Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यभरात उन्हाचा कडाका तर मराठवाड्यात अवकाळीचा कहर; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

खुलताबाद तालुक्यात गहू व कांदा पिकाचे सुमारे ३८५ हेक्टरवर तर कन्नड तालुक्यातील १४ गावात ६६ शेतकऱ्यांच्या गहू, बाजरी, मका, केळी कांदा आदी पिकांचे ३०३.८ हेक्टरवर तसेच सोयगाव तालुक्यातील तीन गावात आठ शेतकऱ्यांचे नुकसान झाले

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 10, 2025 | 10:54 AM
अवकाळीत पाटण तालुक्यात ७४ घरे व १३१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान

अवकाळीत पाटण तालुक्यात ७४ घरे व १३१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान

Follow Us
Close
Follow Us:

बीड : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. काही ठिकाणी उन्हाचा कडाका तर काही ठिकाणी अवकाळी पावसाने कहर केला आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीन जिल्ह्यात 28 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान झालेल्या अवकाळी पाऊस गारपिटीमुळे सुमारे 2353.38 हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मागील आठवड्यात अवकाळी पावसाने छत्रपती संभाजीनगरसह जालना, बीड आदी जिल्ह्यात अनेक भागात चांगलाच दणका दिला होता. प्रत्यक्ष अवकाळी पाऊस व गारपिटीने नेमके किती नुकसान केले याचा अंदाज घेण्याचे काम कृषी विभागाकडून सुरू करण्यात आले. बीड जिल्ह्यात 28 मार्च ते 4 एप्रिलदरम्यान 39 गावातील 428 शेतकऱ्यांच्या 211.30 हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान झाले आहे.

यामध्ये बीड तालुक्यांतील एका शेतकऱ्याच्या ६० गुंठ्यावरिल आंबा पिकाचे, आष्टी तालुक्यातील एका गावातील २०० शेतकऱ्यांच्या ८० हेक्टर ८० गुंठे क्षेत्रावरील कांदा, पेरू, संत्रा पिकाचे, पाटोदा तालुक्यातील एका गावातील तीन शेतकऱ्यांच्या ९० गुंठ्यावरील फळ पिकांचे तसेच अंबाजोगाई तालुक्यांतील २२४ शेतकऱ्यांच्या १२९ हेक्टरमधील फळ पिकांचे नुकसान झाल्याच्या प्राथमिक अंदाज आहे.

जालना जिल्ह्यातील जालना, जाफराबाद, बदनापूर, घनसावंगी, परतूर, मंठा या तालुक्यांमध्ये अवकाळी पाऊस झाला. परंतु, भोकरदन तालुक्यातील ३३ टक्यांच्या आत नुकसान झालेल्या क्षेत्राचा अपवाद वगळता इतर तालुक्यात नुकसानीचा प्राथमिक अंदाज असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही फटका

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे सुमारे २०८२.८ हेक्टरला फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यानुसार, गंगापूर तालुक्यातील २५ गावात ३२०८ शेतकऱ्यांच्या मका, कांदा, ज्वारी, बाजरी, गहू आदी पिकांचे १३९१ हेक्टरवर ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले.

खुलताबाद तालुक्यातही नुकसान

खुलताबाद तालुक्यात गहू व कांदा पिकाचे सुमारे ३८५ हेक्टरवर तर कन्नड तालुक्यातील १४ गावात ६६ शेतकऱ्यांच्या गहू, बाजरी, मका, केळी कांदा आदी पिकांचे ३०३.८ हेक्टरवर तसेच सोयगाव तालुक्यातील तीन गावात आठ शेतकऱ्यांचे तीन हेक्टरवर मोठे नुकसान झाले. नुकसानीचा प्राथमिक अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वरिष्ठांकडे पाठविण्यात आला आहे.

वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांना फटका

भोकरदन तालुक्यातील धावडा मंडळातील सावंगी अवघडराव येथे ११५ शेतकऱ्यांचे ६० हेक्टरवरील क्षेत्राचे ३३ टक्क्यांपेक्षा कमी नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. झालेल्या नुकसानीची मंडळ कृषी अधिकारी यांच्यामार्फत पाहणी सुरू असल्याचेही कृषी विभागाकडून कळविण्यात आले आहे.

Web Title: Farmers suffer huge losses due to unseasonal rains

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2025 | 09:18 AM

Topics:  

  • Farmers Issues
  • Unseasonal Rain

संबंधित बातम्या

WARDHA “८ वर्षांची मेहनत वाया! शेतकऱ्याचा संताप! १५० संत्रा झाडांची तोडली
1

WARDHA “८ वर्षांची मेहनत वाया! शेतकऱ्याचा संताप! १५० संत्रा झाडांची तोडली

Devendra Fadnavis : राज्यात कर्जमाफी कधी होणार? CM देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…
2

Devendra Fadnavis : राज्यात कर्जमाफी कधी होणार? CM देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…

भोर तालुक्यात पावसाची पुन्हा दमदार हजेरी; पेरणी केलेल्या शेतातच पाणी
3

भोर तालुक्यात पावसाची पुन्हा दमदार हजेरी; पेरणी केलेल्या शेतातच पाणी

राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याबाबत उपमुख्यमंत्री पवार यांनी केलं पुन्हा मोठं विधान; म्हणाले…
4

राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याबाबत उपमुख्यमंत्री पवार यांनी केलं पुन्हा मोठं विधान; म्हणाले…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.