Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यातील दूध अनुदान योजनेला मुदतवाढ; शेतकऱ्यांना मिळणार प्रतिलिटर ७ रुपये अनुदान

या अगोदर त्यांनी प्रतिलीटर ५ रुपये अनुदान देवून दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिला होता. त्यानंतर आता शेतकऱ्यांना प्रतिलिटर मागे ७ रुपये अनुदान दिले जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे अनुदान योजनेला मुदतवाढ आणि अनुदानात वाढ करण्याची मागणी केली होती.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 25, 2024 | 12:00 PM
राज्यातील दूध अनुदान योजनेला मुदतवाढ; शेतकऱ्यांना मिळणार प्रतिलिटर ७ रुपये अनुदान

राज्यातील दूध अनुदान योजनेला मुदतवाढ; शेतकऱ्यांना मिळणार प्रतिलिटर ७ रुपये अनुदान

Follow Us
Close
Follow Us:

राज्यातील सहकारी व खासगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाला योग्य भाव मिळावा यासाठी शासनाकडून दिल्या जाणाऱ्या अनुदानात २ रुपयांनी वाढ केली असून आता शेतकऱ्यांना प्रतिलिटर मागे ७ रुपये अनुदान दिले जाणार आहे. वाढीव अनुदान योजनेमुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना यापुढेही प्रतिलिटर ३५ रुपये दर मिळणार असल्याची माहिती पशु संवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.

हेदेखील वाचा- एका बड्या नेत्याची पक्षात येण्याची इच्छा; जयंत पाटलांचा इशारा नक्की कोणाकडे?

दूध उत्पादकांच्या अडचणी पाहता, दुधाला वाढीव भाव मिळावा यासाठी मंत्री विखे पाटील सातत्याने प्रयत्न करत आहेत. या अगोदर त्यांनी प्रतिलीटर ५ रुपये अनुदान देवून दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिला होता. त्यानंतर आता शेतकऱ्यांना प्रतिलिटर मागे ७ रुपये अनुदान दिले जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दर अद्यापही अस्थिर

दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारातील दुधाची भुकटी आणि बटरचे दर अद्यापही स्थिरावले नसल्याने परिणामी राज्यात दुधाला योग्य दर मिळणे कठीण झाले आहे. त्यात शासनाची अनुदान योजना 30 सप्टेंबर पर्यंत चालू राहणार होती. यामुळे दूध उत्पादक शेतकरी पुन्हा आर्थिक अडचणीत आला असता म्हणून दूध उत्पादक शेतकऱ्यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे अनुदान योजनेला मुदतवाढ आणि अनुदानात वाढ करण्याची मागणी केली होती.

हेदेखील वाचा- ‘अधिकाऱ्यांना धमकवण्यासाठी गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्रात’; संजय राऊतांचा घणाघात

त्यानुसार मंत्री विखे पाटील यांनी सोमवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत दूध अनुदान योजनेला मुदतवाढ आणि ७ रुपये अनुदान देण्याचा प्रस्ताव आणला. या प्रस्तावाला मंत्रिमंडळाने मान्यता दिली. महायुती सरकारने दूध उत्पादक शेकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतल्यामुळे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच सर्व मंत्रिमंडळाचे आभार व्यक्त केले.

१ ऑक्टोबर पासून शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट अनुदानाची रक्कम

शासनाने दूध अनुदान योजनेला वाढ दिली असून वाढीव अनुदान योजनेचे पैसे १ ऑक्टोबर पासून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट वर्ग केले जाणार आहेत. दूध उत्पादक शेतकऱ्यांना दूध संघांनी १ ऑक्टोबर २०२४ पासून २८ रुपये प्रतिलिटर इतका दर देणे बंधनकारक राहणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना शासनामार्फत ७ रुपये प्रतिलिटर त्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येतील. सदर निर्णयामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

महायुती सरकारकडून विधानसभा निवडणूक आधी खबरदारी

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान दूध आणि कांद्याने महायुतीच्या उमेदवारांच्या डोळ्यातून अश्रु काढले होते. महायुतीच्या अनेक उमेदवारांना दूध दरवाढ व कांद्याच्या निर्यातबंदीमुळे लोकसभेला त्यांचा पराभव झाला होता. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीला पुन्हा एकदा महायुतीला फटका बसू नये यासाठी विधानसभा निवडणुकी आधी खबरदारी घेतल्याचे पाहायला मिळते.

Web Title: Extension of milk subsidy scheme in the state farmers will get a subsidy of rs 7 per litre

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2024 | 12:00 PM

Topics:  

  • maharashtra news
  • Radhakrushn Vikhe Patil

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: घुलेवाडी ग्रामपंचायतीवर सतप्त महिलांचा हंडा मोर्चा, पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर टँकर सुरू करण्याची मागणी
1

Ahilyanagar News: घुलेवाडी ग्रामपंचायतीवर सतप्त महिलांचा हंडा मोर्चा, पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर टँकर सुरू करण्याची मागणी

Parbhani News : दोन वर्षे उलटली, घोषणा हवेतच; 700 सेवकांचे कामबंद आंदोलन!
2

Parbhani News : दोन वर्षे उलटली, घोषणा हवेतच; 700 सेवकांचे कामबंद आंदोलन!

Maharashtra Politics : “…म्हणून काही महिला मोठं कुंकू अन् मंगळसूत्र घालतात; काँग्रेस नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य
3

Maharashtra Politics : “…म्हणून काही महिला मोठं कुंकू अन् मंगळसूत्र घालतात; काँग्रेस नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य

“शैक्षणिक पद्धतीला नवी दिशा आवश्यक”, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
4

“शैक्षणिक पद्धतीला नवी दिशा आवश्यक”, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.