Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dharashiv News: धाराशिव पंचायत समितीवर भाजपचा झेंडा! सभापतीपदी गोकर्णा कदम तर उपसभापतीपदी प्रमोद पाटील यांची निवड

सभापती पदासाठी झालेल्या निवडणुकीत गोकर्णा गोपाळ कदम यांना १६ मते मिळाली, तर उबाठा गटाच्या सरस्वती मोहन वाघूलकर यांना केवळ ७ मते मिळाली. या मतदान प्रक्रियेत एक सदस्य तटस्थ राहिला.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 06, 2026 | 06:49 PM
धाराशिव पंचायत समितीवर भाजपचा झेंडा!

धाराशिव पंचायत समितीवर भाजपचा झेंडा!

Follow Us
Follow Us:

 

  • धाराशिव पंचायत समितीवर भाजपचा झेंडा!
  • सभापतीपदी गोकर्णा कदम तर उपसभापतीपदी प्रमोद पाटील यांची निवड
धाराशिव, जिल्हा प्रतिनिधी : जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या धाराशिव पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी आज शुक्रवारी ६ मार्च रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत इर्ला गणातील भाजपच्या गोकर्णा गोपाळ कदम या सभापतीपदी विजयी झाल्या असून वडगाव सिद्धेश्वर गणाचे प्रमोद पाटील यांची उपसभापतीपदी निवड झाली आहे. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे धाराशिव पंचायत समितीवर भाजपने आपली सत्ता कायम राखली आहे.

बहुमताच्या जोरावर ‘महायुती’चा विजय

सभापती पदासाठी झालेल्या निवडणुकीत गोकर्णा गोपाळ कदम यांना १६ मते मिळाली, तर उबाठा गटाच्या सरस्वती मोहन वाघूलकर यांना केवळ ७ मते मिळाली. या मतदान प्रक्रियेत एक सदस्य तटस्थ राहिला. महायुतीकडे स्पष्ट बहुमत असल्यामुळे भाजपचा उमेदवार सभापतीपदी निवडून येणार हे आधीपासूनच निश्चित मानले जात होते. त्यानुसार पंचायत समिती गणातून निवडून आलेल्या गोकर्णा कदम यांनी बहुमताच्या जोरावर विजय मिळवला. धाराशिव पंचायत समितीच्या सभापती पदावर यंदा महिला विराजमान होणार असल्याने या निवडणुकीकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले होते.

Dharashiv News: १५ व्या वित्त आयोगाच्या ४.२० लाखांच्या निधीचा गैरवापर, सरपंच व ग्रामसेवकावर गुन्हा दाखल

६० वर्षांच्या इतिहासात पाचव्यांदाच ‘महिला राज’

पंचायत समितीच्या सुमारे ६० वर्षांच्या इतिहासात पाचव्यांदाच महिला सभापतीपदी विराजमान झाल्या आहेत. त्यामुळे गोकर्णा कदम यांच्या निवडीला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. उपसभापती पदासाठी झालेल्या निवडणुकीत वडगाव सिद्धेश्वर गणातून निवडून आलेले प्रमोद पाटील यांची निवड झाली. महायुतीच्या सदस्यांच्या पाठिंब्यामुळे त्यांचा विजय सहज झाला. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली. निवडणुकीनंतर विजयी उमेदवारांचे समर्थकांनी अभिनंदन करत जल्लोष केला. आगामी काळात पंचायत समितीमार्फत विकासकामांना गती देण्यावर भर दिला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Web Title: Bjp flag hoisted on dharashiv panchayat samiti

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2026 | 06:49 PM

Topics:  

  • Dharashiv News
  • political news

संबंधित बातम्या

Crime News: रोलचे आमिष, इन्स्टाग्रामवरून ओळख; तरुणीला ऑडिशनच्या नावाखाली  हॉटेलमध्ये नेले अन्…
1

Crime News: रोलचे आमिष, इन्स्टाग्रामवरून ओळख; तरुणीला ऑडिशनच्या नावाखाली  हॉटेलमध्ये नेले अन्…

SIR ही मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया; शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांचं विधान
2

SIR ही मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया; शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांचं विधान

दुष्काळ जाहीर करुन सरकारने केलं शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम : संजय शिरसाट
3

दुष्काळ जाहीर करुन सरकारने केलं शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम : संजय शिरसाट

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?
4

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.