Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 11 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुलीच्या प्रियकराकडून वारंवार मिळत होती धमकी, वडिलांनी उचललं टोकाचं पाऊल, हडपसरमधल्या घटनेने उडाली खळबळ

पुण्यात एका तरुणाने प्रेयसीच्या वडिलांना धमकी दिल्याने त्यांनी गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • By साधना
Updated On: May 16, 2023 | 01:11 PM
suicide

suicide

Follow Us
Follow Us:

पुणे: पुण्यात (Pune News) एक भयानक घटना घडली आहे. येथे एका तरुणाने प्रेयसीच्या वडिलांना धमकी दिल्याने त्यांनी गळफास घेत आत्महत्या (Pune Suicide News) केल्याचा प्रकार समोर आला आहे. तुमच्या मुलीचं लग्न माझ्याशी लावून दिलं नाही, तर मी दुसरीकडे कुठेही तिचं लग्न होऊ देणार नाही, अशी धमकी या तरुणाने प्रेयसीच्या वडिलांना दिली होती. त्यानंतर वडिलांनी नैराश्याखाली येऊन गळफास घेतल्याची माहिती आहे. पुण्यातल्या हडपसर (Hadapsar News) भागात हा प्रकार घडला आहे. परमेश्वर पात्रे (वय 40, रा. गोंधळेनगर, हडपसर) असं आत्महत्या केलेल्या वडिलांचं नाव आहे. याबाबत हडपसर पोलिसांनी मुकेश देढे (वय 21, रा. चंदननगर चौकीसमोर, खराडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर परमेश्वर पात्रे यांच्या पत्नीने याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली.

[read_also content=”झाडावर चढून आंबे काढणं जीवावर बेतलं, निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला वीजेचा झटका लागला अन्… https://www.navarashtra.com/maharashtra/reitred-police-officers-death-due-to-electric-shock-while-he-climb-on-mango-tree-nrsr-400053.html”]

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या सगळ्या जून 2022 ते 7 मे 2023 दरम्यान घडला आहे. फिर्यादी महिलेच्या मुलीचं मुकेश देढे याच्याबरोबर प्रेमसंबंध होते. देढे हा काही कामधंदा करत नसल्यानं परमेश्वर पात्रे यांचा लग्नाला विरोध होता. परमेश्वर पात्रे यांनी मुलीचं लग्न दुसरीकडे जुळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुकेशला हे पटत नव्हतं. परमेश्वर जिथेही मुलीच्या लग्नासाठी बोलणी करायचे, तिथे तिथे तो अडथळे आणत होता. तसेच तो त्यांना परमेश्वर पात्रे यांच्या मुलीशी लग्न करणार असल्याचं सांगायचा. इतकंच नाही तर, तुम्हाला काय हवं ते करा, जर तुम्ही मुलीचं लग्न माझ्यासोबत लावून दिलं नाही, तर मी तिचं दुसरीकडे कुठेही लग्न होऊ देणार नाही, अशी धमकीही तो वारंवार देत होता. त्याच्या धमक्यांमुळे कंटाळून 7 मे रोजी परमेश्वर पात्रे यांनी घरासमोरील बाथरुममध्ये जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. परमेश्वर पात्रे यांच्यावर धार्मिक विधी पूर्ण केल्यानंतर त्यांच्या पत्नीने हडपसर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलीस मुकेश देढेचा शोध घेत आहेत. पोलीस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Web Title: Father suicide at hadapsar after threatening from daughters boy friend nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2023 | 01:08 PM

Topics:  

  • maharashtra news
  • pune news
  • Pune Suicide

संबंधित बातम्या

Sports: वाघिणीची गरूडभरारी! पुण्याच्या नेहा भावसारने सायकलवर सर केला सर्वात आव्हानात्मक ‘खार्दुंगला पास’
1

Sports: वाघिणीची गरूडभरारी! पुण्याच्या नेहा भावसारने सायकलवर सर केला सर्वात आव्हानात्मक ‘खार्दुंगला पास’

Namira Khan Mumbra Case:  १९ वर्षीय नमीरा खान ATSच्या रडारवर; वडिलांचे इंडियन मुजाहिदीनशी कनेक्शन
2

Namira Khan Mumbra Case: १९ वर्षीय नमीरा खान ATSच्या रडारवर; वडिलांचे इंडियन मुजाहिदीनशी कनेक्शन

कोपा मॉलचा मोठा निर्णय; पुण्यात The Organic Collective – Chapter 2 चे आयोजन करणार
3

कोपा मॉलचा मोठा निर्णय; पुण्यात The Organic Collective – Chapter 2 चे आयोजन करणार

Maharashtra News: महाराष्ट्रावर मोठ्या संकाटाची चाहुल; केंद्राकडून ५० कोटींचा निधी वितरित
4

Maharashtra News: महाराष्ट्रावर मोठ्या संकाटाची चाहुल; केंद्राकडून ५० कोटींचा निधी वितरित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.