Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Farmers News : शेतकऱ्यांसाठी दिलासादायक! धान खरेदीच्या ऑनलाइन नोंदणीला मुदतवाढ

Farmers News in Marathi : शेतकऱ्यांची सोय आणि तांत्रिक बाबींचा विचार करून प्रशासनाने नोंदणीचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या मुदतवाढीमुळे अद्याप नोंदणी न करू शकलेल्या हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Dec 19, 2025 | 06:29 PM
शेतकऱ्यांसाठी दिलासादायक! धान खरेदीच्या ऑनलाइन नोंदणीला मुदतवाढ

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक! धान खरेदीच्या ऑनलाइन नोंदणीला मुदतवाढ

Follow Us
Close
Follow Us:
  • शेतकऱ्यांची सोय आणि तांत्रिक बाबींचा विचार
  • प्रशासनाने नोंदणीचा कालावधी वाढवण्याचा निर्णय
  • हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
आधारभूत किंमत योजना खरीप हंगाम २०२५-२६ अंतर्गत धानविक्रीसाठी आवश्यक असणाऱ्या ऑनलाइन शेतकरी नोंदणी प्रक्रियेला आता ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी ही मुदत १५ डिसेंबरपर्यंत निश्चित करण्यात आली होती. मात्र, शेतकऱ्यांची सोय आणि तांत्रिक बाबींचा विचार करून प्रशासनाने नोंदणीचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या मुदतवाढीमुळे अद्याप नोंदणी न करू शकलेल्या हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, पणन विभागाने या संदर्भातील सुधारीत शासनपत्र जारी केले आहे.

Devendra Fadnavis : “भारताला पुन्हा एकदा ‘विश्वगुरू’ होण्याची क्षमता…”, देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

जिल्हा पणन अधिकारी एस. बी. चंद्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार, खरीप हंगामातील धान खरेदीसाठी जिल्ह्यातील विविध केंद्रांवर नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. ज्या संस्थांना धान खरेदीचे अधिकार देण्यात आले आहेत, त्यांनी विहित मुदतीत म्हणजे ३१ डिसेंबरपर्यंत सर्व शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण करणे अनिवार्य आहे. या प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी शासनाने काही कठोर नियम आणि अटी लागू केल्या आहेत, ज्यांचे पालन करणे शेतकरी आणि संस्था या दोघांसाठीही आवश्यक आहे. नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे आणि अटी नोंदणी प्रक्रियेत कोणताही तांत्रिक अडथळा येऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी खालील कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे. चालू हंगाम खरीप २०२५-२६ चा पीकपेरा नोंद असलेला ७/१२ उतारा असणे बंधनकारक आहे. शेतकऱ्याच्या सद्यस्थितीत सुरू असलेल्या बँक खात्याच्या पासबुकची छायांकित प्रत किंवा रद्द केलेला धनादेश ओळखपत्रः आधार कार्डची स्पष्ट छायांकित प्रत. शेतकऱ्याचा अधिकृत आणि सुरू असलेला मोबाईल क्रमांक.

गैरप्रकार झाल्यास संस्थांवर होणार कठोर कारवाई: शासकीय नियमानुसार पारदर्शक पद्धतीने नोंदणी पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित खरेदी संस्थांची आहे. नोंदणी करताना कोणताही गैरप्रकार, चुकीची माहिती किंवा बोगस नोंदणी आढळल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित संस्थेची राहील. अशा प्रकरणांत दोषी आढळणाऱ्या संस्थांवर कडक प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा जिल्हा पणन अधिकारी एस. बी. चंद्रे यांनी दिला आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व धान उत्पादक शेतकऱ्यांनी या मुदतवाढीचा लाभ घ्यावा आणि ३१ डिसेंबर पूर्वी आपली नोंदणी पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. यामुळे आधारभूत किमतीचा लाभ मिळणे शेतकऱ्यांसाठी सुलभ होणार आहे.

लाइव्ह फोटो आणि प्रत्यक्ष उपस्थिती अनिवार्य

नोंदणी प्रक्रियेत होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने तंत्रज्ञानाचा वापर वाढवला आहे. ऑनलाईन नोंदणी करताना संबंधित शेतकरी प्रत्यक्ष नोंदणी केंद्रावर हजर असणे आवश्यक आहे. नोंदणी प्रक्रियेदरम्यान शेतकऱ्याचा ‘लाईव्ह फोटो’ घेऊनच नोंदणी पूर्ण केली जाईल. कोणत्याही परिस्थितीत ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असे पणन विभागाने स्पष्ट केले आहे. केवळ ‘बीम’ पोर्टलवर झालेली नोंदणीच ग्राह्य धरली जाईल.

बँक खात्याबाबत अत्यंत महत्त्वाची खबरदारी

धान खरेदीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते, त्यामुळे बँक तपशील भरताना विशेष दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ‘बीम’ पोर्टलवर बँक खात्याची माहिती अचूक नोंदवली पाहिजे. नोंदणी करताना संबंधित खाते ‘अॅक्टिव्ह’ असल्याची खात्री संस्थेने करणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे, नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्याच्या नावेच ते बँक खाते असावे. पासबुकमध्ये एकापेक्षा जास्त व्यक्तींची नावे नसावीत, याची दक्षता घेण्यास सांगण्यात आले आहे. एकापेक्षा जास्त नावे असल्यास तांत्रिक अडचणी निर्माण होऊन चुकारे मिळण्यास विलंब होऊ शकतो.

Mumbai Metro: मुंबईकरांसाठी ‘न्यू इयर गिफ्ट’! ३१ डिसेंबरला दोन नवीन मेट्रो मार्ग होणार खुले

Web Title: Farmers extension of deadline for online paddy purchase registration

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 19, 2025 | 06:29 PM

Topics:  

  • Farmers
  • maharashtra
  • Nashik

संबंधित बातम्या

Thane Election 2025: ठाणे जिल्ह्यातील सहा महापालिकांसाठी शिवसेनेतून ३३४८ इच्छुक
1

Thane Election 2025: ठाणे जिल्ह्यातील सहा महापालिकांसाठी शिवसेनेतून ३३४८ इच्छुक

वाशी सुविधा केंद्रातून हंगामातील डाळिंबाचा पहिला कंटेनर समुद्रमार्गे अमेरिकेसाठी रवाना
2

वाशी सुविधा केंद्रातून हंगामातील डाळिंबाचा पहिला कंटेनर समुद्रमार्गे अमेरिकेसाठी रवाना

Devendra Fadnavis : “भारताला पुन्हा एकदा ‘विश्वगुरू’ होण्याची क्षमता…”, देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
3

Devendra Fadnavis : “भारताला पुन्हा एकदा ‘विश्वगुरू’ होण्याची क्षमता…”, देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Bhandara News: धान खरेदीसाठी शेतकऱ्यांना दिलासा! ऑनलाइन नोंदणीसाठी मुदतवाढ जाहीर, नियम जाणून घ्या
4

Bhandara News: धान खरेदीसाठी शेतकऱ्यांना दिलासा! ऑनलाइन नोंदणीसाठी मुदतवाढ जाहीर, नियम जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.