Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nepal Election : नेपाळमध्ये सत्तापालट ! बालेन शाह होणार नवे पंतप्रधान; ओली यांचा दारूण पराभव

नेपाळमध्ये सत्तापालट करणाऱ्या 'जेन-झी' आंदोलनाचे नेतृत्व एकप्रकारे बालेन शाह यांनीच केले होते आणि निवडणुकीतही तेच या पिढीचा चेहरा राहिले. दिग्गज नेत्यांमध्ये फक्त प्रचंड आपली जागा वाचवू शकले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 08, 2026 | 08:21 AM
तब्बल ३६ वर्षांनंतर नेपाळमध्ये प्रचंड बहुमताचे सरकार

तब्बल ३६ वर्षांनंतर नेपाळमध्ये प्रचंड बहुमताचे सरकार

Follow Us
Follow Us:

काठमांडू : नेपाळमध्ये सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. आता या निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. नेपाळच्या इतिहासामध्ये ३६ वर्षांनंतर एकाच पक्षाचे प्रचंड बहुमताने सरकार स्थापन होणार आहे. ५ मार्च रोजी झालेल्या निवडणुकीनंतर तिसऱ्या दिवशीही मतमोजणी सुरू होती. शनिवारपर्यंत राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाने (आरएसपी) प्रत्यक्ष निवडणुकीत १६५ जागांपैकी ११७ जागांवर विजय मिळवला आहे.

पक्षाचे प्रमुख आणि काठमांडूचे माजी महापौर बालेंद्र (बालेन) शाह या निवडणुकीत ‘धुरंधर’ म्हणून उदयास आले असून, माजी पंतप्रधान के. पी. ओली यांचा पराभव झाला आहे. बालेन शाह यांनी ओली यांचा ४५ हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. या निवडणुकीत ओली यांच्या नेतृत्वाखालील सीपीएन-यूएमएल आघाडीला अवघ्या १३ जागा मिळाल्या आहेत. नेपाळी काँग्रेस १५ जागांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर पुष्पकमल दहल ‘प्रचंड’ यांच्या पक्षाची स्थिती त्याहूनही वाईट आहे. एकूणच, या निवडणुकीत ‘जेन-झी’च्या वादळाने देशातील सर्व जुन्या पक्षांचे तंबू मुळापासून उखडून टाकले आहेत.

नेपाळमध्ये सत्तापालट करणाऱ्या ‘जेन-झी’ आंदोलनाचे नेतृत्व एकप्रकारे बालेन शाह यांनीच केले होते आणि निवडणुकीतही तेच या पिढीचा चेहरा राहिले. दिग्गज नेत्यांमध्ये फक्त प्रचंड आपली जागा वाचवू शकले. मात्र, त्यांच्या पक्षाला दोन अंकी आकडाही गाठता आलेला नाही.

तरुण मतदारांचा शाह यांना पाठिंबा

विश्लेषकांच्या मते, तरुण आणि ‘जेन-झी’ मतदारांचा प्रचंड पाठिंबा हे बालेन शाह यांच्या विजयाचे सर्वात मोठे कारण ठरले आहे, ज्यामुळे दशकांपासून सत्तेत असलेल्या पारंपारिक पक्षांची पकड कमकुवत झाली. बालेन शाह यांनी झापा मतदारसंघातून ओली यांना थेट आव्हान दिले होते. हा तोच मतदारसंघ आहे जिथून ओली यांनी एकदा वगळता सलग सात वेळा निवडणूक जिंकली होती. या निवडणुकीत झापा-५ मतदारसंघातून बालेन आपल्या प्रतिस्पर्धी के. पी. शर्मा ओली यांच्यापेक्षा सुमारे ४५ हजार मतांच्या फरकाने पुढे आहेत.

ओलींसह इतरही उमेदवारांचा पराभव

फक्त ओलीच नाही, तर त्यांच्या पक्षाचा एकही पदाधिकारी किंवा त्यांच्या सरकारमधील एकही मंत्री मतमोजणीत आघाडीवर नसल्याचे दिसून आले. पक्षाचे सर्व दिग्गज पराभवाच्या छायेत राहिले. नेपाळी काँग्रेसचीही अवस्था बिकट असून, पक्षाध्यक्ष गगन थापा सुद्धा आपल्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा मागे आहेत. त्यांच्या पक्षाच्या अनेक नेत्यांना पराभव पत्करावा लागला आहे.

हेदेखील वाचा : Nepal Election Results : नेपाळमध्ये मोठा सत्ताबदल! आता अमेरिका समर्थक सरकार? भारत चीनचं टेन्शन वाढणार?

Web Title: Balen shah will be the new prime minister of nepal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2026 | 08:20 AM

Topics:  

  • Balen Shah
  • Bihar Political Crisis
  • Nepal News
  • political news

संबंधित बातम्या

NEET PG Aspirant Emotional Story: “त्यांना परत यावच…” नीट पीजी देणाऱ्या तन्वीची मन हेलावून टाकणारी कहाणी एकदा वाचाच
1

NEET PG Aspirant Emotional Story: “त्यांना परत यावच…” नीट पीजी देणाऱ्या तन्वीची मन हेलावून टाकणारी कहाणी एकदा वाचाच

‘मागे दिले नाही, आता तरी मंत्रिपद द्या’; एकनाथ शिंदेंच्या ‘या’ आमदाराची जाहीरपणे नाराजी
2

‘मागे दिले नाही, आता तरी मंत्रिपद द्या’; एकनाथ शिंदेंच्या ‘या’ आमदाराची जाहीरपणे नाराजी

राज्यातील तब्बल 2.07 कोटी मतदारांची नावे यादीतून वगळली; तुमचंही नाव नसेल तर ‘हे’ नक्की करा…
3

राज्यातील तब्बल 2.07 कोटी मतदारांची नावे यादीतून वगळली; तुमचंही नाव नसेल तर ‘हे’ नक्की करा…

Nepal Flood : नेपाळमध्ये बचाव पथकाला सापडला खजिना; 50 कोटी रुपयांचे सोने दीड कोटी रुपयांची रोकड, VIDEO VIRAL
4

Nepal Flood : नेपाळमध्ये बचाव पथकाला सापडला खजिना; 50 कोटी रुपयांचे सोने दीड कोटी रुपयांची रोकड, VIDEO VIRAL

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.