Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता ज्येष्ठ शिक्षकांचीही होणार ‘परीक्षा’; गुरुजी चांगलेच तणावात

26 ते 29 मे दरम्यान विभागस्तरीय व जिल्हास्तरीय टीओटी होणार आहे. त्यानंतर या प्रशिक्षणात तयार झालेले तज्ञ मार्गदर्शक 2 जून ते 12 जून या कालावधीत तालुकास्तरीय शिक्षकांना ऑफलाईन प्रशिक्षण देतील.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 29, 2025 | 09:35 AM
आता ज्येष्ठ शिक्षकांचीही होणार 'परीक्षा'; गुरुजी तणावात

आता ज्येष्ठ शिक्षकांचीही होणार 'परीक्षा'; गुरुजी तणावात

Follow Us
Close
Follow Us:

अमरावती : शिक्षकांना सेवेची 12 वर्षे पूर्ण केल्यानंतर वरिष्ठ वेतन श्रेणी तर 24 वर्षे सेवा केल्यानंतर निवड श्रेणी प्रशिक्षण पूर्ण करावे लागते. यावर्षी 2 ते 12 जून या कालावधीत राज्यात एकाच वेळेस प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे यावेळी सर्व ज्येष्ठ शिक्षकांची परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेत पात्र न ठरणाऱ्या गुरुजींना पुन्हा प्रशिक्षण घ्यावे लागणार आहे. त्यामुळे राज्यातील अनुभवी गुरुजी टेन्शनमध्ये आले आहेत.

यावर्षी पहिल्यांदाच प्रशिक्षणाच्या वेळी घेण्यात येणारी चाचणी आणि त्याचे गुणदान हा चर्चेचा विषय ठरत आहे. वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण चाचणीसाठी 100 गुण, स्वाध्यायसाठी 100 गुण, लेखन चाचणीसाठी 50 गुण आणि अहवाल लेखनासाठी 50 गुणांवर आधारित मूल्यांकन अशी 300 गुणांची परीक्षा होणार आहे. प्रशिक्षणादरम्यान आणि नंतर दोन्ही किमान मूल्यांकन प्रक्रियेत 50 टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे. अन्यथा नवीन नोंदणी आणि शुल्क भरून विनंतीनुसार प्रशिक्षण पूर्ण करणे अपेक्षित आहे. राज्यस्तरीय प्रशिक्षण पुणे येथे होणार आहे.

26 ते 29 मे दरम्यान विभागस्तरीय व जिल्हास्तरीय टीओटी होणार आहे. त्यानंतर या प्रशिक्षणात तयार झालेले तज्ञ मार्गदर्शक 2 जून ते 12 जून या कालावधीत तालुकास्तरीय शिक्षकांना ऑफलाईन प्रशिक्षण देतील.

प्रशिक्षणात 22 विषयांचा समावेश

या प्रशिक्षणात राष्ट्रीय शिक्षण 2020, राज्य अभ्यासक्रम आराखडा. शिक्षण हक्क कायदा, शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा, ऑनलाइन शिक्षण, सायबर सुरक्षा, माहितीचा अधिकार, पर्यावरणीय आपत्ती व्यवस्थापन, व्यवसाय अध्यापनाचा ताण व्यवस्थापन मूल्यांकन, कृती दुरुस्त्या इत्यादी 22 विषयांचा समावेश आहे. प्रशिक्षणादरम्यान दर तासिकेचे 10 गुणांच्या चाचणीसह 10 स्वाध्याय पूर्ण करावे लागणार आहे. संपूर्ण प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर, शेवटच्या दिवशी 50 गुणांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.

राज्यात एकाच वेळी ऑनलाईन चाचणी

10 दिवस चालणाऱ्या या प्रशिक्षणात प्रत्येक प्रशिक्षणार्थीना प्रत्येक तासिकेला हजर राहणे अनिवार्य आहे. प्रत्येक दिवशी परिपाठानंतर आदर्श शाळांवर चर्चा होणार आहे. प्रशिक्षण पूर्व काळात पूर्व चाचणी आणि उत्तर चाचणी असणार आहे प्रत्येक घटकांनंतर 10 गुणांची बहुपर्यायी ऑनलाईन चाचणी होणार आहे. संपूर्ण राज्यात ही चाचणी एकाच वेळी होणार असल्याने वेळापत्रक सारखेच राहणार आहे.

Web Title: Exam of senior teachers will held soon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2025 | 09:35 AM

Topics:  

  • Amravati News
  • Education Department

संबंधित बातम्या

अजब-गजब ! शिक्षण विभागातील तब्बल 45 फाईल्स झाल्या गायब; शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ
1

अजब-गजब ! शिक्षण विभागातील तब्बल 45 फाईल्स झाल्या गायब; शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ

शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना चौकशीनंतरच अटक; अधिकारी संघाचे आंदोलन अखेर स्थगित
2

शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना चौकशीनंतरच अटक; अधिकारी संघाचे आंदोलन अखेर स्थगित

अवैध धंद्यांविरोधात अमरावती पोलिस ‘अ‍ॅक्शन मोड’वर; भजनी मंडळाच्या वेशात आलेल्या पोलिसांनी जुगार अड्डाच केला उद्ध्वस्त
3

अवैध धंद्यांविरोधात अमरावती पोलिस ‘अ‍ॅक्शन मोड’वर; भजनी मंडळाच्या वेशात आलेल्या पोलिसांनी जुगार अड्डाच केला उद्ध्वस्त

पूर्ण गुण मिळूनही विद्यार्थी ‘नापास’; नागपूर विद्यापीठाच्या चुकीचा विद्यार्थ्याला फटका
4

पूर्ण गुण मिळूनही विद्यार्थी ‘नापास’; नागपूर विद्यापीठाच्या चुकीचा विद्यार्थ्याला फटका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.