Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Devendra Fadnavis News: फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; गुप्तचर विभागासाठी संयुक्त आयुक्त पदाची स्थापना

एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस यंत्रणेला पाकिस्तानद्वारे सक्रिय केले जाऊ शकणाऱ्या स्लीपर सेलवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: May 16, 2025 | 06:20 PM
cm devendra fadnavis press confernce in dehu pune on hindi Language in Maharashtra

cm devendra fadnavis press confernce in dehu pune on hindi Language in Maharashtra

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई:  देशातील दहशतवादी पार्श्वभूमीवर राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारने मुंबईच्या सुरक्षेच्या दृष्टीने  राज्य पातळीवर एक महत्त्वाचा निर्णय घेतला. राज्यातील गुप्तचर यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी आणि स्लीपर सेलसारख्या संवेदनशील घडामोडींवर नियंत्रण ठेवण्यासाठी मुंबई पोलिस दलात एका नव्या संयुक्त आयुक्त पदाची नियुक्ती करण्याचा निर्णय़ राज्य सरकारने घेतला आहे. हे शहरातील सहावे संयुक्त आयुक्त पद ठरणार आहे. अलीकडील भारत-पाकिस्तान लष्करी तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.

याआधी, मुंबई पोलिस दलात कायदा व सुव्यवस्था, गुन्हेगारी तपास, प्रशासन, वाहतूक व्यवस्था आणि आर्थिक गुन्हे नियंत्रण यांसाठी एकूण पाच संयुक्त आयुक्तपद  कार्यरत होते. त्यानंतर राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारने मुंबई पोलिस दलात “संयुक्त पोलिस आयुक्त (गुप्तचर विभाग)” या नव्या पदाला औपचारिक मान्यता दिली आहे. सरकारी आदेशानुसार, देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची सुरक्षा यंत्रणा आणि गुप्तचर व्यवस्था अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.

Uttar Pradesh : क्रूर अत्याचार! ‘तिला’ विवस्त्र करून ६ जणांनी केला आलटून पालटून बलात्कार, एवढेच नाही तर

संयुक्त आयुक्त गुप्तचर गोळा करण्याची जबाबदारी सांभाळणार

मुंबईतील गुप्तचर माहिती मिळवण्याचे काम सध्या विशेष शाखेमार्फत केले जाते. या शाखेचे नेतृत्व सध्या अतिरिक्त आयुक्त (उपमहानिरीक्षक दर्जा) करतात, जे संयुक्त पोलिस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) यांना अहवाल सादर करतात. मात्र, आता या विशेष शाखेचे नेतृत्व थेट संयुक्त आयुक्त (गुप्तचर) पातळीवरील वरिष्ठ अधिकारी करतील, असे एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले. हे पद महानिरीक्षक स्तराचे असेल.

मुंबईसारख्या शहरात धोका अधिक

मुंबई हे देशातील एक अत्यंत गजबजलेले महानगर असून,  देश-विदेशातील अनेक महत्त्वाचे, राजकीय नेते आणि नामवंत व्यक्ती सातत्याने येथे येत जात असतात. भारताचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती तसेच पंतप्रधान यांच्यासह अनेक उच्चपदस्थ व्यक्ती वेळोवेळी मुंबई दौऱ्यावर येत असतात. महाराष्ट्रच नव्हे तर देशपातळीवरही मुंबईला अनन्य साधारण महत्त्व असल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने येथे संभाव्य धोक्याची शक्यता तुलनेत अधिक असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

Yashwant Bank Fraud : यशवंत बँकेचा 150 कोटींच्या घोटाळ्याची CBI चौकशी करावी; खासदार मेधा कुलकर्णींची

गुप्तचर विभागाची ताकद वाढवणार

मुंबईतील सुरक्षा व्यवस्था लक्षात घेता, राज्य सरकार गेल्या काही काळापासून गुप्तचर विभागासाठी स्वतंत्र आणि विशेष पद निर्मिती करण्याचा विचार करत होते. आता या विचाराला प्रत्यक्ष स्वरूप देण्यात आले आहे.  नव्याने नेमल्या जाणाऱ्या संयुक्त पोलिस आयुक्त (गुप्तचर) यांचे प्रमुख काम गुप्तचर यंत्रणेचे सक्षमीकरण करणे असेल, असेही सांगण्यात  आले आहे.

स्लीपर सेलच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासोबतच हे अधिकारी कोणत्याही प्रकारच्या संभाव्य दहशतवादी किंवा समाजकंटकांच्या कारवायांची आगाऊ माहिती मिळवून ती संबंधित यंत्रणांना पुरवतील. त्यामुळे मुंबईची सुरक्षा व्यवस्था अधिक कार्यक्षम आणि प्रतिक्रियाशील होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

मुंबईच्या सुरक्षा व्यवस्थेला नवी दिशा

भारत-पाकिस्तानदरम्यानच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले असून, त्यामुळे मुंबईच्या सुरक्षा व्यवस्थेला एक नवी दिशा मिळणार आहे. याच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक सशक्त आणि कार्यक्षम गुप्तचर नेटवर्क उभारण्याचा पाया घालण्यात येणार आहे.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस यंत्रणेला पाकिस्तानद्वारे सक्रिय केले जाऊ शकणाऱ्या स्लीपर सेलवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे गुप्तचर माहिती प्रभावीपणे गोळा करता येईल आणि संभाव्य धोक्यांबाबत सतर्क राहण्यास मदत होईल.

 

Web Title: Fadnavis government to establish joint commissioner post for intelligence department

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2025 | 06:19 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Mumbai Police Force

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
1

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

Maharashtra Politics: मुख्यमंत्री फडणवीसांनी पूर्ण केली उद्धव ठाकरेंची ती इच्छा; एकनाथ शिंदे गटाला बसला जोरदार धक्का
2

Maharashtra Politics: मुख्यमंत्री फडणवीसांनी पूर्ण केली उद्धव ठाकरेंची ती इच्छा; एकनाथ शिंदे गटाला बसला जोरदार धक्का

Nashik News: कुंभमेळा कामांच्या ठेकेदारीवरून अधिकाऱ्यांना क्लीन चिट; शिंदे गटाला चपराक, फडणवीसांचे एका दगडात दोन पक्षी
3

Nashik News: कुंभमेळा कामांच्या ठेकेदारीवरून अधिकाऱ्यांना क्लीन चिट; शिंदे गटाला चपराक, फडणवीसांचे एका दगडात दोन पक्षी

Devendra Fadnavis : “समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्याची प्रशासनात ताकद…”, देवेंद्र फडणवीसांचे आवाहन
4

Devendra Fadnavis : “समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्याची प्रशासनात ताकद…”, देवेंद्र फडणवीसांचे आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.