पुणे : पुणे शहरातील वाहतूक कोंडी साडविण्यासाठी पुणे पोलिसांनी ठोस पावले उचलली आहेत. वाहतूकीला अडथळा ठरणाऱ्या त्या आस्थापनांवर पोलिसांकडून कडक कारवाईचे धोरण आखण्यात आले आहे. प्रसंगी गुन्हे देखील दाखल केले जाणार असल्याचे पुणे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
पुणे शहरातील वाहतूक कोंडीने पुणेकर हैराण आहेत. अरूंद रस्त्यांसोबतच प्रमुख रस्त्यांवर देखील कोंडी नित्याची झाली आहे. दररोज वाहन चालक या वाहतूक कोंडीतून मार्ग काढत आहेत. मात्र, काही भागात व रस्त्यांवर वाहतूक कोंडी नित्याची झालेली आहे. दरम्यान, या कोंडीतून मुक्तता करण्यासाठी तसेच वाहतूकीचा वेग वाढविण्यासाठी पुणे पोलिसांकडून आवश्यक पावले उचलली जात आहेत. गुगलची मदत घेऊन पोलीस वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे शहरातील मूख्य ३२ रस्त्यांची निवड करत या रस्त्यांवर पार्किग मॅनेजमेंट, वाहतूक नियंत्रण साधने, चौक सुधारणा असे विविध उपक्रम राबवून वाहतूकीचा वेग वाढविला जाणार आहे, यासाठी पोलिसांनी प्रसंगी कठोर पावले देखील उचलण्याची तयारी ठेवली आहे. यासाठी वाहतूक पोलीस विभाग व महापालिका एकत्रित काम करणार असून, स्वतंत्र अॅप्लिकेशन देखील तयार केले जाणार आहे.
वाहतूकीला अडथळा हा रस्ता अरूंदी यासोबतच रस्त्याच्या कडेला असलेल्या आस्थापनांमुळे देखील होतो. परिणामी वाहतूक कोंडी व संत गतीने होते. त्यामुळे त्यावरही पोलीस कारवाई करणार आहेत. रस्त्यांच्या कडेला अवैधरित्या बोर्ड, पाट्या, स्टँड उभा केले जातात. तर, पंक्चर चालक टायर उभे करतात, किंवा वाहन विक्रेत्याकडून नवी वाहने देखील पार्क केली जातात, अशांसह फुटपाथवर अवैधरित्या अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.
हॉटेलसमोरील कोंडीवर नजर
शहराच्या मध्यवस्तीत हॉटेल चालक व्हॅले पार्कींगच्या नावाखाली रस्त्याच्या कडेला तसेच गल्ली बोळात वाहने पार्क करतात. त्यामुळे हॉटेलच्या परिसरात किंवा समोर मोठी वाहतूक कोंडी होताना पाहिला मिळते. शनिवार व रविवारी प्रकार्शाने वाहतूक संत गतीने झाल्याचे दिसते. अशा अनेक आस्थापनांना वाहतुक पोलिसांकडून कायदेशिर नोटीस दिली गेली आहे. पण, आता यानंतरही बदल केला नाही तर अशा आस्थापनांवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत.