारावर धावणार आता इलेक्ट्रिक वाहने; चार टाटा एस गाड्या लवकरच होणार दाखल

Follow Us
Close
Follow Us:

सातारा : मेढा पुष्प पठार कासचा हंगाम सुरू असून, पठारावर फुलांचे गालिचे बहरले आहेत. हा निसर्गाचा अलौकिक नजारा पाहण्यासाठी हजारो पर्यटक कासला भेट देत असून, या पर्यटकांसाठी वन विभाग व कास समितीमार्फत लवकरच चार नवीन इलेक्ट्रिक वाहने दाखल होणार आहे. यामुळे पर्यटकांची ने-आण सुलभ होणार आहे.

वन विभाग व कास समितीच्या वतीने बाजारात नवीन दाखल झालेले टाटा कंपनीच्या एस या मॉडेलची चार वाहने खरेदी करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. ही वाहने ताब्यात आल्यानंतर या वाहनांना पर्यटकांना बसण्यासाठी पुन्हा मॉडिफिकेशन करावे लागणार आहे. ओपन बॉडी असणाऱ्या या वाहनात साधारणत: एका वाहनात आठ ते दहा प्रवासी क्षमता असणार आहे. राजमार्गावरील ऑफिस ते कुमुदिनीच्या फुलांसाठी प्रसिद्ध असलेल्या कुमुदिनी तलावापर्यंत ही वाहने पर्यटकांची ने-आण करणार आहेत.

कुमुदिनी तलाव हा मुख्य रस्त्यापासून तीन ते चार किलोमीटर आत असून, तिथे पर्यटकांना पायी चालत जावे लागते. एवढे अंतर चालत जाऊन माघारी येणे महिला, लहान मुले, वृद्ध पर्यटक यांना त्रासदायक ठरत असल्याने ही वाहने सोयीची ठरणार आहेत. याच मार्गावर समितीच्या वतीने नुकतीच बैलगाडीची सफर ही सुरू करण्यात आली आहे.

जांभ्या दगडाचा रस्ता कच्चा

जांभ्या दगडाचा असणारा हा रस्ता कच्चा असून, या मार्गावर मजबूत वाहनांची गरज होती. त्या दृष्टीने टाटा एस मॉडेलची ही वाहने या मार्गावर व्यवस्थित चालणार असून, लवकरच या वाहनातून पर्यटकांना आजूबाजूचा निसर्गात पाहत कुमुदिनी तलावापर्यंतची सफर करता येणार आहे.

सरसकट वाहनांना दिला जात नाही प्रवेश

कास पठारावरून बामणोलीकडे जाणारा मुख्य रस्ता असल्याने या मार्गावर वाहने नियमित असतात. पठारावरील प्रदूषण टाळण्यासाठी हंगाम काळात सरसकट वाहनांना प्रवेश दिला जात नाही. घाटाई फाट्यावरील पार्किंगमध्ये वाहने लावून पर्यटक कास पठारावर समितीच्या बसने येत असतात. तर काही वाहने कास तलावाजवळील पार्किंगवरही लावली जातात. तरीही पठारावर वाहनांची गर्दी होत असते. राजमार्ग ते कुमुदिनी तलाव हा परिसर आतापर्यंत वाहनांपासून मुक्त असून, प्रदूषण ही या ठिकाणी होत नाही. त्यामुळे हा परिसर प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी या मार्गावर ही इलेक्ट्रिक वाहने उपयुक्त ठरणार आहेत.

Web Title: Electric vehicles will now run on the kaas plateau

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 20, 2025 | 03:18 PM

Topics:  

  • Kaas Pathar
  • Satara News

संबंधित बातम्या

Mahabaleshwar Panchgani in UNESCO : महाबळेश्वर अन् पाचगणीचा वाढला मान! युनोस्कोच्या यादीमध्ये मिळवले स्थान
1

Mahabaleshwar Panchgani in UNESCO : महाबळेश्वर अन् पाचगणीचा वाढला मान! युनोस्कोच्या यादीमध्ये मिळवले स्थान

‘खुनाचा बदला खुनाने’ घेण्याचा डाव फसला; शिरवळमध्ये भरदिवसा गोळीबार, हल्लेखोरांवर गुन्हा दाखल
2

‘खुनाचा बदला खुनाने’ घेण्याचा डाव फसला; शिरवळमध्ये भरदिवसा गोळीबार, हल्लेखोरांवर गुन्हा दाखल

Satara Hill Marathon: सातारा हिल मॅरेथॉन, यवतेश्वर घाटातून आरोग्यदायी धाव; हजारो स्पर्धकांचा मॅरेथॉनला प्रतिसाद
3

Satara Hill Marathon: सातारा हिल मॅरेथॉन, यवतेश्वर घाटातून आरोग्यदायी धाव; हजारो स्पर्धकांचा मॅरेथॉनला प्रतिसाद

महाबळेश्वर ते तापोळा प्रवास झाला सुखकर; तब्बल 26 किमी अंतर अवघ्या अर्ध्या तासात होणार पार
4

महाबळेश्वर ते तापोळा प्रवास झाला सुखकर; तब्बल 26 किमी अंतर अवघ्या अर्ध्या तासात होणार पार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.