Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाशिममध्ये गर्भलिंग निदान करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; गुपचूप सुरु होती चाचणी, धाड पडताच…

आरोग्य विभागाला लिंगनिदान होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर, 6 सदस्यांचे पथक तयार करण्यात आले. या पथकाने सापळा रचून एका गर्भवती महिलेला बनावट रुग्ण म्हणून रुग्णालयात पाठवले. तिथे तिची भेट एका एजंटशी झाली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 17, 2025 | 09:23 AM
चक्क ! मोबाईल ॲपद्वारे गर्भलिंग निदान; पुण्यात घडला धक्कादायक प्रकार

चक्क ! मोबाईल ॲपद्वारे गर्भलिंग निदान; पुण्यात घडला धक्कादायक प्रकार

Follow Us
Follow Us:

वाशिम : कारंजा शहरातील राठोड मॅटर्निटी अॅण्ड जनरल हॉस्पिटलमध्ये सुरू असलेल्या गर्भलिंग शोधण्याच्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. ही कारवाई वाशिम, कारंजा आणि अकोला आरोग्य विभागाच्या पथकाने बुधवारी (दि.12) रात्री आठच्या सुमारास केली. यावेळी 5 गर्भवती महिला गर्भलिंग निदानाच्या प्रतीक्षेत असल्याचे आढळून आल्या. या महिलांपैकी 2 महिला बुलढाणा जिल्ह्यातील, 2 अकोला जिल्ह्यातील आणि 1 महिला वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथील रहिवासी आहे.

आरोग्य विभागाला लिंगनिदान होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर, 6 सदस्यांचे पथक तयार करण्यात आले. या पथकाने सापळा रचून एका गर्भवती महिलेला बनावट रुग्ण म्हणून रुग्णालयात पाठवले. तिथे तिची भेट एका एजंटशी झाली, ज्याने तिला लिंग निदानाची हमी देत पैशांची मागणी केली. त्या महिलेकडून मिळालेल्या माहितीनंतर आरोग्य विभागाने तत्काळ छापेमारी केली.

छाप्यादरम्यान, पथकाने सोनोग्राफी मशीन सील केली आणि एजंटकडून 70500 रुपये रोख रक्कम तसेच मोबाइल जप्त केले. सोनोग्राफी मशीनद्वारे बाळाचे गर्भलिंग निश्चित करण्यासाठी आणि ते उघड करण्यासाठी प्री-कन्सेप्टन, प्री-नेटल डायग्नोस्टिक टेक्निक (पीसीपीएनडीटी) कायद्यांतर्गत स्थापन केलेल्या जिल्हा आरोग्य विभागाच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

अकोला व वाशिम टीममधील डॉ. विजया पवणीकर, डॉ. धनंजय चिमणकर, डॉ. एन. आर. साळुंखे, डॉ. एस. एम. जाधव, अॅड. शुभांगी ठाकरे, अॅड. राधा नरवलिया, ओम राऊत यांच्या पथकाने राठोड मॅटर्निटी अॅण्ड जनरल हॉस्पिटलच्या डॉ. रजनी राठोड एजंट माधव ठाकरे आणि चालक संदीप नवघरे यांच्याविरुद्ध पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत कारवाई केली.

बेकायदेशीर गर्भलिंग निदानाची माहिती देणाऱ्यास एक लाख

प्रसूतीपूर्व निदान तंत्राचा वापर करून बेकायदेशीररीत्या गर्भलिंग निदान हॉस्पिटल करणे, गर्भपात करणे शिक्षेस पात्र आहे. परंतु, त्यानंतरही गर्भलिंग निदान आणि गर्भपात करण्यात येत आहे. यावर आळा घालण्यासाठी बेकायदेशीर गर्भलिंग निदानाची माहिती देणाऱ्यास एक लाख रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने टोल फ्री क्रमांक जारी केला आहे. संबंधित डॉक्टर किंवा त्या रुग्णालयाची तक्रार करण्याचे आवाहन केले आहेत.

Web Title: Fetal gender diagnosis racket exposed in washim nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2025 | 09:23 AM

Topics:  

  • Pregnancy Test
  • Washim news

संबंधित बातम्या

Washim: ज्ञानेश कुमार यांना अटक करा, वाशिम जिल्हा काँग्रेस आक्रमक; जिल्हाधिकरी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
1

Washim: ज्ञानेश कुमार यांना अटक करा, वाशिम जिल्हा काँग्रेस आक्रमक; जिल्हाधिकरी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

Washim News: पिण्याच्या पाण्याचे काटेकोर नियोजन करा; संबंधित अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी कुंभेजकर यांचे निर्देश
2

Washim News: पिण्याच्या पाण्याचे काटेकोर नियोजन करा; संबंधित अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी कुंभेजकर यांचे निर्देश

Washim: दुष्काळग्रस्त यादीत वाशिमचे सहाही तालुके समाविष्ट, पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या पाठपुराव्याला यश
3

Washim: दुष्काळग्रस्त यादीत वाशिमचे सहाही तालुके समाविष्ट, पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या पाठपुराव्याला यश

वाशिममध्ये मनसेचा आक्रोश मोर्चा, दुष्काळ घोषित न केल्यास शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा; जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक
4

वाशिममध्ये मनसेचा आक्रोश मोर्चा, दुष्काळ घोषित न केल्यास शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा; जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.