Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार! माळशिरस तालुक्यात सायं. ५ पर्यंत ५६.०३ टक्के तर माढा मतदार संघात ५०.१६ टक्के मतदान

४३ माढा मतदार संघामधील २५४ अ.जा. माळशिरस तालुक्यामध्ये आज अत्यंत चुरशीने पण शांततेत मतदान प्रकिया पार पडली.

  • By प्रीति माने
Updated On: May 07, 2024 | 06:07 PM
तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार! माळशिरस तालुक्यात सायं. ५ पर्यंत ५६.०३ टक्के तर माढा मतदार संघात ५०.१६ टक्के मतदान
Follow Us
Close
Follow Us:
अकलूज : ४३ माढा मतदार संघामधील २५४ अ.जा. माळशिरस तालुक्यामध्ये आज अत्यंत चुरशीने पण शांततेत मतदान प्रकिया पार पडली. सकाळी ८ वाजल्यापासूनच उन्हाचा कडाका वाढला असला तरी नागरिक उत्स्युर्तपणे मतदानासाठी बुथवर येत होते.
सकाळी साडे आठच्या सुमारास शंकरनगर येथील मोहितेवस्ती मतदान केंद्रावरती माढा लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील राजसिंह मोहिते-पाटील यांनी मतदान केले. त्यापाठोपाठ राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, नंदिनीदेवी, राजसिंह, उर्मिलादेवी, सत्यशील, देवीश्रीदेवी, उर्वशीराजे, प‌द्मजादेवी व मोहिते-पाटील परिवारातील इतर सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला. अकलूज येथील दत्त चौकामध्ये धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या कन्या इशिता यांनी मातोश्री शितलदेवी यांच्या समवेत पहिल्यांदाच मतदान केले. याच मतदान केंद्रावरती जयसिंह, रणजितसिंह, सत्यप्रभादेवी, विश्वतेजसिंह, संग्रामसिंह, ऋतुजादेवी यांनी मतदान केले. मतदान केल्यानंतर उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी सर्वांनी मतदानाचा पवित्र हक्क बजवून लोकशाही बळकट करण्यासाठी मदत करावी असा संदेश दिला. मतदानानंतर अकलूज शहरात फेर फ़टका मारताना धैर्यशील मोहिते-पाटील व आ. रणजितसिंह मोहिते-पाटील यांची भेट झाली असता दोघांनी एकमेकांना आलिंगन दिले.
सकाळी ७ वाजता मतदानास सुरूवात होण्यापुर्वीच मतदान केंद्राच्या परिसरात नागरिकांनी गर्दी केली होती. शिस्तीत आणि शांततेत मतदान सुरू असताना उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील, रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी अकलूजसह माळशिरसत लगुक्यातील मतदाना केंद्रांना भेटी दिल्या. माळशिरस तालुक्यातील ३ लाख ३७ हजार ३८६ मतदारांपैकी सकाळी ७ ते ३ वाजेपर्यंत पुरुष ८३ हजार ३२९, खीया ६४ हजार ३०६ व इतर ९ असे एकूण १ लाख ४७ हजार ६४४ लोकांनी मतदान केले. याची एकूण टक्केवारी ४३.७६ टक्के इतकी भरली. त्यानंतर सायंकाळी ५ वाजेपर्यंत माळशिरस तालुक्यातील एकूण मतदार पुरूष १ लाख ४ हजार १९०, स्त्रीया ८४ हजार ८३९ व इतर १४ असे एकूण १ लाख ८९ हजार ०४३ असे ५६.०३ टक्के मतदान झाले. तर सायंकाळी ५ वाजेपर्यंत माढा मतदार संघामधील एकूण मतदार १९ लाख ९१ हजार ४५४ त्यापैकी पुरूष ५ लाख ४९ हजार ९६७, स्त्रीया ४ लाख ४८ हजार ८६९ व २३ असे एकूण ९ लाख ९८ हजार ८५९ मतदारांनी मतदान केले. त्याची एकूण टक्केवारी ५०.१६ इतकी आहे.
खळवे, ता. माळशिरस येथे मतदान यंत्र अत्यंत संथ गतीने चालत असल्याने साडेपाच वाजता सुमारे ३०० ते ४०० लोक ताटकळत उभे होते. तक्रार करूनही दुसरे मतदान यंत्र वेळेत पोहोचवले गेले नाही.

Web Title: Evening in malshiras taluka 56 03 percent voting till 5 and 50 16 percent voting in madha constituency political news nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 07, 2024 | 06:07 PM

Topics:  

  • lok sabha elections
  • Lok sabha elections 2024
  • political news

संबंधित बातम्या

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका नोव्हेंबरमध्ये? गणेशोत्सवानंतर आरक्षणाची घोषणा होण्याची शक्यता
1

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका नोव्हेंबरमध्ये? गणेशोत्सवानंतर आरक्षणाची घोषणा होण्याची शक्यता

‘काशी-मथुरा’ प्रकरणावर RSS सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान; म्हणाले, “आंदोलनाचे समर्थन…”
2

‘काशी-मथुरा’ प्रकरणावर RSS सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान; म्हणाले, “आंदोलनाचे समर्थन…”

मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील खाऊगल्ली बंद; सरकारच्या फतव्यामुळे आंदोलकांचे होणार हाल?
3

मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील खाऊगल्ली बंद; सरकारच्या फतव्यामुळे आंदोलकांचे होणार हाल?

BJP National President: कोण होणार  राष्ट्रीय अध्यक्ष? RSS ची ‘या’ नावाला पसंती? मोदी-भागवत भेटीत निर्णयाची शक्यता
4

BJP National President: कोण होणार राष्ट्रीय अध्यक्ष? RSS ची ‘या’ नावाला पसंती? मोदी-भागवत भेटीत निर्णयाची शक्यता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.