वाल्मीक कराडच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी (फोटो- टीम नवराष्ट्र)
बीड: बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण चांगलेच तापले आहे. या हत्या प्रकरणाचा तपास एसआयटी करत आहे. या प्रकरणातील आरोपीना अटक करण्यात आली आहे. मात्र अजूनही कृष्णा आंधळे हा आरोपी फरार आहे. दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडणीतील आरोपी वाल्मीक कराडला देखील एसआयटी कोठडी सुनावली आहे. दरम्यान वाल्मीक कराडच्या जामीन अर्जावर उद्या कोर्टात सुनावणी होणार आहे.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण राज्यभरात चर्चेत आहे. या प्रकरणात दररोज नवंनवीन खुलासे होत आहेत. विरोधक आणि महायुतीमधील काही नेते मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. दरम्यान वाल्मीक कराडला खंडणी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. मात्र या खंडणी प्रकरणाचा संतोष देशमुख यांच्या हत्येचा संबंध आहे का याचा तपास एसआयटी आणि सीआयडी करत आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराडचा सहभाग असल्याचा आरोप केला हात आहे. दरम्यान या प्रकरणात वाल्मीक कराडवर मकोका अंतर्गत कावर करण्यात आली आहे. त्यानंतर वाल्मीक कराडला 7 दिवसांची एसआयटी कोठडी कोर्टाने सुनावली आहे. मकोका अंतर्गत कारवाई केल्यानंतर त्याला बीड कोर्टाने कोठडी सुनावली आहे. दरम्यान उद्या वाल्मीक कराडच्या केज कोर्टात त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.
हेही वाचा: Dhananjay Munde: “…तरी काही फायदा होणार नाही”; मंत्री धनंजय मुंडे आक्रमक, ‘या’ प्रकरणावर केलं भाष्य
केज कोर्टात झालेल्या सुनावणीमध्ये केज कोर्टाने वाल्मीक कराडला न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर लगेचच त्याने जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र या अर्जाला सीआयडीने कोर्टात आव्हान दिले आहे. संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मीक कराडची चौकशी करायची आहे, त्यामुळे त्याला जामीन देऊ नये अशी विनंती सीआयडीने कोर्टासमोर केली आहे. उद्या कराडच्या अर्जावर सुनावणी होणार आहे. कोर्ट वाल्मीक कराडला जामीन देते की सीआयडीची मागणी मान्य करते ते पहावे लागणार आहे.
वाल्मिक कराडवर मकोका दाखल होताच परळीत वातावरण तापलं
संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणात केज कोर्टाने आरोपी वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यासोबतच वाल्मीक कराडवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा (मकोका) अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. कराडवर मकोका अंतर्गत कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर परळीतील वातावरण तापल्याचे पाहायला मिळाले.
वाल्मिक कराडला शासकीय अंगरक्षक होता?
काय म्हणाल्या अंजली दमानिया?
अंजली दमानिया यांनी बीड हत्या प्रकरण उचलून धरले आहे. तसेच अनेक धक्कादायक दावे आणि फोटो देखील त्यांनी शेअर केले आहेत. अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
असे सवाल अंजली दमानिया यांनी उपस्थित केले आहेत.