Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 14 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Washim News: कर्ज काढून हळद लावली, पण पाण्याअभावी पीक उद्ध्वस्त! कंझरात २०० पैकी १०० एकर हळद वाळली; शेतकरी हवालदिल

Washim Mangrulpir Turmeric Crop Damage Water Crisis: वाशिम जिल्ह्यात यंदा हळदीची विक्रमी लागवड झाली असली, तरी अल्प पावसामुळे हळद उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Nov 14, 2026 | 08:08 PM
ShirpurDamage

ShirpurDamage

Follow Us
Follow Us:
  • हळदीच्या शेतात दुष्काळाचे सावट
  • कंझरात २०० एकर हळद लागवड
  • पाण्याअभावी निम्मे पीक वाळले
मंगरूळपीर: तालुक्यासह वाशिम जिल्ह्याच्या ४ तालुक्यांमध्ये यंदा हळदीची विक्रमी लागवड करण्यात आली. मात्र, यंदाच्या पावसाळ्यात अत्यंत अल्प पाऊस झाल्याने हळद उत्पादक शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले. पावसाने पाठ फिरविल्याने धरणे, तलाव, नदी-नाले तसेच शेतकऱ्यांच्या बोरवेल आणि विहिरी कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे लाखो रुपये खर्च करून जोपासलेले हळदीचे पीक पाण्याअभावी उद्धवस्त होण्याच्या मार्गावर आहे. (Washim News)

Bhayandar Fort Making Competition 2026 : भाईंदरमध्ये शिवसेनेतर्फे किल्ले बनविणे स्पर्धा २०२६; विजेत्यांना २५ हजारांचे पारितोषिक

यंदा बाजारपेठेत हळदीचे वाढते भाव पाहून शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने हळद लागवडीचा निर्णय घेतला. पावसाळ्यात अपेक्षित पाऊस न झाल्यानेही परतीच्या पावसावर शेतकऱ्यांची आशा कायम होती. परतीचा पाऊस होऊन जमिनीतील ओलावा वाढेल आणि पाण्याची कमतरता भरून निघेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र, पावसाने पुन्हा दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरले.

हळदीचे पीक जोपासण्यासाठी शेतकऱ्यांनी ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत जवळपास एक ते दीड लाख रुपये एकरी खर्च केला. वाढत्या बाजारभावामुळे उत्पादनातून चांगला आर्थिक फायदा होईल, अशी अपेक्षा होती. आता जिल्ह्यातील अनेक भागांतील बोरवेल, विहिरी, नदी आणि तलाव कोरडे पडल्याने हळदीला पाणी देणे अशक्य झाले.

कंझरा गावात १०० एकर हळद पाण्याअभावी वाळली

मंगरूळपीर तालुक्यातील कंझरा हे गाव हळद लागवडीसाठी महत्त्वाचे ठरत आहे. या एकाच गावात जवळपास २०० एकर क्षेत्रावर हळदीची लागवड करण्यात आली. मात्र, यापैकी तब्बल १०० एकर क्षेत्रातील हळद पाण्याअभावी सुकून जात असल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली. जवळपास निम्म्या हळद क्षेत्राचे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांनी केलेला मोठा खर्च वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे. हळद लागवडीसाठी कर्ज काढून आणि पदरमोड करून लाखो रुपये खर्च करणाऱ्या शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी शासनाने विशेष मदतीचे पॅकेज जाहीर करावे, अशी अपेक्षा हळद उत्पादक शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

शिवसेनाचे सामाजिक कार्यकर्ते, शिवा सावके म्हणाले की, हळद लागवडीसाठी केले आपल्या मुलाबाळा सारखे संगोपन केलेल्या हळदीला आज पाणी उपलब्ध नसल्यामुळे वाळताना पावल्या जात नाही. चांगले उत्पन्न व्हावे यासाठी कर्ज काढून आणि पदरमोड करून लाखो रुपये खर्च करणाऱ्या शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी शासनाने विशेष मदतीचे पॅकेज जाहीर करावे.

कंझराचे हळद उत्पादक शेतकरी, विष्णू गावंडे म्हणाले की, मोठ्या आशेने यावर्षी हळदीचे पीक लावले होते परंतु बोरवेल विहिरी यांनी तळ गाठला यामुळे हळदीला पाणी उपलब्ध करणे आता शक्य होत नाही. हळदीची सुकलेली अवस्था पाहून आमच्या डोळ्यात पाणी येते, आतापर्यंत लाखो रुपये खर्दून या हळदीचे संगोपन करण्यात आले होते. परंतु, पाणी नसल्यामुळे आमचा कुठलाही इलाज चालत नाही. संबंधित सरकारने हळद उत्पादक शेतकऱ्याला भरीव मदत द्यावी, अशी मागणी आम्ही सरकार दरबारी करत आहोत.

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघातांची मालिका! कंटेनरची एकापाठोपाठ १६ कारला धडक; अनेक जखमी

💡

Frequently Asked Questions

  • Que: वाशिम जिल्ह्यात हळदीचे पीक संकटात का सापडले आहे?

    Ans: अल्प पाऊस आणि सिंचनासाठी पाणी उपलब्ध नसल्याने पीक वाळले.

  • Que: कंझरा गावात किती क्षेत्रावर हळदीची लागवड झाली?

    Ans: जवळपास २०० एकर क्षेत्रावर हळदीची लागवड करण्यात आली.

  • Que: कंझरा गावात किती एकर हळद पाण्याअभावी वाळली?

    Ans: सुमारे १०० एकर क्षेत्रातील हळद पाण्याअभावी वाळली आहे.

Web Title: Washim mangrulpir turmeric crop damage kanjara water crisis pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 14, 2026 | 08:08 PM

Topics:  

  • Crisis on farmers
  • Crop Loss
  • drought news
  • Washim news

संबंधित बातम्या

Latur News: पीकविमा प्रक्रिया शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी! ई-केवायसीशिवाय पीकविमा भरता येत नसल्याच्या सूचनेमुळे शेतकऱ्यांची होणार धावपळ
1

Latur News: पीकविमा प्रक्रिया शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी! ई-केवायसीशिवाय पीकविमा भरता येत नसल्याच्या सूचनेमुळे शेतकऱ्यांची होणार धावपळ

Washim Ginning Fire: जिनिंगमध्ये आगीचा तांडव! १० हजार क्विंटल कापूस खाक; अग्निशमन जवानांची अथक झुंज
2

Washim Ginning Fire: जिनिंगमध्ये आगीचा तांडव! १० हजार क्विंटल कापूस खाक; अग्निशमन जवानांची अथक झुंज

Buldhana: कपाशी उत्पादक शेतकऱ्यांवर संकट! दोन वेच्यांतच पीक संपलं, खर्च वसूल करणंही कठीण
3

Buldhana: कपाशी उत्पादक शेतकऱ्यांवर संकट! दोन वेच्यांतच पीक संपलं, खर्च वसूल करणंही कठीण

वाशिममधील पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! घरबसल्या डिजिटल जीवन प्रमाणपत्राची सुविधा; लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी कुंभेजकरांचे आवाहन
4

वाशिममधील पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! घरबसल्या डिजिटल जीवन प्रमाणपत्राची सुविधा; लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी कुंभेजकरांचे आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.