kirit somaiya
मुंबई – ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी वांद्रे पूर्व येथील निर्मल नगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. किशोरी पेडणेकर यांनी मुंबईत अनेक ठिकाणी एसआरएचे गाळे बेकायदा ताब्यात घेतले आहेत. याप्रकरणी पेडणेकरांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सोमय्यांनी केली आहे.
निर्मल नगर पोलिसांना दिलेल्या तक्रारीत सोमय्यांनी म्हटले आहे की, मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी वरळी गोमाता जनता एस. आर. ए. प्रकल्पात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, मुंबई यांची फसवणूक करून अनेक गाळे स्वतःच्या ताब्यात घेतले. यासंदर्भात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (SRA), राज्य शासनाचे गृहनिर्माण विभागासह ठिकाणी तक्रारी केल्या आहेत. यासंदर्भात पेडणेकरांवर गुन्हा दाखल करुन त्यांची चौकशी करावी.
पेडणेकरांनी केलेल्या एसआरए घोटाळाप्रकरणाचे सर्व कागदपत्रे, पुरावेही पोलिसांना दिल्याचे सोमय्यांनी सांगितले. सोमय्या म्हणाले, २०१७ मधील मुंबई महापालिका निवडणुकीत किशोरी पेडणेकर यांनी जे निवडणूक शपथ पत्र भरले, त्यात त्या स्वतः गोमाता जनता एस. आर. ए च्या सहाव्या मजल्यावर राहत आहे असे लिहिले आहे.