महापािलकेत मनसे विरुद्ध अायुक्त
पुणे : महापालिका हद्दीत समाविष्ट 23 गावांतून वाहणाऱ्या नाल्यांवर 180 ठिकाणी अतिक्रमणे आहेत. पावसाळ्यापूर्वी ही अतिक्रमणे काढण्यात येणार आहेत. नाला आणि ड्रेनेज लाईन सफाईची कामे 7 जूनपूर्वी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या विविध विभागांची बैठक पार पडली. या बैठकीत पावसाळा पूर्व करावयाच्या कामांचा आढावा घेण्यात आला.
अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी या बैठकीविषयी माहीती दिली. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातून वाहणारे विविध नाल्यांची आणि ड्रेनेज लाईनची सफाई करण्याच्या कामास प्राधान्य देण्यात आले आहे. त्यानुसार, 90 किलोमीटर नाले आणि 125 किलोमीटर लांब ड्रेनेज लाईनची सफाई केली जाणार आहे. महापालिकेच्या प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयातंगर्तत निविदा काढण्यात आल्या आहेत. 23 गावांत काही नाले वाहत असून, या नाल्यांवर 180 ठिकाणी अतिक्रमणे आढळून आली आहे. पाण्याच्या प्रवाहाला अडथळा ठरणारी ही अतिक्रमणे काढण्यास प्राधान्य दिले जाणार आहे.
शहरात प्रत्येक पावसाळ्यात पाणी साठून राहणाऱ्या ठिकाणांविषयी या बैठकीत चर्चा झाली. 201 ठिकाणी पावसाळ्यात पाणी साठते. त्यावर आवश्यक ती उपाययाेजना करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. पाणी साठू नये, पाणी वाहून जाण्याची व्यवस्था करण्यासाठी याेग्य ती कारवाई करण्यात येणार आहे.
या बैठकीला पीएमआरडीए, पुणे मेट्राे, पुणेरी मेट्राे – हिंजवडी मेट्राे आदी विभागाचे अधिकारीही उपस्थित हाेते. महापािलका हद्दी लगत आणि पीएमआरडीएच्या क्षेत्रात पावसाळ्यात पाणी साठणाऱ्या सारख्या ठिकाणी महापालिकेच्या सहकार्याने उपाययाेजना केल्या जाणार आहेत.