
Pune News, MLC Elections, Election Results, Kaustubh Gawade,
आमदार जयंत आसगावकर यांना दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीत केवळ ८,९६५ मते मिळाल्यामुळे ते शर्यतीतून बाहेर पडले.
भाजपपुरस्कृत उमेदवार कौस्तुभ गावडे यांनी १८,३८५ मतांसह आपली भक्कम आघाडी कायम ठेवली आहे. त्यामुळे त्यांच्या विजय आता केवळ औपचारिक उरला आहे.
शिवसेनेच्या शिंदे गटाने पाठिंबा दिलेले सचिन सानप हे ११,९८३ मतांसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. 23 ऑक्टोबरला मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर काल (2७ ऑक्टोबला) निकाल जाहीर केले जाणार होते. पण गेल्या २४ तासांनंतरही संथ आणि चुरशीच्या मतमोजणीअखेर जयंत आसगावकर यांचा पराभव झाला.
यंदाच्या निवडणुकांमध्ये चुरशीची लढत होईल अशी चर्चा सुरू होती. पण कौस्तुभ गावडे यांनी आघाडी घेत दत्तात्रय सावंत यांचा पराभव केला.
पहिल्या काही फेऱ्यानंतरच दत्तात्रय सावंत सावंत तिसऱ्या क्रमांकावर घसरले. तर शिंदेसेनेने पाठिंबा दिलेले प्रा. सचिन सानप दुसऱ्या क्रमांकावर पोहचले. दुसऱ्या पसंतीच्या मताच्या मोजणीनंतर जयंत आसगावकर बाद झाले.
पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीत एकूण १ हजार ६७५ मते बाद झाली, तर ५१ हजार ५११ मते वैध ठरली आहेत. या वैध मतांच्या आधारे विजयासाठी २५ हजार ७५६ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला आहे.
हा कोटा कोणता उमेदवार पूर्ण करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पहिल्या पसंतीच्या मतांमधून आवश्यक कोटा पूर्ण न झाल्यास पुढील पसंतीच्या मतांच्या मोजणीची प्रक्रिया निकालावर परिणाम करू शकते.
दरम्यान, पुणे पदवीधर मतदारसंघात प्राथमिक कलांनुसार महाविकास आघाडीच्या हर्षदा जाधव आणि महायुतीच्या डॉ. स्मिता जाधव यांच्यात चुरशीची लढत झाली. मतमोजणीनंतर शरद पवार गटाच्या हर्षदा देशमुख-जाधव यांचा विजय झाल्याचे जाहीर करण्यात आले.