Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तज्ञ अधिकाऱ्यांनी केली रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत रोगग्रस्त पिकांची पाहणी…

कृषी व किसान कल्याण मंत्रालय, भारत सरकार संचालित केंद्रीय एकात्मिक कीड व्यवस्थापन केंद्र, नाशिक यांच्या तज्ञ अधिकाऱ्यांनी आज खासदार रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत मौजे मस्कावद (रावेर) येथे भेट देऊन केळी पिकावर आलेल्या कुकुंबर मोझाक व्हायरस (सीएमव्ही) या रोगाने ग्रासित पिकांची पाहणी केली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 17, 2022 | 06:42 PM
तज्ञ अधिकाऱ्यांनी केली रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत रोगग्रस्त पिकांची पाहणी…
Follow Us
Close
Follow Us:

जळगाव : कृषी व किसान कल्याण मंत्रालय, भारत सरकार संचालित केंद्रीय एकात्मिक कीड व्यवस्थापन केंद्र, नाशिक यांच्या तज्ञ अधिकाऱ्यांनी आज खासदार रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत मौजे मस्कावद (रावेर) येथे भेट देऊन केळी पिकावर आलेल्या कुकुंबर मोझाक व्हायरस (सीएमव्ही) या रोगाने ग्रासित पिकांची पाहणी केली.

महाराष्ट्र राज्यात केळी पिकाखालील सर्वाधिक क्षेत्र जळगांव जिल्ह्यात असून केळीचे सर्वाधिक उत्पादनही जळगांव जिल्ह्यातील तापी व पुर्णा नदीच्या काठाने असलेल्या भागात होते. केळी करपा हा केळी पिकावरील महत्वाचा बुरशीजन्य रोग व कुकुंबर मोझाक व्हायरस मुळे दरवर्षी केळीचे मोठ्या प्रमाणावार नुकसान होते. सीएमव्ही हा रोग जास्त करून ऑगस्ट व सप्टेंबर या महिन्यामध्ये जास्त आढळून येत असतो. त्यातच अवकाळी वादळ. जोरदार पाऊस, गारपीट व कमी-जास्त तापमान यामुळे चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठे संकट उभे राहते.

याबाबत खासदार रक्षा खडसे यांनी केंद्रीय कृषी मंत्री, कृषी राज्यमंत्री तसेच महाराष्ट्राचे तत्कालीन व सध्याचे कृषिमंत्री व कृषी सचिव यांना सदर रोग केंद्राच्या “राष्ट्रीय कृषी विकास योजना” मध्ये समावेश होणे तसेच केळी पीक विम्यात याचा समावेश होणे बाबत मागणी केली होती. त्यानुसार कृषी व किसान कल्याण मंत्रालय, भारत सरकार संचालित केंद्रीय एकात्मिक कीड व्यवस्थापन केंद्र, नाशिक यांच्या तज्ञ अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील केळी भागाचा दौरा केला. यावेळी खासदार रक्षा खडसे यांनी त्यांना केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सांगून अहवाल सदर करण्याबाबत योग्य त्या सूचना केल्या.

[read_also content=”… तर २० आमदारांपर्यंत देखील पोहचले नसते; महाजनांची आदित्य ठाकरेंवर टीका https://www.navarashtra.com/maharashtra/then-even-20-mlas-would-not-have-reached-mahajans-criticism-of-aditya-thackeray-nrdm-327041.html”]

यावेळी खासदार रक्षा खडसे यांच्यासह केंद्रीय एकात्मिक कीड व्यवस्थापन केंद्र, नाशिकचे सहायक संचालक डॉ. अतुल ठाकरे, सहायक वनस्पती संरक्षण अधिकारी विशाल काशीद, सहायक वनस्पती संरक्षण अधिकारी ऋषीकेश मानकर, शास्त्रज्ञ केळी संशोधन केंद्र, जळगाव जी. पी. देशमुख, तालुका कृषी अधिकारी रावेर मयूर भामरे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, रावेर चंद्रकांत माळी यांच्यासह परिसरातील केळी उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

Web Title: Expert officers inspected the diseased crops in the presence of raksha khadse nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2022 | 06:42 PM

Topics:  

  • cmomaharashtra
  • Jalgaon
  • NAVARASHTRA
  • Raksha Khadse

संबंधित बातम्या

महाराष्ट्र बदलत आहे…१७ ऑगस्ट शेवटची संधी, लवकरच सहभागी व्हा @ MH 1st Conclave 2025
1

महाराष्ट्र बदलत आहे…१७ ऑगस्ट शेवटची संधी, लवकरच सहभागी व्हा @ MH 1st Conclave 2025

तुमचा एक प्रश्न महाराष्ट्राची दिशा बदलू शकतो! @ MH 1st Conclave 2025 मध्ये सहभागी होण्यासाठी फॉलो करा ‘या’ स्टेप्स
2

तुमचा एक प्रश्न महाराष्ट्राची दिशा बदलू शकतो! @ MH 1st Conclave 2025 मध्ये सहभागी होण्यासाठी फॉलो करा ‘या’ स्टेप्स

Malegaon Blast Case :अपर्णा पुरोहित यांनी सांगितल्या अनेक धक्कादायक गोष्टी
3

Malegaon Blast Case :अपर्णा पुरोहित यांनी सांगितल्या अनेक धक्कादायक गोष्टी

जळगावात खळबळ! पोलीस उपनिरीक्षक निलंबित; तीन तरुणांना आधी नग्न केलं, लैंगिक चाळे करायला सांगितले, नंतर…
4

जळगावात खळबळ! पोलीस उपनिरीक्षक निलंबित; तीन तरुणांना आधी नग्न केलं, लैंगिक चाळे करायला सांगितले, नंतर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.