Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 29 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur MLC Election 2026: हा पराभव लपवता येणार नाही…: नागपूर निकालावरून नाना पटोलेंनी मुख्यमंत्र्यांना डिवचले

Nana Patole Criticized  Devendra Fadnavis:  "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या निकालांसंदर्भात अतिघाईने केलेले ट्विट आणि ते रिट्विट करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना अखेर ते ट्विट डिलीट करावे लागले. फडणवीस यांनी पराभवाची कितीही सारवासारव केली, तरी हा पराभव लपवता येणार नाही.

  • By anuradha sagar
Updated On: Oct 29, 2026 | 02:03 PM
Nagpur News, Nana Patole, Devendra Fadnavis, BJP, Congress

Nagpur News, Nana Patole, Devendra Fadnavis, BJP, Congress

Follow Us
Follow Us:
  • नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपचा पराभव
  • पंतप्रधान मोदींचे ट्विट मुख्यमंत्र्यांनी केले होते रिट्विट
  • नागपूरचा निकाल विरोधात जाताच ते रिट्विट अकाऊंटवरून डिलीट
Nana Patole Criticized  Devendra Fadnavis:  नागपूर पदवीधर निवडणुकीत भाजप उमेदवार सुधाकर कोहळे यांचा दारूण पराभव झाला. या पराभवामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बालेकिल्ल्यातच या पराभवामुळे मोठी नामुष्की ओढावल्याची चर्चा आहे. देशभरातील विधानपरिषद (MLC Election) निकालांवरून विरोधी पक्षांना डिवचणारे एक ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. तेच ट्विट देवेंद्र फडणवीस यांनीही रिट्विट केले होते. पण नागपूरचा निकाल विरोधात जाताच फडणवीस यांनी ते ट्विट डिलीट केले. हे ट्विट डिलीट केल्यानंतर काँग्रेसने भाजपला कोंडीत पकडले आहे.

कितीही सारवासारव केली तरी ट्विट डिलीट करावेच लागले; नाना पटोलेंचा टोला

काँग्रेस नेते नाना पटोले यांनी त्यांच्या ट्विटर ‘एक्स’वर (ट्विटर) पोस्ट करत भाजपवर टिकास्त्र डागले आहे. “सर्व शासकीय यंत्रणा, सत्ता आणि पैशाचा जोर उधळवून लावत नागपूर पदवीधर मतदारसंघात काँग्रेस-महाविकास आघाडीचा तिरंगा पुन्हा डौलाने फडकला आहे. अभिजित वंजारी यांच्या पाठीशी सुशिक्षित पदवीधरांनी भक्कम ताकद उभी केली.”

NCMC Card Registration: महिलांनो, NCMC कार्ड नोंदणी करा अन्यथा…; एसटी महामंडळाचे निर्देश

ट्विट डिलिट करण्याची नामुष्की

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या निकालांसंदर्भात अतिघाईने केलेले ट्विट आणि ते रिट्विट करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना अखेर ते ट्विट डिलीट करावे लागले. फडणवीस यांनी पराभवाची कितीही सारवासारव केली, तरी हा पराभव लपवता येणार नाही. नागपुरात काँग्रेसचाच झेंडा कायम फडकत राहील,” असा टोला नाना पटोलेंनी लगावला आहे.

खरंतरं, देशातील चार प्रमुख राज्यामध्ये झालेल्या विधान परिषद निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. नागपूर हा भाजप आणि आरएसएसचा बालेकिल्ला मानला जातो. पण याच बालेकिल्ल्यात भाजपचा दारूण पराभव झाल्यामुळे भाजपवर मोठी नामुष्की ओढवली आहे.त्यावरुनही नरेंद्र मोदी यांनी केलेल्या ट्विटवरून नाना पटोलेंनी भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

US Nuclear Lab : अमेरिकेच्या प्रमुख अणुप्रयोगशाळेत अचानक भीषण आग; आणीबाणी जाहीर, जाणून घ्या नक्की

पंतप्रधान मोदींचे 28 जागांचे ते ट्विट अन् फडणवीसांची पंचाईत

महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार या चार राज्यांतील २८ शिक्षक व पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकांचा दाखला देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर उपरोधिक टीका केली होती. ज्या निवडणुकांमध्ये ईव्हीएमऐवजी मतपत्रिकांचा वापर करण्यात आला, त्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला किती जागा जिंकता आल्या, असा सवाल पंतप्रधान मोदींनी उपस्थित केला.

