मुंबई: “अजित पवार यांच्यावर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच भोपाळमध्ये एका जाहीर सभेत 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही ज्यांच्यावर आरोप केले, अजित पवार यांची फायनल इन्क्वायरी सुरू होण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांची सही लागते, ती सही कुणी केली तर देवेंद्र फडणवीसांनी केली.” असा प्रश्न उपस्थित करत खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजप आणि उपमुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे. सुप्रिया सुळे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना अजित पवारांवर झालेल्या आरोपांबाबत विचारले असता त्यांनी या आरोपांवर भाष्य केलं आहे.
काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी सांगलीत बोलताना दिवंगत गृहमंत्री आर आर पाटील यांनी आपला केसाने गळा कापला, 70 हजार कोटींच्या घोटाळ्याबाबत त्यांनी आपली चौकशी करण्याचे आदेश दिले, असा आरोप अजित पवार यांनी केला होता. त्यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, ” उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही ज्यांच्यावर आरोप केले, अजित पवार यांची फायनल इन्क्वायरी सुरू होण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांची सही लागते, ती सही कुणी केली तर देवेंद्र फडणवीसांनी केली. ते तेवढ्यावर ते थांबले नाही. फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना ऑन ओथ (शपथेवर) त्यांनी ती फाईल्स घरी मागवल्या, ज्या अजित पवारांवर आरोप केले त्यांना ती फाईल दाखवली. हे अजित पवार स्वत:च सांगलीमध्ये सांगितलं. हे वारंवार विचारूनही एकदाही फडणवीसांनी नकार दिलेला नाही. याला आता आठ-दहा दिवस उलटले. याचा अर्थ ते सत्य आहे. आता फडणवीसांना हे सांगावं लागेल की त्यांनी अजित पवारांवर जो आरोेप केला तो खरा होता की खोटा होता.
हेही वाचा :आतापर्यंत पक्षांचे आता थेट मतदारांचा जाहीरनामा…; खडकवासलामधील जाहीरनामा तुफान व्हायरल
रजनी इंदुलकर, नीता पाटील आणि विजया पाटील या माझ्या आणि अजित पवार यांच्या तीन बहिणी. यांच्या घरावर जेव्हा इडीची धाड पडली. पाच पाच दिवस रेड टाकली, कारखान्यांच्या जप्त्या, घरांना नोटीसा पाठवल्या त्या कोणत्या आधारावर केल्या. आम्ही तर सत्तेत नव्हतो, अदृश्य शक्तींनी हे सगळं केलं. हे सर्वजण आता त्यांच्यासोबत सत्तेत आहेत. हे सर्व खरं असेल तर त्यांनी फाईल दाखवलीच कशी, याचा अर्थ त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक केली.. जर आरोप खोटे असतील तरीही त्यांनी महाराष्ट्राला फसवलं. हे सर्व षडयंत्र अदृश्य शक्ती आणि देवेंद्र फडणवीसांनी केलं आहे, हा माझा आरोप आहे. याचं उत्तर त्यांना द्याव लागेल, असा आरोपही सुप्रिया सुळे यांनी यावेळी केला.
हेही वाचा : सापाने चावताच तरुणाने केलं असं… पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल, Video Vira