Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Metro: प्रदूषणाशी लढा! मेट्रो प्रवासातून दर किलोमीटरला वाचतोय १०८.५ मिलीग्रॅम $CO_2$

मेट्रो प्रकल्प राबवताना केवळ तंत्रज्ञानावर भर न देता पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी 'महा मेट्रो'ने मोठे पाऊल उचलले आहे. 'ग्रीन मेट्रो इनिशिएटिव्ह' अंतर्गत शहरात खालीलप्रमाणे वृक्षारोपण करण्यात आले आहे

  • By anuradha sagar
Updated On: Feb 25, 2026 | 12:59 PM
Pune Metro, Hinjewadi Shivajinagar Metro, Pune Metro News

Pune Metro, Hinjewadi Shivajinagar Metro, Pune Metro News

Follow Us
Follow Us:
  • पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील वाढते प्रदूषण आणि वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर मेट्रो प्रवास हा पर्यावरणासाठी ‘तारणहार’ ठरत आहे.
  • केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (CPCB) अहवालानुसार, पेट्रोल-डिझेलची वाहने, कचरा जाळणे आणि कारखान्यांमुळे हवेची गुणवत्ता खालावली आहे
  • मेट्रोच्या दररोजच्या प्रवासातून एका दिवसाची बचत: १७२.७ किलो CO2 आणि एका वर्षाची बचत: ६३.१ टन CO2 इतकी कार्बन बचत होत आहे.
 

विजया गिरमे, Pimpri-Chinchwad Metro: वाढते सिमेंटचे जंगल, रस्त्यांवरील वाहनांच्या लांबच लांब रांगा आणि धुराचे लोट यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडचा श्वास गुदमरत आहे. मात्र, अशा परिस्थितीत मेट्रोने प्रवास करणारे नागरिक शहरासाठी ‘तारणहार’ ठरत आहेत. तुम्ही मेट्रोचे तिकीट काढता, तेव्हा केवळ प्रवासाचा निर्णय घेत नाही, तर पर्यावरणाच्या संवर्धनासाठी एक ठोस पाऊल टाकता. प्रति किलोमीटर १०८.५ मिलीग्रॅम ‘सीओ-२’ (CO2) उत्सर्जनाची बचत होत असून, दररोज हजारो नागरिक या ‘ग्रीन वॉरियर्स’च्या मोहिमेत सामील होत आहेत.

प्रदूषणाची विळखा आणि चिंतेची बाब

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (CPCB) निरीक्षणांनुसार, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील हवेची गुणवत्ता खालावली आहे.

प्रमुख कारणे: पेट्रोल-डिझेलची वाहने, कचरा जाळणे आणि कारखान्यांतील बॉयलर.

घातक घटक: हवेत सूक्ष्म धूलिकणांसह सल्फर ऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड आणि कार्बन मोनॉक्साईडचे प्रमाण वाढले आहे.

परिणाम: शहरांच्या सरासरी तापमानात वाढ होत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत आहे.

Rajyasbaha Election 2026 : शरद पवार हे निवडणुकीला उभे राहणार; राज्यसभा निवडणूकीवरुन मविआत वादंग? खासदार राऊत

मेट्रो लाईन नुसार एकूण आकडेवारी

१) पीसीएमसी ते स्वारगेट (लाईन१:- 17.4 किमी)

सरासरी दैनंदिन प्रवासी संख्या – 91,554
Co2 – १.८८७ ग्रॅम

i) एका दिवसाची बचत – 172.7 किलो
ii) एका महिन्याची बचत – ५.१८ टन
iii) एका वर्षाची बचत – ६३.१ टन

२) वनाज ते रामवाडी (लाईन २:- १५.७ किमी)

सरासरी दैनंदिन प्रवासी संख्या- १०८८८६
CO2:- 1.703 ग्रॅम

एका दिवसाची बचत – १८५.४ किलो
एका महिन्याची बचत – ५.६ टन
एका वर्षाची बचत – ६७.७ टन

तुलनात्मक विश्लेषण: रस्ते प्रवास वि. मेट्रो

वाहनाचा प्रकार प्रवासी क्षमता सरासरी उत्सर्जन (ग्रॅममध्ये)

१) मेट्रो ट्रेन ९७० ० (शून्य थेट उत्सर्जन)

२) PMPMLबस
(CNG/डिझेल) ५० सुमारे ८०० -१,००० ग्रॅम

३) खासगीकार(पेट्रोल) ४ सुमारे १,५०० – १,८०० ग्रॅम

४) दुचाकी (टू-व्हीलर) २ सुमारे २५० – ३०० ग्रॅम

Hindu-Muslim Politics: महाराष्ट्रातही ‘उत्तर प्रदेश पॅटर्न’ लागू करा! अवैध धर्मांतर रोखण्यासाठी हिंदुत्वनिष्ठांचा एल्गार

पुणे मेट्रोचे ‘ग्रीन इन्फ्रास्ट्रक्चर’: १७,९४६ वृक्षांची लागवड

मेट्रो प्रकल्प राबवताना केवळ तंत्रज्ञानावर भर न देता पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ‘महा मेट्रो’ने मोठे पाऊल उचलले आहे. ‘ग्रीन मेट्रो इनिशिएटिव्ह’ अंतर्गत शहरात खालीलप्रमाणे वृक्षारोपण करण्यात आले आहे:

वृक्षारोपण : पुणे महानगरपालिका (PMC) क्षेत्रात १२,५७४ आणि पिंपरी-चिंचवड (PCMC) क्षेत्रात ५,३७२ अशा एकूण १७,९४६ नवीन झाडांची लागवड करण्यात आली आहे.

यशस्वी पुनर्रोपण : प्रकल्पाच्या कामात अडथळा ठरणारी झाडे तोडण्याऐवजी त्यांचे शास्त्रीय पद्धतीने पुनर्रोपण करण्यात आले. यामध्ये पुणे शहरात १,८१८ आणि पिंपरीमध्ये ४४३ झाडांचे यशस्वी पुनर्रोपण झाले आहे.

सौर ऊर्जेचा वापर: मेट्रो स्थानकांच्या छतावर सौर पॅनेल बसवून नैसर्गिक ऊर्जेचा वापर करण्यावर भर दिला जात आहे, ज्यामुळे कार्बन फूटप्रिंट कमी होण्यास मदत होत आहे.

 

 

Web Title: Fight against pollution metro pravastun rate kilometerla watchtoy 1085 mg co2

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2026 | 12:59 PM

Topics:  

  • Pune Metro

संबंधित बातम्या

आमदार शिरोळेंकडून हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो (लाईन ३) कामाची पाहणी; २०२६ मध्ये प्रकल्प पूर्ण होण्याचा व्यक्त केला विश्वास
1

आमदार शिरोळेंकडून हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो (लाईन ३) कामाची पाहणी; २०२६ मध्ये प्रकल्प पूर्ण होण्याचा व्यक्त केला विश्वास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.