पंतप्रधानांच्या या विधानाला भाजपच्या अनेक नेत्यांनी पाठिंबा दिला. अनेक नेत्यांनी पंतप्रधानांचे ते ट्विट रिट्विटही केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हे ट्विट रिट्विट केले होते. पण नागपूरच्या निकालानंतर अवघ्या काही मिनिटातचं त्यांना ट्विट डिलीट करावे लागले.

Video Viral: ‘आज मला पुरुष असल्यासारखं वाटलं…’, रात्री २ वाजता मुंबईत उतरली, कॅबमध्ये बसली अन्…

नागपूरच्या निकालाने राजकीय समीकरणे बदलली

मात्र, नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपचे अधिकृत उमेदवार सुधाकर कोहळे यांचा पराभव झाला. तेव्हापासून राजकीय वर्तुळात या ट्विटची चर्चा सुरू झाली. मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यातच भाजपच्या उमेदवाराचा पराभव धाल्याने विरोधकांना सत्ताधारी पक्षावर टीका करण्याची संधी मिळाली.

या निकालानंतर संबंधित ट्विट मागे घेण्याची किंवा हटवण्याची वेळ भाजपच्या काही नेत्यांवर आल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे मतपत्रिकांवरील निवडणुका आणि काँग्रेसच्या कामगिरीबाबत केलेल्या विधानाची नागपूरच्या निकालाशी तुलना केली जात आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: नागपूर पदवीधर निकालांनंतर मुख्यमंत्र्यांनी कोणते ट्विट डिलीट केले?

    Ans: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विधानपरिषद निकालांवरून विपक्षी पक्षांना डिवचणारे जे ट्विट केले होते, तेच ट्विट मुख्यमंत्र्यांनी रिट्विट केले होते. नागपूरचा निकाल विरोधात गेल्यावर ते डिलीट करण्यात आले.

  • Que:  नाना पटोले यांनी भाजपवर कोणती टीका केली आहे?

    Ans: नाना पटोले यांनी म्हटले आहे की, अतिघाईत केलेले ट्विट आणि रिट्विट डिलीट करण्याची नामुष्की मुख्यमंत्र्यांवर ओढावली असून, कितीही सारवासारव केली तरी भाजपला बालेकिल्ल्यातील पराभव लपवता येणार नाही.

  • Que:  नागपूर पदवीधर मतदारसंघात कोणाचा विजय झाला आहे?

    Ans: नागपूर पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे अभिजित वंजारी यांनी भाजपचे उमेदवार सुधाकर कोहळे यांचा पराभव करत विजय मिळवला आहे.

Web Title: Nana patole slams devendra fadnavis deleting retweet after nagpur mlc defeat as

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2026 | 02:03 PM

Topics:  

  • BJP
  • Congress
  • devendra fadnavis
  • Nagpur News
  • Nana patole

संबंधित बातम्या

Nagpur Graduate Constituency Election 2026: संघ अन् मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात भाजपच्या पराभवाची काय आहेत कारणे?
1

Nagpur Graduate Constituency Election 2026: संघ अन् मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात भाजपच्या पराभवाची काय आहेत कारणे?

Nagpur MLC Election 2026: RSS-भाजपच्या बालेकिल्ल्यात पंजाचा तडाखा; अभिजित वंजारींनी राखला नागपूर पदवीधरचा गड
2

Nagpur MLC Election 2026: RSS-भाजपच्या बालेकिल्ल्यात पंजाचा तडाखा; अभिजित वंजारींनी राखला नागपूर पदवीधरचा गड

Nagpur News : नेत्यांच्या आडून व्यापाऱ्यांना ब्लॅकमेलिंग; एफडीए-पोलिसांचा धाक
3

Nagpur News : नेत्यांच्या आडून व्यापाऱ्यांना ब्लॅकमेलिंग; एफडीए-पोलिसांचा धाक

Nagpur News : कांद्याचे भाव कडाडले; बाजारात ८० रुपये किलो
4

Nagpur News : कांद्याचे भाव कडाडले; बाजारात ८० रुपये किलो

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.