टेंभुर्णी : देशात सोलापूर जिल्ह्यामध्ये 46 साखर कारखाने असलेल्या जिल्ह्यात साखर कारखानदार रिकव्हरी चोरण्याचे मोठे पाप करत असून यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे आणि यामुळे जिल्ह्यात ती ल शेतकऱ्यांचे 1700 कोटी रुपयांची नुकसान होत आहे.तर ऊस उत्पादक शेतकरी हाडाची काडं आणि रक्ताचे पाणी करून कर्जाच्या बोजातच अडकून आहे. सोलापूर जिल्ह्यात २ ते ३ टक्के रिकव्हरी चोरली जात असल्याचा आरोप स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला.ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज जनजागृती अभियान अंतर्गत मंगळवारी (ता.३) रोजी आढेगाव (ता. माढा) येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना माजी खासदार राजू शेट्टी यांनी कारखानदारावर हल्ला चढवडत आक्रमकपणे समाचारघेतला व शेतकऱ्यांची होणारी लुट थांबविण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे अहवान केले..तर .दोष जमिनीचा नाही तर ज्यांच्या ताब्यात ऊस दिला तो दरोडेखोर निघाला आहे’ असा राज्यातील कारखानदारांवर जोरदार घणाघात करत राज्यातील विविध जिल्ह्यातील ऊस दरातील फरक आणि ऊस रिकव्हरीच्या तफावतीचा लेखाजोखा मांडला.
यावेळी बोलताना खा.राजू शेट्टी म्हणाले, सोलापूर जिल्ह्यात देशातील सर्वाधिक ४६ साखर कारखाने असून ऊस गाळप आणि साखर निर्मितीतही देशात अव्वल आहे. उसापासून २२ पदार्थ तयार केले जातात. त्यापैकी इथेनॉलला सर्वाधिक दर असूनही उपपदार्थांच्या उत्पन्नाचा वाटा शेतकऱ्यांना दिला जात नाही. मात्र साखर कारखानदारांनी एकत्र येऊन ऊस दराच्या आडून शेतकऱ्यांची आर्थिक गळचेपी केली आहे. जिल्ह्यातील साखर कारखानदार नेते विकासपुरुष नव्हे तर नामवंत दरोडेखोर आहेत हे शेतकऱ्यांच्या ऊसापासून नव्हे तर रक्तापासून साखर बनवतात अशी टीका खा.शेट्टी यांनी केली.
सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक रिकव्हरीची चोरी
रिकव्हरी संदर्भात बोलताना राजू शेट्टी म्हणाले, सगळीकडे माती चांगली मग रिकव्हरी कमी का? साखरेचे इमानदारीने मोजमाप होत नाही. कारखानदार रात्री साखर बाहेर काढून विकतात. चोरीची साखर राज्यातील खाजगी दूध संघाना विकण्यात येते त्यामुळे बिगर जीएसटी आणि कमी दरात साखर मिळाल्याने खाजगी डेअरीवाल्यांना फायदा होतो. मात्र ऊस उत्पादक शेतकरी हाडाची काड आणि रक्ताचे पाणी करून कर्जाच्या बोजातच अडकून आहे. सोलापूर जिल्ह्यात २ ते ३ टक्के रिकव्हरी चोरली जात आहे त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा तोटा जास्त झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कोल्हापूर पेक्षा ७०० सातशे रुपये कमी दर मिळतो त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे १७५० कोटी रुपयांचे नुकसान दर कमी दिल्याने झाला आहे.
यावेळी इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे, स्वाभिमानी पक्ष प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील, प्रदेशाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा आघाडी अमरसिंह कदम, स्वाभिमानी पक्ष जिल्हाध्यक्ष शिवाजी पाटील , संघटना जिल्हाध्यक्ष तानाजी बागल, जिल्हाध्यक्ष युवा आघाडी विजय रणदिवे, जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील, माढा तालुका अध्यक्ष प्रताप पिसाळ, चंद्रकांत कुटे, टकले, दादासाहेब कळसाईत आदींसह शेतकरी ऊस उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते.