Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 29 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Devendra Fadnavis: ॲपआधारित टॅक्सी सेवांमध्ये समान संधीवर भर; समुच्चय वाहन धोरणासाठी मुख्यमंत्र्यांच्या सूचना

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील ॲपआधारित टॅक्सी सेवा क्षेत्रात स्वतंत्र टॅक्सी चालकांनाही समान संधी मिळावी, यासाठी तंत्रज्ञान विकसित करून समुच्चय वाहन धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 29, 2026 | 04:43 PM
ॲपआधारित टॅक्सी सेवांमध्ये समान संधीवर भर; समुच्चय वाहन धोरणासाठी मुख्यमंत्र्यांच्या सूचना

ॲपआधारित टॅक्सी सेवांमध्ये समान संधीवर भर; समुच्चय वाहन धोरणासाठी मुख्यमंत्र्यांच्या सूचना

Follow Us
Follow Us:
  • सर्वांना समान संधी देणारे तंत्रज्ञान विकसित करून समुच्चय वाहन धोरण राबवा
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
  • स्वतंत्र टॅक्सी चालकांना न्याय देण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे सादरीकरण
मुंबई : राज्यातील स्वतंत्र टॅक्सी चालक आणि अ‍ॅग्रीगेटर कंपन्यांशी संलग्न चालकांना प्रवास वाटपामध्ये समान संधी मिळावी, तसेच प्रवासी वाहतूक क्षेत्रात पारदर्शक आणि न्याय्य स्पर्धेचे वातावरण निर्माण व्हावे, यासाठी सर्वांना समान संधी उपलब्ध करून देणारे स्वतंत्र तंत्रज्ञानाचे प्लॅटफॉर्म विकसित करून समुच्चय वाहन धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिले आहेत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महाराष्ट्र मोटार व्हेईकल अ‍ॅग्रीगेटर रुल्स, २०२६ अंतर्गत समुच्चय वाहन धोरणाच्या अंमलबजावणीबाबत मुख्यमंत्र्यांकडे सविस्तर सादरीकरण केले. त्यावेळी स्वतंत्र टॅक्सी चालकांच्या रोजगाराचे संरक्षण आणि त्यांना न्याय्य संधी मिळण्याच्या दृष्टीने विविध मुद्दे मांडण्यात आले.

स्वतंत्र टॅक्सी चालकांना प्रवास

राज्यात ओला, उबर आणि अन्य अ‍ॅग्रीगेटर कंपन्यांच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक व्यवसायाचा विस्तार होत असताना स्वतंत्र टॅक्सी चालकांना प्रवास मिळण्यात, उत्पन्न मिळविण्यात आणि मोठ्या फ्लीट ऑपरेटरशी स्पर्धा करण्यात अडचणी येत असल्याच्या तक्रारी आहेत. या पार्श्वभूमीवर विद्यमान व्यवस्थेतील त्रुटी दूर करून सर्व चालकांना समान संधी देणारी, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित व्यवस्था निर्माण करण्याची आवश्यकता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सादरीकरणातून अधोरेखित केली.

Accident News Pune: डंपरच्या धडकेत ६५ वर्षीय वृद्धाचा दुर्दैवी अंत! तळेगाव एमआयडीसीत ग्रामस्थांचा चक्का जाम

प्रवास वाटप प्रणालीत पारदर्शकता आणणार!

अ‍ॅपच्या माध्यमातून चालकांना प्रवासाचे वाटप करताना वापरण्यात येणाऱ्या अल्गोरिदमची कार्यपद्धती स्पष्ट नसल्याची तक्रार स्वतंत्र चालकांकडून केली जाते. विमानतळासारख्या प्रमुख ठिकाणांहून मिळणाऱ्या अधिक उत्पन्नाच्या फेऱ्यांमध्ये मोठ्या फ्लीट ऑपरेटरच्या चालकांना प्राधान्य मिळत असल्याची, तर स्वतंत्र चालकांना तुलनेने कमी उत्पन्नाच्या फेऱ्या मिळत असल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यामुळे प्रवास वाटपाची प्रणाली पारदर्शक असावी आणि कोणत्याही चालकावर अन्याय होणार नाही, यासाठी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून समान संधी उपलब्ध करून देण्याची गरज मांडण्यात आली.

स्वतंत्र चालक आणि मोठ्या कंपन्यांसाठी समान नियम

स्वतंत्र चालकांच्या किरकोळ चुकांवर खाते बंद करणे किंवा निलंबनासारखी कारवाई केली जात असल्याच्या तक्रारी आहेत. दुसरीकडे, मोठ्या फ्लीट ऑपरेटरच्या बाबतीतही समान निकषांनुसार कारवाई होते का, याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. एव्हरेस्ट फ्लीट्स, मूव्ह फ्लीट आणि कॅर्रम फ्लीट यांसारख्या मोठ्या फ्लीट ऑपरेटरना मिळणाऱ्या कथित प्राधान्यामुळे स्वतंत्र चालकांच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याचे सादरीकरणात नमूद करण्यात आले. या पार्श्वभूमीवर सर्व चालकांसाठी समान नियम, समान निकष आणि निष्पक्ष कार्यपद्धती असण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली.

चालकांचे उत्पन्न, सामाजिक सुरक्षा आणि तांत्रिक लेखापरीक्षण

प्रवासाचे भाडे निश्चित करणे, प्रोत्साहनपर रक्कम देणे, चालकांचे मूल्यांकन करणे आणि प्रवास वाटप करणे या प्रक्रियांमध्ये पारदर्शकता असावी. तसेच चालकांना मिळणारे उत्पन्न, कामाचे तास, विमा संरक्षण, भविष्य निर्वाह निधी (पीएफ) आणि कर्मचारी राज्य विमा (ईएसआय) यांसारख्या सामाजिक सुरक्षाविषयक बाबींची स्पष्टता असावी, अशी मागणी करण्यात आली.

प्रवास वाटप, जिओ-फेन्सिंग, लाइव्ह जिओ-लोकेशन आणि वाढीव भाडे निश्चिती यांसारख्या तांत्रिक प्रणालींचे स्वतंत्र लेखापरीक्षण करण्याची आवश्यकता देखील सादरीकरणातून मांडण्यात आली. या प्रणालींच्या कार्यपद्धतीवर प्रभावी देखरेख ठेवून त्यांचा वापर सर्व चालकांच्या हितासाठी होणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

समान संधी देणाऱ्या तंत्रज्ञानाधारित व्यवस्थेला प्राधान्य

समुच्चय वाहन धोरणाचा उद्देश केवळ अ‍ॅग्रीगेटर कंपन्यांच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक नियंत्रित करणे नसून, स्वतंत्र टॅक्सी चालकांसह सर्व संबंधित घटकांना समान संधी उपलब्ध करून देणे हा आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर करून प्रवास वाटपात पारदर्शकता आणणारा आणि मोठ्या कंपन्यांचे वर्चस्व किंवा कोणत्याही प्रकारचा भेदभाव टाळणारा प्लॅटफॉर्म विकसित करण्यावर भर देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

या व्यवस्थेमुळे स्वतंत्र टॅक्सी चालकांच्या रोजगाराचे संरक्षण होण्यास, स्थानिक भूमिपुत्रांना व्यवसायाच्या समान संधी मिळण्यास आणि प्रवासी वाहतूक क्षेत्रात न्याय्य स्पर्धा निर्माण होण्यास मदत होईल. त्याचबरोबर प्रवाशांना सुरक्षित, दर्जेदार आणि परवडणारी सेवा मिळावी, यासाठी समुच्चय वाहन धोरणाची अंमलबजावणी अधिक पारदर्शक आणि परिणामकारक करण्याच्या दृष्टीने शासन प्रयत्नशील राहणार आहे.

Tiger Shroff Firing Case Update: सुरक्षा रक्षकांशिवाय फुटबॉल खेळत होता टायगर! शूटर अगदी जवळ, तरीही का नाही झाला हल्ला?

💡

Frequently Asked Questions

  • Que: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणते निर्देश दिले आहेत?

    Ans: ॲपआधारित वाहतूक सेवा क्षेत्रात सर्वांना समान संधी देणारे तंत्रज्ञान विकसित करून समुच्चय वाहन धोरण प्रभावीपणे राबवण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

  • Que: प्रताप सरनाईक यांनी कोणत्या विषयावर सादरीकरण केले?

    Ans: स्वतंत्र टॅक्सी चालकांना न्याय मिळावा आणि ॲपआधारित टॅक्सी सेवा क्षेत्रात त्यांना समान संधी मिळावी, यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सादरीकरण केले.

  • Que: समुच्चय वाहन धोरणाचा उद्देश काय आहे?

    Ans: ॲपआधारित टॅक्सी सेवांचे नियमन करणे, चालकांच्या हिताचे संरक्षण करणे, भाडे आणि सेवा व्यवस्थेत पारदर्शकता आणणे तसेच प्रवाशांना सुरक्षित व दर्जेदार वाहतूक सेवा उपलब्ध करून देणे हा या धोरणाचा उद्देश आहे.

Web Title: Devendra fadnavis aggregator vehicle policy equal opportunities taxi drivers pratap sarnaik sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2026 | 04:43 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • maharashtra
  • pratap sarnaik

संबंधित बातम्या

Nagpur MLC Election 2026: हा पराभव लपवता येणार नाही…: नागपूर निकालावरून नाना पटोलेंनी मुख्यमंत्र्यांना डिवचले
1

Nagpur MLC Election 2026: हा पराभव लपवता येणार नाही…: नागपूर निकालावरून नाना पटोलेंनी मुख्यमंत्र्यांना डिवचले

NCMC Card Registration: महिलांनो, NCMC कार्ड नोंदणी करा अन्यथा…; एसटी महामंडळाचे निर्देश
2

NCMC Card Registration: महिलांनो, NCMC कार्ड नोंदणी करा अन्यथा…; एसटी महामंडळाचे निर्देश

Ravikant Tupkar: ५ हजारांची मदत म्हणजे शेतकऱ्यांची फसवणूक? रविकांत तुपकर आक्रमक; पुढील महिन्यात मोठ्या आंदोलनाचा इशारा
3

Ravikant Tupkar: ५ हजारांची मदत म्हणजे शेतकऱ्यांची फसवणूक? रविकांत तुपकर आक्रमक; पुढील महिन्यात मोठ्या आंदोलनाचा इशारा

Nagpur Graduate Constituency Election 2026: संघ अन् मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात भाजपच्या पराभवाची काय आहेत कारणे?
4

Nagpur Graduate Constituency Election 2026: संघ अन् मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात भाजपच्या पराभवाची काय आहेत कारणे?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.