Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गुजरातपेक्षा महाराष्ट्रच ठरला सरस! फडणवीसांनी जाहीर केला परकीय गुंतवणूकीचा अहवाल

महाराष्ट्रासाठी आनंददायी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राची परकीय गुंतवणूकीची आकडेवारी समोर आणली आहे. यामध्ये आपले राज्य देशामध्ये अव्वल असून गुजरात पेक्षा आपण पुढे आहे. याची तपशीलवार माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Sep 06, 2024 | 11:28 AM
foreign investment report Maharashtra

foreign investment report Maharashtra

Follow Us
Follow Us:

मुंबई : मागील अनेक वर्षांपासून महाराष्ट्र आणि गुजरात राज्यामध्ये गुंतवणुकीची लढाई सुरु आहे. अनेक उद्योगधंदे गुजरात गेल्यामुळे गुजरात मोठा भाऊ ठरत असल्याचे महाराष्ट्राला वाटत होते. विरोधकांनी देखील यावरुन सत्ताधाऱ्यांना अनेकदा घेरले आहे. अर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये आणि सर्वात जास्त टॅक्स भरणाऱ्या महाराष्ट्रावर बेरोजगारीची पाळी येईल असे वर्तवले जात होते. आता मात्र महाराष्ट्रच गुजरातपेक्षा सरस असल्याचे समोर आले आहे. परकीय गुंतवणूकीचा अहवाल जाहीर करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स (ट्वीटर) या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर शेअर केली आहे.

सोशल मीडियावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रासाठी अत्यंत आनंददायी माहिती शेअर केली आहे. महाराष्ट्र गुंतवणूकीमध्ये अव्वल असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. यासाठी थेट अहवाल आणि आकडेवारी देवेंद्र फडणवीस यांनी शेअर केली आहे. आणि राज्यातील जनतेचे कौतुक केले आहे. 2024-2025 या आर्थिक वर्षातील परकीय गुंतवणुकीचा एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला असून यामध्ये देशातील एकूण गुंतवणुकीच्या 52.46 टक्के परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात झाल्याची मोठी बातमी देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

देवेंद्र फडणवीस यांचे ट्वीट काय?

अभिनंदन महाराष्ट्र ! अतिशय आनंदाची बातमी !! देशातील एकूण गुंतवणुकीच्या 52.46 टक्के. परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात !!! गेले दोन वर्ष सातत्याने परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात क्रमांक 1 वर असलेल्या आपल्या महाराष्ट्रात 2024-2025 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सुद्धा सर्वाधिक गुंतवणूक आली आहे. एप्रिल ते जून 2024 या पहिल्या तिमाहीत एकूण 70,795 कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे.

दुसर्‍या क्रमांकावरील कर्नाटक (19,059 कोटी),

तिसर्‍या क्रमांकावरील दिल्ली (10,788 कोटी),

चौथ्या क्रमांकावरील तेलंगणा (9023 कोटी),

पाचव्या क्रमांकावरील गुजरात (8508 कोटी),

सहाव्या क्रमांकावरील तामिळनाडू (8325 कोटी),

सातव्या क्रमांकावरील हरयाणा (5818 कोटी),

आठव्या क्रमांकावरील उत्तरप्रदेश (370 कोटी),

नवव्या क्रमांकावरील राजस्थान (311 कोटी)

या सर्वांच्या बेरजेपेक्षाही अधिक गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली आहे. थोडक्यात सांगायचे तर या तिमाहीत देशात आलेली एकूण गुंतवणूक ही 1,34,959 कोटी रुपये इतकी असून, त्यापैकी 70,795 कोटी अर्थात 52.46 टक्के एकट्या महाराष्ट्रात आली आहे.

अभिनंदन महाराष्ट्र !
अतिशय आनंदाची बातमी !!
देशातील एकूण गुंतवणुकीच्या 52.46 टक्के
परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात !!!
गेले दोन वर्ष सातत्याने परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात क्रमांक 1 वर असलेल्या आपल्या महाराष्ट्रात 2024-2025 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सुद्धा… pic.twitter.com/8XT2n7e0w2 — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 6, 2024

यापूर्वी

2022-23 : 1,18,422 कोटी (कर्नाटक, दिल्ली, गुजरात यांच्या एकत्रित बेरजेपेक्षा अधिक)

2023-24 : 1,25,101 कोटी (गुजरातपेक्षा दुपटीहून अधिक आणि गुजरात+कर्नाटक यांच्या बेरजेहून अधिक)

राज्यात 2014 ते 2019 या काळात सत्तेत असताना एकूण : 3,62,161 कोटी रुपये परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आली होती. अडीच वर्षांत आम्ही 5 वर्षांचे काम करुन दाखवू, हे पहिल्याच दिवशी ठणकावून सांगितले होते. आता सव्वा दोन वर्षांत 3,14,318 कोटी रुपयांची गुंतवणूक आम्ही आणून दाखविली. दुसऱ्या तिमाहीची आकडेवारी अजून बाकी आहे…

Web Title: Fadnavis announced foreign investment report maharashtra is way ahead of gujarat in foreign investment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2024 | 11:28 AM

Topics:  

  • devendra fadnavis
  • maharashtra

संबंधित बातम्या

Maharashtra Sarkar : महाराष्ट्रातील ‘आदर्श दस्त नोंदणी कार्यालयां’ ची केंद्र सरकारकडून दखल, इतक्या लाखांचे मिळणार अनुदान …
1

Maharashtra Sarkar : महाराष्ट्रातील ‘आदर्श दस्त नोंदणी कार्यालयां’ ची केंद्र सरकारकडून दखल, इतक्या लाखांचे मिळणार अनुदान …

Farmers Protest Maharashtra: कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजारांची मदत द्या; येडशीत शेतकऱ्यांचा रास्ता रोको
2

Farmers Protest Maharashtra: कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजारांची मदत द्या; येडशीत शेतकऱ्यांचा रास्ता रोको

शेतकऱ्यांसमोर नवे संकट..! प्रतिकूल हवामानाचा भात पिकाला फटका, भाताचा उत्पादन खर्च वाढला; तांदळाच्या दरवाढीची शक्यता
3

शेतकऱ्यांसमोर नवे संकट..! प्रतिकूल हवामानाचा भात पिकाला फटका, भाताचा उत्पादन खर्च वाढला; तांदळाच्या दरवाढीची शक्यता

Tukaram Mundhe FDA: ‘पुढची बदली…’ FDA मधून बदली झाल्यास कोणता विभाग हवा? तुकाराम मुंढे यांनी स्पष्टच सांगितलं…
4

Tukaram Mundhe FDA: ‘पुढची बदली…’ FDA मधून बदली झाल्यास कोणता विभाग हवा? तुकाराम मुंढे यांनी स्पष्टच सांगितलं…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.