
गेल पाईपलाईनसाठी शेतकऱ्यांचा विरोध, शेतातून एक इंचही जागा जाऊ देणार नाही; नेमकं प्रकरण काय ?
पेण (विजय मोकल) :- पेण ग्रामीण भागात एमएमआरडीएचे विकास प्रकल्प झपाट्याने वाढत आहेत. अशातच आता गेल पाईपलाईन प्रकल्पावर स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. गेल पाईपलाईनसाठी शेतकऱ्यांच्या शेतातून एक इंचही जागा जाऊ देणार नाही. असा ठाम निर्धार माजी तहसीलदार व २४ गाव संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष सुभाष म्हात्रे यांनी वाशी येथे झालेल्या बैठकीत व्यक्त केला.सेझ, गेल पाईपलाईन प्रकल्प, एमएमआरडीए, कांदळवन व इतर अनेक प्रकल्प पेण तालुक्यात प्रस्थावित असून परिसरातून मुक्त होण्याकरीता अनेक शेतकरी संघटना, लोक प्रतिनीधी व शेतकरी यांचे प्रयत्न शासन दफ्तरी व न्यायालयीन चालू आहेत. परंतू प्रत्यक्षात शेतकरी या लढ्यात उतरताना संभ्रमा अवस्थेत असल्याचे दिसत आहेत. त्यासाठी सर्वांनी संघठीत होऊन एका एत्रछायेखाली येऊन संघर्षाची नवी दिशा ठरविण्यासाठी पेण तालुक्यातील जगदंबा माता मंदिर वाशी येथे २४ गाव संघर्ष समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. प्रथम संघटनेचे दिवंगत अध्यक्ष स्वर्गीय दिलीप पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी नंदा म्हात्रे, माजी निवृत्त न्यायाधीश डी पी पाटील, अनंत पाटील, चंद्रहास म्हात्रे, राजन झेमसे, हेमंत पाटील व इतरांनी या लढ्याबाबत विचार मांडले.
Walmik Karad: वाल्मीक कराडचे काय होणार? केज कोर्टात उद्या होणार महत्वाची सुनावणी
२००६ साली एसईझेड कंपनीने पेण तालुक्यातील २४ गावातील प्रकल्पासाठी कमी दरात शेतकर्यांच्या जमीन खरेदी केल्या होत्या. परंतु आज पर्यंत या जागेवर कोणताही प्रकल्प झाला नाही.आज पर्यत एसईझेड विरोधात शेतकऱ्यांचे ४५ मोर्चझाले.पंरतु शासनाकडून फक्तं आश्वासन दिली जातात आश्वासनाची पूर्तता केली जात नाही. त्यासाठी या बैठकीत यापुढील आंदोलन तिव्र केला जाईल असा एकमताने ठराव घेण्यात आला.”कुठलीही जमीन प्रकल्पासाठी घ्ययचीआसेल तर कमीत कमी ५००एकर जमीन एकत्र आसावी लागते. एसईझेड ने घेतलेल्या जमिन एकत्रपणे नाहीत. शेतकऱ्यांच्या घेतलेल्या जमीन अडवून का ठेवता. त्या जमिन परत करा. बोलताना निवृत्त न्यायाधीश डी पी पाटील यांनी सांगितले.
यावेळी एमएमआरडीए, सेझ, गेल पाईप लाईन, कांदळवन एसईझेड विरोध अधिक तिव्र करणार, विकलेल्या जमिनी परत शेतकऱ्यांना मिळवण्यासाठी रस्त्यावर उतरून लढाई लढणार असा इशारा माजी तहसीलदार सुभाष म्हात्रे यांनी दिला. सदर बैठकीत सुभाष म्हात्रे,अनंत पाटील, नंदा म्हात्रे, गंगाधर ठाकुर, राजन झेमसे, समीर म्हात्रे, काशिनाथ पाटील , हेमंत पाटिल,अनंत पाटील सोनखार, महेंद्र ठाकूर, ए बी पाटील, गांवड तात्या, पत्रकार विजय मोकल, प्रकाश माळी, चंद्रहास म्हात्रे तसेच मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.