Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 29 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune MLC Election 2026: हर्षदा देशमुख अन् कौस्तुभ गावडेंच्या विजयाने पश्चिम महाराष्ट्रातील समीकरणे बदलली; सविस्तर राजकीय विश्लेषण

Pune MLC Election 2026: पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातील पराभवामुळे भाजपच्या उमेदवार निवडीपासून निवडणूक व्यवस्थापनापर्यंतच्या प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. शिक्षक मतदारसंघात विजय मिळविणाऱ्या भाजपला पदवीधरमध्ये मात्र अपयश आले.

  • By anuradha sagar
Updated On: Oct 29, 2026 | 08:26 AM
Pune News, MLC Elections, Election Results, Harshada Deshmukh, Kaustubh Gawade, Sharad Pawar,

Pune News, MLC Elections, Election Results, Harshada Deshmukh, Kaustubh Gawade, Sharad Pawar,

Follow Us
Follow Us:
  • पुणे पदवीधर मतदारसंघात हर्षदा देशमुख-जाधव विजयी
  • शिक्षक मतदारसंघात भाजपचे कौस्तुभ गावडे यांचा विजय
  • शिक्षक मतदारसंघात विजय मिळविणाऱ्या भाजपला पदवीधरमध्ये मात्र अपयश
Pune MLC Election 2026: पुणे विभागातील शिक्षक आणि पदवीधर विधान परिषद मतदारसंघांच्या निकालाने राज्यातील राजकीय समीकरणांना नवी दिशा दिली आहे. शिक्षक मतदारसंघात भाजपचे कौस्तुभ गावडे यांनी विजय मिळविल्याने भाजपच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे, तर पदवीधर मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या हर्षदा देशमुख-जाधव यांच्या विजयाने महाविकास आघाडीला मोठे बळ मिळाले आहे.

कौस्तुभ गावडे यांनी मतदारांशी साधलेला संपर्क, प्रचाराचे नियोजन आणि स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे या विजयाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरली. शिक्षक मतदारांच्या प्रश्नांवर भूमिका मांडताना उमेदवाराने केलेले प्रयत्न आणि संघटनात्मक पातळीवरील कामगिरी यांचे महत्त्व या निकालातून अधोरेखित झाले आहे. पदवीधर मतदारसंघात हर्षदा देशमुख-जाधव यांनी विजय मिळविल्याने महाविकास आघाडीच्या गोटात समाधानाचे वातावरण आहे. मतमोजणीदरम्यान त्यांची आघाडी चर्चेचा विषय ठरली होती.

विधान परिषद निवडणुकीत महायुतीला मोठा धक्का; फक्त दोन जागांवर विजय तर नागपूरची जागा काँग्रेसने जिंकली

पसंतीक्रमाच्या मतांमुळे मतमोजणीची प्रक्रिया अधिक गुंतागुंतीची बनली होती. अखेरच्या टप्प्यापर्यंत निकालाबाबत उत्सुकता कायम राहिल्याने या विजयाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. देशमुख- जाधव यांच्या विजयामुळे पदवीधर मतदारांमध्ये आपले स्थान अधिक मजबूत करण्याची संधी महाविकास आघाडीला मिळाली आहे. मात्र, या यशाचे श्रेय केवळ पक्षीय समीकरणांना देण्याऐवजी उमेदवाराचा मतदारांशी असलेला संपर्क, स्थानिक नेतृत्वाची भूमिका आणि प्रचारातील मुद्दे यांचाही विचार करावा लागणार आहे.

 

स्थानिक राजकीय समीकरणांचे वेगवेगळे चित्र

दोन्ही मतदारसंघांतील निकालांकडे केवळ विजय आणि पराभव या मर्यादित चौकटीतून पाहता येणार नाही. शिक्षक मतदारसंघातील भाजपचे यश आणि पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीची बाजी, यांमधून मतदारांच्या अपेक्षा आणि स्थानिक राजकीय समीकरणांचे वेगवेगळे चित्र समोर आले आहे. एका मतदारसंघातील विजयाच्या आधारे संपूर्ण विभागात राजकीय वर्चस्व निर्माण झाल्याचा दावा करणे योग्य ठरणार नाही. या निकालामुळे दोन्ही आघाड्यांना आपल्या संघटनात्मक ताकदीचा आढावा घेण्याची संधी मिळाली आहे.

