Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आषाढी वारी संपताच अतिक्रमणांचे कमबॅक! पंढरपूर नगरपालिकेचा नुसताच दिखावा; फेरीवाल्यांनी पुन्हा रस्ते व्यापले

पंढरपूरसाठी हजारो कोटी रुपयांच्या कॉरिडॉर, रस्ते रुंदीकरण आणि विविध विकास प्रकल्पांची चर्चा सुरू आहे. या प्रकल्पांमुळे जुन्या घरांवर आणि कुटुंबांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत असताना सार्वजनिक रस्ते अडवून उभी राहणाऱ्या नव्य अतिक्रमणांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 12, 2026 | 03:40 PM
आषाढी वारी संपताच अतिक्रमणांचे कमबॅक! पंढरपूर नगरपालिकेचा नुसताच दिखावा; फेरीवाल्यांनी पुन्हा रस्ते व्यापले

आषाढी वारी संपताच अतिक्रमणांचे कमबॅक! पंढरपूर नगरपालिकेचा नुसताच दिखावा; फेरीवाल्यांनी पुन्हा रस्ते व्यापले

Follow Us
Follow Us:

आषाढी एकादशी यात्रेपूर्वी पंढरपूर शहरातील मुख्य रस्ते, प्रदक्षिणा मार्ग आणि श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरातील अतिक्रमणांवर धडक कारवाई करून प्रशासनाने मोठा गाजावाजा केला. मात्र, यात्रा संपताच त्याच ठिकाणी पुन्हा हातगाड्या, स्टॉल, फेरीवाले आणि तात्पुरती दुकाने थाटली जात असल्याने नगरपरिषदेच्या अतिक्रमणविरोधी मोहिमेचा ‘दिखावा’ उघड झाल्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे.वारीच्या काळात लाखो भाविकांच्या सुरक्षेचे कारण पुढे करत प्रशासनाने अनेक हातगाड्‌या हटविल्या, रस्ते मोकळे केले आणि प्रदक्षिणा मार्ग अतिक्रमणमुक्त केल्याचा दावा केला होता. त्यामुळे काही दिवस शहरातील वाहतूक सुरळीत झाल्याचे चित्र दिसले. मात्र, आता पुन्हा मुख्य रस्त्यांसह मंदिर परिसरात अतिक्रमणांचे जाळे पसरू लागल्याने वाहतूककोंडी, पादचाऱ्यांना अडथळे आणि भाविकांना गर्दीचा त्रास सहन करावा लागत आहे.(फोटो सौजन्य – AI)

रिक्षा, टॅक्सी आणि ॲप-कॅब चालकांसाठी मोठी बातमी! मराठीचे ज्ञान बंधनकारक अन्यथा…; नियमभंग केल्यास परवाना होणार निलंबित

विशेष म्हणजे, आषाढ शुद्ध द्वादशीला सक्रिय झालेल्या नगरपरिषदेच्या अतिक्रमणविरोधी पथकाचा आषाढ वद्य एकादशीपर्यंत मागमूसही दिसत नसल्याची टीका नागरिकांकडून होत आहे. ‘वारीपूर्वी धडक मोहीम आणि वारीनंतर कुंभकर्णी झोप’, असा अनुभव दरवर्षी येत असल्याचे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे. या दुर्लक्षाचे बोलके उदाहरण रविवारी पाहायला मिळाले. राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी आले असताना चौफाळा परिसरात त्यांच्या वाहनासमोरच परप्रांतीय फेरीवाले बिनधास्तपणे व्यवसाय करत असल्याचे दिसून आले. ना स्थानिक प्रशासनाने त्यांना हटविले, ना मुख्य सचिवांसोबत असलेल्या अधिकाऱ्यांचे त्याकडे लक्ष गेले. शहरातील प्रमुख रस्ते आणि मंदिर परिसरात अशी उघड अतिक्रमणे सुरू असताना अतिक्रमणविरोधी यंत्रणा नेमकी कुठे होती, असा संतप्त सवाल नागरिकांकडून केला जात आहे.

प्रकल्पांसाठी कारवाई; अतिक्रमणांवर मूकसंमती?

पंढरपूरसाठी हजारो कोटी रुपयांच्या कॉरिडॉर, रस्ते रुंदीकरण आणि विविध विकास प्रकल्पांची चर्चा सुरू आहे. या प्रकल्पांमुळे जुन्या घरांवर आणि कुटुंबांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत असताना सार्वजनिक रस्ते अडवून उभी राहणाऱ्या नव्य अतिक्रमणांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे. एका बाजूला विकासाच्या नावाखाली नागरिकांच्या मालमत्तांवर कारवाई आणि दुसऱ्या बाजूला सार्वजनिक रस्त्यांवरील अतिक्रमणांकडे दुर्लक्ष, अशी दुटप्पी भूमिका प्रशासनाची असल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे. मुख्य रस्ते, प्रदक्षिणा मार्ग आणि मंदिर परिसर कायमस्वरूपी अतिक्रमणमुक्त ठेवण्यासाठी स्वतंत्र आणि सातत्याने कार्यरत यंत्रणा उभारावी, अशी मागणी जोर धरत आहे. वारीपुरती ‘सक्रिय’ होणारी आणि नंतर गायब होणारी अतिक्रमणविरोधी मोहीम केवळ फोटोसेशन आणि दिखाव्यापुरतीच होती, असा निष्कर्ष नागरिक काढू लागले आहेत.

Chandrapur News: अडीच महिने उलटले, तरी करार रखडला; चंद्रपुरातील शाळांमध्ये पोषण आहारासाठी शिक्षकांची उधारी

आषाढी काळात जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार अतिक्रमणविरोधी विशेष पथकाची नेमणूक करण्यात आली होती. या मोहिमेमुळे शहरातील मुख्य रस्ते, प्रदक्षिणा मार्ग आणि मंदिर परिसरातील अतिक्रमणे हटविण्यात आली होती. आता पुन्हा काही ठिकाणी अतिक्रमणे पूर्ववत झाली असतील, तर मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा करून तत्काळ अतिक्रमण निर्मूलन मोहीम सुरू करण्यात येईल. शहरातील वाहतूक सुरळीत राहावी आणि भाविक व नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी नगरपालिका आवश्यक ती कारवाई करेल, अशी माहिती ऋषिकेश गड्डम, अधिकारी, नगरपालिका यांनी दिली आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Encroachments make a comeback right after the ashadhi wari pandharpur municipal councils action is merely for show

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2026 | 03:40 PM

Topics:  

  • aashadhi ekadashi
  • maharshtra
  • pandharpur

संबंधित बातम्या

Mira-Bhayander: मीरा-भाईंदरमध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाईला वेग; ९ कोटींच्या ई-निविदेला सुरुवात
1

Mira-Bhayander: मीरा-भाईंदरमध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाईला वेग; ९ कोटींच्या ई-निविदेला सुरुवात

विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती संवर्धनाचा मार्ग मोकळा! उच्च न्यायालयाची हिरवी झेंडी; रिट याचिका फेटाळली
2

विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती संवर्धनाचा मार्ग मोकळा! उच्च न्यायालयाची हिरवी झेंडी; रिट याचिका फेटाळली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.