Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai News: हुक्का फ्लेवर ‘खाद्यपदार्थ’ कसा? एफडीएच्या अजब कारवाईमुळे राज्य सरकारवर ओढवली नामुष्की

डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात 'सोक्स' (SOEX) नावाच्या निर्यात कंपनीचा अंदाजे ५० कोटी रुपये किमतीचा कच्चा माल एफडीएने जप्त केला होता.

  • By anuradha sagar
Updated On: Mar 31, 2026 | 10:56 AM
FDA

FDA

Follow Us
Follow Us:
  • खाद्यपदार्थ म्हणून घोषित केलेला माल हुक्का फ्लेवरचा कच्चा माल असल्याचे निष्पन्न
  • वैद्यकीय शिक्षण सचिवांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले
 

नीता परब, Mumbai News: राज्याचे अन्न व औषध प्रशासन (एफडीए) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. हुक्का फ्लेवरचा कच्चा माल हा खाद्यपदार्थ असल्याचा दावा करत ठाणे आणि पुणे येथे केलेली कारवाई आता स्वतः विभागासाठीच एक डोकेदुखी ठरली आहे. हे प्रकरण दिवसेंदिवस वाढत चालले असल्याने दस्तुरखुद्द वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरज कुमार यांनी हस्तक्षेप करून जप्त केलेला माल सोडण्याकरीता सहमती दर्शवणारे प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात दाखल करावे लागल्याची माहिती आता समोर आली आहे.

Ashok Kharat Case : SIT चौकशीलाच चाकणकरांची दांडी; कारण दिलं ‘प्रवास करण्यास असमर्थ…’

अन्न व औषध प्रशासनाच्या ठाणे आणि पुणे विभागांनी डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात ‘सोक्स (SOEX) नावाच्या एका निर्यात कंपनीकडून अंदाजे ५० कोटी रुपये किमतीचा माल जप्त केला होता. हा कच्चा माल खाद्यपदार्थ असल्याचे मानत, अधिकाऱ्यांनी अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आणि एफआयआर नोंदवला. मात्र, कंपनीने ही कारवाई बेकायदेशीर असल्याचे सांगत उच्च न्यायालयात धाव घेतली. याचिकेत असा दावा करण्यात आला होता की, जप्त केलेला हुक्का फ्लेवरचा कच्चा माल निर्यातीसाठी होता आणि तो अन्न म्हणून पात्र ठरत नाही. शिवाय, कंपनीने एफडीएच्या प्रयोगशाळेच्या अहवालात फेरफार झाल्याचा संशय व्यक्त करत त्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या संपूर्ण घटनेमुळे केवळ एफडीएच्या कार्यपद्धती आणि कायदेशीर पध्दतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले नाही, तर विभागाच्या विश्वासार्हतेवरही प्रश्न निर्माण झाला आहे.

एफएसएसएआयनेही एफडीएला दोषी ठरवले

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने, देशातील सर्वोच्च अन्न नियामक संस्थेनेही आपल्या अलीकडील अहवालात स्पष्ट केले आहे की, जप्त केलेला माल अन्न नव्हता. या अहवालामुळे एफडीएची कारवाई आणखी कमकुवत झाली.

काळजी घ्या ! राज्यातील अनेक भागांत उष्णतेचा बसतोय तडाखा; 2.50 लाखांपेक्षा अधिक उष्माघाताचे रुग्ण

सचिवांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले

सदर प्रकरण न्यायालयात पोहोचल्यानंतर, वैद्यकीय शिक्षण सचिव धीरज कुमार यांना केवळ प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास भाग पाडले नाही तर, त्यांनी विभागीय अधिकाऱ्यांना चांगलेच धारवर धरल्याचे समजते. शिवाय त्यांना गोदामांवरील सील काढण्यास आणि माल सोडण्यासही सहमती द्यावी लागली.

 

एफडीए आयुक्त मूग गिळून

अन्न व औषध प्रशासन आयुक्त श्रीधर दुबे पाटील यांना याबाबत विचारले असता, त्यांनी सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे सांगून त्यावर भाष्य करण्यास नकार दर्शविला.

 

 

Web Title: Fda backtracks on 50 crore hookah flavor seizure state submits affidavit in high court to release goods

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2026 | 10:56 AM

Topics:  

  • Bombay High Court
  • FDA
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

NCP President Appointment:सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात; उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश
1

NCP President Appointment:सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात; उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश

Pune Politics: नगराध्यक्षांसह २८ नगरसेवकांची पदे धोक्यात? राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?
2

Pune Politics: नगराध्यक्षांसह २८ नगरसेवकांची पदे धोक्यात? राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?

Tukaram Mundhe: हॉटेल-दूध डेअरीनंतर FDA च्या रडारवर बेबी फूड; नियम मोडणाऱ्या उत्पादकांवर कारवाईचा इशारा
3

Tukaram Mundhe: हॉटेल-दूध डेअरीनंतर FDA च्या रडारवर बेबी फूड; नियम मोडणाऱ्या उत्पादकांवर कारवाईचा इशारा

Drought Affected: टीकेनंतर दुष्काळग्रस्तांसाठी एक कोटी; ‘मदत की डॅमेज कंट्रोल?’ वाढदिवसावरील टीकेनंतर पालिकेची तिजोरी उघडली
4

Drought Affected: टीकेनंतर दुष्काळग्रस्तांसाठी एक कोटी; ‘मदत की डॅमेज कंट्रोल?’ वाढदिवसावरील टीकेनंतर पालिकेची तिजोरी उघडली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.