Sankashti Chaturthi: गणरायाच्या आशीर्वादाने दूर होतील सर्व विघ्ने! संकष्टी चतुर्थीला प्रियजनांना पाठवा ‘या’ खास शुभेच्छा

प्रचारयंत्रणेमधील त्रुटी कारणीभूत ठरल्याच्या चर्चा

पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातील पराभवामुळे भाजपच्या उमेदवार निवडीपासून निवडणूक व्यवस्थापनापर्यंतच्या प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. शिक्षक मतदारसंघात विजय मिळविणाऱ्या भाजपला पदवीधरमध्ये मात्र अपयश आले. या निकालामागे उमेदवारीतील बदल, स्थानिक नेतृत्वातील प्रचारयंत्रणेतील त्रुटी कारणीभूत ठरल्या का, याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

माजी आमदार अरुण लाड यांचे पुत्र शरद लाड यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी केली होती. त्यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू असतानाच पक्षाने ऐनवेळी डॉ. स्मिता जाधव यांना संधी दिली. त्यामुळे उमेदवारीसाठी तयारी करणाऱ्या स्थानिक नेत्यांच्या अपेक्षांवर पाणी पडले. या निर्णयानंतर कार्यकत्यांची यंत्रणा कितपत एकसंध राहिली आणि शरद लाड यांच्या संपर्काचा पक्षाला किती फायदा झाला, हा प्रश्न अनुत्तरित आहे.

भाजपला आत्मपरीक्षणाची गरज

दुसरीकडे, पदवीधर मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी केलेले नियोजन, मतदारनोंदणीचा प्रत्यक्ष मतदानासाठी झालेला उपयोग आणि महायुतीतील घटकपक्षांचा सहभाग यांचीही चिकित्सा करावी लागणार आहे. शिक्षक मतदारसंघातील विजयामुळे पदवीधरमध्येही यश मिळेल, असे पक्षाचे गणित असेल, तर दोन्ही मतदारसंघांतील मतदारांची वेगळी मानसिकता आणि स्थानिक समीकरणे ओळखण्यात कुठे कमी पडले. हा प्रश्न उपस्थित होतो.

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: पुणे विभाग विधान परिषद निवडणुकीचे दोन्ही निकाल काय लागले?

    Ans: पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपचे कौस्तुभ गावडे विजयी झाले, तर पुणे पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीच्या (NCP शरदचंद्र पवार) हर्षदा देशमुख-जाधव विजयी झाल्या.

  • Que: कौस्तुभ गावडेंच्या विजयाचे मुख्य गमक काय ठरले?

    Ans: शिक्षकांशी थेट संपर्क, मजबूत संघटनात्मक मांडणी आणि जुनी पेन्शन व शाळांच्या अनुदानासारख्या कळीच्या मुद्द्यांवर मांडलेली स्पष्ट भूमिका गावडेंच्या विजयासाठी महत्त्वाची ठरली.

  • Que: हर्षदा देशमुख-जाधव यांच्या विजयाचा महाविकास आघाडीला काय फायदा होईल?

    Ans: या विजयामुळे पश्चिम महाराष्ट्रातील पदवीधर, तरुण आणि सुशिक्षित मतदारांवर महाविकास आघाडीचे राजकीय वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले असून आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला आहे.

Web Title: Pune mlc election results political analysis harshada deshmukh kaustubh gawade as

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2026 | 08:24 AM

Topics:  

  • pune news

संबंधित बातम्या

Health News: पुण्यातील रुग्णालयांचे धाबे दणाणणार? केवळ २० टक्के हॉस्पिटल्सकडून नियमांचे पालन
1

Health News: पुण्यातील रुग्णालयांचे धाबे दणाणणार? केवळ २० टक्के हॉस्पिटल्सकडून नियमांचे पालन

राणा सूर्यवंशींना वाय प्लस सुरक्षा का? रोहित पवारांचा सवाल; सखोल चौकशीची मागणी
2

राणा सूर्यवंशींना वाय प्लस सुरक्षा का? रोहित पवारांचा सवाल; सखोल चौकशीची मागणी

Pune MLC Election Result 2026: पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपचे कौस्तुभ गावडे विजयी; काँग्रेसचे जयंत आसगावकरांचा पराभव
3

Pune MLC Election Result 2026: पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपचे कौस्तुभ गावडे विजयी; काँग्रेसचे जयंत आसगावकरांचा पराभव

Pune News: पुणेकरांनो, मुळा-मुठा नदीबाबत धक्कादायक खुलासा! पावसाळ्यातही प्रदूषणाचा विळखा कायम
4

Pune News: पुणेकरांनो, मुळा-मुठा नदीबाबत धक्कादायक खुलासा! पावसाळ्यातही प्रदूषणाचा विळखा कायम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.